दादांचा वादा कि फसलेला सौदा :
निवडणुकांच्या निकालानंतर नेमके काय घडले, कोणी कोणास फसविले गंडविले त्यातून नेमके कोणाचे किती नुकसान झाले हे सांगणे जरी खूप सोपे होणार असले तरी संडासात फेकलेले कंडोम जसे वर येते तसे राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान नेमके आणि नक्की काय घडले कोणी कोणास उल्लू बनविले, नेमकी माहिती हाती आल्याने तुम्हाला हे राजकीय गुपित निकालाआधीच उघड करून सांगणे मी माझे येथे कर्तव्य समजतो. धक्कादायक माहिती अशी कि राज्यात ज्या ज्या ठिकाणी महायुतीतर्फे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार उभे होते त्यातले जवळपास सारेच यासाठी निवडून येणार आहेत कारण निवडणूक प्रचारात आणि मतदान करतांना स्वतः अजित पवारांनी त्यातल्या प्रत्येक मतदार संघात विशेषतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवर सतत वैयक्तितक दबाव आणत त्या त्या मतदार संघातून आपल्या उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक मतदान करवून घेतले. सुरुवातीला विशेषतः सुनेत्रा अजित पवारांना किंवा दादा गटाच्या उमेदवारांना संघ भाजपा परिवाराची त्यातल्या प्रत्येक मतदाराची अजिबात मतदान करण्याची इच्छा नव्हती नेमके तेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे देखील तेच मत होते म्हणजे जे अजितदादा किंवा त्यांच्या गटाचे नेते एरवी अगदी आमच्या जखमांवर देखील साधे मुतायला तयार नसतात केवळ मुतायची तेवढी भाषा करतात थोडक्यात अगदी महायुती झाल्यानंतर देखील अजितदादा गट आमच्याकडे साधे ढुंकून देखील बघत नाही त्यावर केवळ जबरी धडा त्यांना शिकवण्यासाठी मतदान तर दूर पण उमेदवारांचा साधा प्रचार देखील आम्हाला करायचा नाही हे जसे शिंदे यांना सांगण्यात असले तेच नेमके देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील संघ भाजपाच्या समस्त नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी तोंडावर सांगितले होते त्यामुळे अजितदादा स्वतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मनापासून हादरले घाबरले होते, जेव्हा शिंदे आणि फडणवीसांनी हि निवडणूक आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यासाठी जिंकायची आहे, उमेदवारांना जिंकून आणायचे आहे असे कळकळीचे आव्हान केले, फडणवीसांनी त्यानंतर जातीने लक्ष घातले तेव्हा कुठे वातावरण बदलले आणि संघ भाजपाने जरी अजितदादा यांच्या उमेदवारांना त्यानंतर अगदी मनापासून मतदान केलेले असले तरी अगदी शंभर टक्के सत्य माहिती अशी कि एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी मात्र नक्की विरोधात मतदान केले आहे…
www.vikrantjoshi.com
आता नेमकी दुसरी बाजू सांगतो त्यावरून फडणवीस आणि अजितदादा या दोन्ही नेत्यांच्या वृत्तीत आणि संस्कारात नेमकी कशी तफावत आहे तुमच्या ते लगेच लक्षात येईल. जेथे जेथे अजित पवार गटाचे उमेदवार उभे होते त्या साऱ्याच मतदार संघात अजित पवार काय अगदी शरद पवार गटाच्या मतदारांनी नेत्यांनी कार्यकार्त्यांनी अगदी मनापासून काम केले आणि मतदान देखील केलेले असल्याने थेट सुप्रिया सुळे यांचा पराभव मला दादांना मिळालेल्या या सहकार्यामुळे अगदी समोर दिसू लागला आहे पण दादा गटाच्या उमेद्वारांव्यतिरिक्त राज्यातइतरत्र जे महायुतीचे उमेदवार उभे होते तेथे दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी अजिबात मतदान केले नाही त्यातल्या बहुतेकांचे मतदान महाआघाडीला झालेले आहे त्यांनी उद्धव ठाकरे तसेच शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे आणि हीच नेमकी वस्तुस्थिती आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि आपले कार्यकर्ते आपले नेते महायुतीच्या उमेदवारांना अजिबात सहकार्य करीत नाहीत हे स्वतः अजित पवारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वास्तविक फडणवीस पद्धतीने जातीने लक्ष घालत कडक भूमिका घेत, ज्या मोदी यांनी मला वाचविले आणि राष्ट्र घडविले त्या मोदींसाठी तरी निदान महायुतीचा प्रचार मनापासून करा आणि महायुतीलाच मतदान करा असे पायाला भिंगरी लागल्यागत फिरून या मतदार संघातून वातावरण बदलविणे गरजेचे असतांना वरून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या चुकीच्या वागण्याकडे आपणहून जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याची माहिती आता उजेडात येते आहे जे अतिशय धोकादायक ठरले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांनी बारामती आणि त्यांचे उमेदवार असलेल्या चार पाच मतदसरसंघात तेवढे लक्ष घातले विशेष म्हणजे मोठ्या खुबीने आणि फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील उदयन राजे भोसले पद्धतीचे कट्टर शत्रू आपलेसे करून घेतले, लबाड अजित पवारांनी नेहमीप्रमाणे इतरांना खड्ड्यात ढकलून त्यांच्या खांद्यावर पाय ठेवत आपले हित तेवढे नेमके साधून घेतले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी