अशी हि बनवा बनवी मीडियाची फसवा फसवी :
सलमान खान प्रीती झिंटा आणि रानी मुखर्जीचा, चोरी चोरी चुपके चुपके सिनेमा आठवतो का, बातम्या देणार्या समस्त विविध भाषेतील अग्रगण्य वाहिन्यांचे देखील तेच, सारे काही, चोरी चोरी चुपके चुपके सुपार्या घेऊन भारतीय जनतेला फसविणे, म्हणून मी पत्रकार असूनही दिवसभरात केवळ ताज्या घडामोडींसाठी फक्त ठळक बातम्या बघतो आणि टीव्ही बंद करतो आणि हो, लोकांना फसविण्याच्या शासनाला लुबाडण्याच्या बाबतीत दैनिके तर वाहिन्यांच्या एक पाऊल पुढे त्यातूनच करोनानंतर समस्त वृत्तपत्रांचा खप झपाट्याने खाली आला मात्र खपाची खोटी आकडेवारी पुढे करून राज्यातली वृत्तपत्रे शासकीय जाहिरातीछापून मोठ्या रकमेने लुटतात लुबाडतात ज्यात शासकीय अधिकाऱ्यांची मोठी मदत असते. पूर्वी मी स्वतः दिवसभरात किमान 12-13 वृत्तपत्रे हमखास वाचत असे, पुन्हा तेच, मी स्वतः पत्रकार असून देखील वृत्तपत्र मालक आणि तेथे कार्यरत असणाऱ्या बहुतेकांचे कमाईचे काळे धंदे त्यातून सुपारी घेत सोडलेल्या बातम्या आणि लेख, आता मी एकही वृत्तपत्र वाचत नाही, आमच्या घरी लहान मुलांची शी पुसण्यासष्ठी मात्र लोकमत पद्धतीची वृत्तपत्रे अधूनमधून विकत घेतली जातात. सुपारी घेऊन खोट्या बातम्या देणार्या वाहिन्यांचा उपयोग सार्वजनिक मुतारीसारखा करता आला असता तर नक्कीच लोकांनी त्यावर मुतून ठेवले असते. भारतीय जनता नेमक्या वस्तुस्थितीपासून कोसो दूर असल्याने लोकांचा वाहिन्या आणि वृत्तपत्रांवर मोठा विश्वास असतो पण हे दोघेही कायम विश्वासाला तडा देण्याची भूमिका कायम घेतात अपवाद एखादा दुसरा वाहिन्या किंवा वृत्तपत्रांमध्ये काम करणारा प्रखर राष्ट्रप्रेमी…
www.vikrantjoshi.com
एक जून रोजी देशातले लोकसभा मतदान आटोपल्यानंतर मुद्दाम फार आधीपासून गाजावाजा करून सायंकाळपासून एक्झिट पोल देशातल्या विविध भाषांमध्ये असलेया बातम्या देणाऱ्या वाहिन्यांमध्ये दाखविण्यात रंगविण्यात आले, अगदीच एखाद्या दुसऱ्या वाहिनीचा अपवाद वगळता समस्त वाहिन्यांवरून थोड्याफार फरकाने एकसारखे एक्झिट पोल दाखविण्यात आले ज्यातून मोदी भाजपा आणि त्यांची आघाडी मोदी यांनी जाहीर केलेली नेमकी फिगर म्हणजे जवळपास 400 च्या आसपास आकडा गाठणार हेच दाखविण्यात आणि सतत हॅमर करण्यात आले ज्यातून सर्वसामान्यांपासून तर श्रीमंतांपर्यंत समस्त भारतीयांनी शेअर्स आणि सट्टा दोन्हीवर बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर विश्वास ठेवत करोडो अब्जो रुपयांची उलाढाल केली, आपण भारतीय जनतेला, भाजपाला फसवितो आहे, तद्दन खोट्या आकडेवारीमुळे बहुसंख्य भारतीय जनतेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यातून त्यांना मोठे नैराश्य येणार आहे हे माहित असूनही केवळ मिळालेल्या आर्थिक सुपारीतून समस्त बातम्या देणार्या वाहिन्यांनी तुम्हा आम्हा साऱ्यांना फसविले, बहुसंख्य आर्थिक दृष्ट्या मोठ्या रकमेने लुबाडल्या गेले, आर्थिक फायदा केवळ वाहिन्यांचा झाला असावा आणि आर्थिक दलाली करणारे तर एका रात्रीतून किंवा लोकसभा निकाल बाहेर पडेपर्यंत मालामाल झाले, जनतेची नेत्यांची भाजपाची चोरी चोरी चुपके चुपके मधली रानी मुखर्जी झाली जी पोटाला उशी बांधून दिवस गेल्याचे खोटे खोटे साऱ्यांना सांगत असते….
एक्झिट पोल बाहेर आल्यानन्तर आनंदाने बेभान होऊन वास्तविक देशातल्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या पण नेमकी वस्तुस्थिती विशेषतः गृह खाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना नेमकी ठाऊक असल्याने किंबहुना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आणि देशातही भाजपा आघाडीचे देऊळ निकालांबाबत पाण्यात आहे हे त्यांना माहित असल्याने फडणवीस शाह पद्धतीच्या माहितगार नेत्यांनी कोणत्याही कुठल्याही प्रतिक्रिया वाहिन्यांवर येत व्यक्त केल्या नाहीत, किंबहुना हे जर चुकून घडले असते तर मोठी नामुष्की त्यांच्यावर नक्की ओढवली असती, विरोधकांनी अक्षरश: खिल्ली उडविली असती. अत्यंत महत्वच्ये दोन मुद्दे असे कि सोनिया गांधी त्यावर वेट अँड वॉच आणि निकाल वेगळे नक्की असतील एवढेच म्हणाल्या जे नेमके खरे ठरले, दुसरा मुद्दा अज्ञानातून कदाचित पण नाही म्हणायला जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया देऊ असे फडणवीसांना विचारले त्यावर निकाल लागेपर्यंत गप्प बसा एवढेच फडणवीस म्हणाले. आणखी एक धक्कादायक माहिती अशी कि अमुक पद्धतीने जवळपास सारखी आकडेवारी जाहीर करण्या जेव्हा अज्ञाताने वाहिन्यांना सांगितले तेव्हा स्थानिक प्रतिनिधींकडून खातरजमा करण्या जेव्हा त्यांना वाहिनी प्रमुखांकडून विचारणा झाली तेव्हा या प्रतिनिधींनी नेमकी वस्तुस्थिती सांगूनही वाहिन्यांनी चुकीची माहिती जाहीर केली जसे एका मराठी वृत्तवाहिनीच्या धुळे प्रतिनिधीला खातरजमा करण्यासाठी कोण जिंकेल असे विचारले असता त्याने शोभा बच्छाव यांचे नाव ठासून सांगूनही या वहिनीने डॉ सुभाष भामरे अगदी सहज जिंकून येतील असे सांगितले, अख्य्या देशातल्या एक्झिट पोल बाबत नेमकी हि अशीच फसवी आकडेवारी जाहीर करण्यात आली, नेमक्या निकालानंतर त्यामुळे जनतेची मोठी फसवणूक आणि भाजपाची फार मोठी विनाकारण, कुठलाही या एक्झिट पोलशी संबंध नसतांना बदनामी झाली. खोटारड्या भाजपाने हि सुपारी आपणहून दिली अशी विरोधकांनी त्यांची मोठी बदनामी केली…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी