शी ! उद्धवा तद्दन फाल्तुक तुझे विचार :
17 मे शुक्रवार सायंकाळी मुंबईत लागोपाठ दोन सभा झाल्या, शिव तीर्थावर नरेंद्र मोदी यांची प्रचार सांगता जाहीर सभा आणि महाआघाडीची बीकेसी मधली जाहीर प्रचार सांगता सभा. दोन्ही सभा मी डोळ्यात तेल घालून बघितल्या आणि ऐकल्या देखील. सभा आटोपल्यानंतर मला माझे नेमके बालपण आठवले म्हणजे सुरुवातीला मी शाळेतला अत्यंत हुशार विद्यार्थी होतो तेव्हा वर्गातले गावातले सुसंस्कृत सुशिक्षित घरातले हुशार विदयार्थी विद्यार्थिनी माझे मित्र मैत्रिणी होते, नंतर अचानक माझे शिक्षणातले लक्ष जसे उडाले तसे ते हुशार विद्यार्थी माझ्यापासून दूर निघून गेले शेवटी शेवटी दहावीला तर अगदीच टवाळखोर काहीसे बिघडलेले माझे मित्र झाले ज्यांना गावाने ओवाळून टाकले त्यांच्या घरी मी वेळ घालवीत असे, अर्थात दहावी कसाबसा पास झाल्यानंतर मी बाहेर पडलो आणि पुन्हा आयुष्याची घडी अतिशय व्यवस्थित बसविली तो भाग वेगळा. पिंजरा सिनेमातला मास्तर मला कालचे सभेतले उद्धव अनुभवताना देखील आठवला, उद्धव यांनी आपणहून आजची जी अवस्था करवून घेतली, वाईट वाटले रागही आला. जाहीर सभेत उद्धव यांच्या आजूबाजूला सिनेमातला सत्येन कपू किंवा ओम शिव पुरी तो बिन बुडाचा उगाच लादलेला वर्गातल्या ढ विद्यार्थ्यांसारखा मल्लिकार्जुन खारगे ज्याच्या सभेला महाराष्ट्रात दहा माणसे जमणार नाहीत, वर्गातला द्वाड खोडकर आणि उगाचच अद्वातद्वा बोलणाऱ्या विदयार्थ्यासारखे नाना पटोले, ज्या उद्धव यांच्या शेजारी एकेकाळी देशातले राज्यातले नामवंत बसायचे तेथे त्यांच्या कानाला कान लावून बसलेले संजय राऊत, जणू माधुरी दीक्षितच्या कडेवर अभिजित बिचुकले, पाठीमागे सतत तोंड पुढे काढून लक्ष वेधून घेण्याचा उगाच प्रयत्न करणारा नरेंद्र वर्मा आणि महाभारतातले गुफी पेंटल उर्फ कंस मामा शरद पवार, राग आला नाही रडू आले उद्धव यांची आजची हि दयनीय शोचनीय अवस्था बघून, समोर श्रोते कोण तर बहुसंख्य ओवाळून टाकलेले मुंबईतल्या वादग्रस्त परिसरातले टगे मुसलमान आणि त्या मुसलमानांचे उघड समर्थन करणारे उद्धव ठाकरे !! वाचकहो, मला विश्वास आहे कालचे हे दृश्य बघून वर स्वर्गात अगदी शंभर टक्के माँ साहेब आणि बाळासाहेब दोघेही ढसाढसा रडले असतील…
www.vikrantjoshi.com
मुंबईतल्या आणि राहिलेल्या अन्य निवडणूका जवळपास 17 तारखेलाच नरेंद्र मोदी यांनी जिंकल्यात जमा आहे, नरेंद्र मोदी यांच्या सभेला तेही राज ठाकरे, विषय येथेच संपलेला आहे मित्रहो वरून राज्याचा अत्यंत लाडका सखा नेता देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातल्या समस्त मराठा समाजाचे जिवलग व लाडके अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. आणखी एक महत्वाचे सांगतो, वास्तविक अगदी आत्ताआत्तापर्यंत राज्यातल्या बौद्ध दलित मंडळींचे लाडके होते प्रकाश आंबेडकर मात्र यावेळी देखील त्यांची काहीशी चंचल काहीशी संशयास्पद खूपशी गोंधळलेली लीडरशिप नेहमीप्रमाणे, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण प्रकाश आंबेडकर यांच्या या सततच्या धरसोड वृत्तीतून ते त्यांच्या समस्त संपूर्ण फॉलोअर्सच्या मनातून साफ उतरलेले असताना त्यांची जागा नेमकी त्याचवेळी रामदास आठवले यांनी घेतलेली आहे आणि हेच सारे नामवंत तेही नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या संगतीने त्या स्टेजवर बसलेले, केवळ बाजू घ्यायची म्हणून येथे मी उगाच काहीबाही सांगत नाही पण उद्धव यांचे विशेषतः या लोकसभा निवडणूक प्रचारात एकप्रकारे थेट अधःपतन झालेले आहे त्याचवेळी भाजपाची कणखर हिंदुत्वाची भूमिका आणि राज ठाकरे यांची जाहीर या महायुतीला साथ, हे घडले बरे झाले अन्यथा मराठी माणसाला फार मोठया नैराश्याला नक्की सामोरे जावे लागले असते. तुमच्या माझ्या मनातली यादिवसातली नेमकी घालमेल सांगतो आणि त्यावर उत्तर देखील देतो. महायुतीकडून काही भागात नक्कीच अतिशय चुकीचे काहीसे बदमाश काहीसे बदनाम उमेदवार दिलेले आहेत हीच वस्तुस्थिती आहे आणि या अशा उमेदवारांना मतदान का करावे या वैचारिक गोंधळात तुम्ही आणि आम्ही पण कृष्ण जे म्हणाले होते ते येथे मला आठवले कि पांडवांकडले सारेच चांगले आणि कौरवांकडे सारेच दुष्ट दुर्जन असे अजिबात नाही पण कौरव जिंकले तर राजा दुर्योधन असेल आणि पांडव जिंकले तर राजा होण्याचा मान युधिष्ठिर यास मिळणार आहे, मित्रांनो येथेच माझा वैचारिक गोंधळ संपला आहे आपल्याला कौरवांच्या हाती सत्ता सोपवायची नसल्याने आवडो अथवा न आवडो तुम्हा आम्हा सर्वांना देशाचा युधिष्ठिर निवडायचा आहे…
17 मे शुक्रवारच्या बीकेसी प्रचार सांगता सभेच्या महाआघाडीच्या विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेला मुस्लिमांचा मोठा जनसमुदाय आणि उद्धवजींच्या भाषणावर मराठी नव्हे तर मुसलमानांच्या वेळोवेळी टाळ्यांचा कडकडाट, अलीकडे अगदी मनापासून उद्धव यांची मुसलमानांना मदत सहकार्य प्रेम आणि मैत्री त्याचा हा परिपाक होता थोडक्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात यापुढे मुस्लिमांनी थेट उद्धव यांच्या शिवसेनेला डोक्यावर घेणे आणि उद्धव यांनी देखील राज्यातल्या हिंदूंना मराठी माणसाला अनेकदा संकटात आणणाऱ्या बिलगणे, उद्धव यांची मुस्लिम धार्जिणी भूमिका आपल्या सर्वांसाठी भीतीदायक आहे, भविष्यात मोठ्या संकटाला त्यातून मराठी माणसाला नक्की सामना करावा लागणारा आहे. शरद पवार यांच्या आडनावात ‘ वापर ‘ हा जो शब्द आहे तो शब्द उद्धव यांना नक्की लागू पडतो. एक मान्य कि शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव सभोवतालची गर्दी नक्की कमी झालेली नाही पण अलीकडे ती गर्दी हिंदूंपेक्षा मुसलमानांची आहे, उद्धव यांच्या सभेत भगव्या ऐवजी हिरवा किंवा इतर रंगाचा देखावा हे दृश्य प्रचंड काळजीत टाकणारे आहे, हिंदूंचे मन विचलित करणारे आहे. मला आजपर्यंत नेमके जे वाटत होते कि जसे अगदी सुरुवातीपासून संघाला हे हिंदू राष्ट्र करायचे आहे तसे ते देशातल्या विविध अनेक हिंदूवादी राजकीय पक्षांना हिंदू संघटनांना विशेष म्हणजे उद्धव यांच्या आजच्या सेनेला देखील वाटत असावे असेच साऱ्यांना वाटते वाटायचे पण रा स्व संघाचे फडके देशाचे निशाण होऊ शकत नाही, एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव यांनी काढलेले हे संतापजनक उदगार, मुसलमानांना खुश करण्यासाठी केवळ, उद्धव यांनी एवढी पातळी सोडावी आणि पवित्र भगव्या ध्वजाला त्यांनी फडके म्हणून संबोधणे, खेदाने हेच सांगावेसे वाटते कि आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र नव्हे तर माणिकराव ठाकरे यांचे सख्खे भाऊ म्हणून अधिक शोधायला लागले आहेत. संघाचा ध्वज भगवा आहे पण संघातल्या एकानेही देशाच्या तिरंग्याचा अपमान तिरस्कार राग द्वेष केला कधीही ऐकिवात नाही, उचलली जीभ लावली टाळूला, पद्धतीने उद्धव यांची भाषा नसावी. बाळासाहेबांच्या सभांना जमणारी भगवी गर्दी जेव्हा उद्धव यांच्या सभांना हिरव्या रंगात परवर्तीत झाली, मन अस्वस्थ झाले…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी