भाजपा संघाचे होते पानिपत नसे हुकमत :
माझी पत्रकारिता हिंदुत्वाशी एकनिष्ठ पण इतर धर्मियांविषयी राग द्वेष असूया नक्की नाही, हे राष्ट्र हे राज्य बुडविण्यात इतर धर्मियांचा अनेकदा मोठा सहभाग त्यात त्यांचा डोळा हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडविण्यावर आणि हिंदुतर नेत्यांना, जात्यंधांना अगदी उघड सतत सहकार्य कोणाचे तर आपल्यातल्याच अनेक हिंदू नेत्यांचे अशावेळी हिंदूंच्या उरावर बसू पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्वतःला बलवान ताकदवान असणाऱ्या समजणाऱ्या नेत्यांना अंगावर घेत त्यांच्या ढुंगणावर शाब्दिक लाथा मारतांना मला म्हणाल तर मनस्वी म्हणाल तर असुरी आनंद होत असतो. आपल्या या राज्यातही दुरदैवाने हिंदूंमध्ये अजिबात एकी नाही, जे जातींचा आधार घेत आम्हा हिंदूंमध्ये तेढ निर्माण करतात त्यांना वास्तविक तेथल्या तेथे ठेचण्याची आवश्यकता असताना आम्ही बहुसंख्य हिंदू वरून या अशा नालायक नेत्यांना डोक्यावर घेत राज्यातल्या राष्ट्रातल्या समस्त हिंदूंची सुरक्षितता आपणहून धोक्यात आणतो त्यावर प्रत्येक मतदाराने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. यावेळी उद्धव ठाकरे पद्धतीचे हिंदू नेते हिंदुत्वापासून दूर गेल्याने मतदानावर मोठा फरक पडेल आणि राज्यातले हिंदुत्व धोक्यात येईल हा विचार अजिबात मनात आणू नका कारण आजवरचा निवडणुकांचा निकाल हे सांगतो कि महाराष्ट्रातला मतदार मग तो ग्रामीण असो वा शहरी किंवा सुशिक्षित असेल किंवा अडाणी अशिक्षित, मतदान मात्र तो मनातल्या विचारांची कुटुंबाव्यतिरिक्त अजिबात कुठेही चर्चा किंवा वाच्यता न करता करतो, त्यातून उघड झालेली माहिती अशी कि बहुसंख्य मतदारांनी प्रामुख्याने हिंदुत्वाला आणि देशाला जगाच्या नकाशावर उच्च स्थानी नेणाऱ्या नेतृत्वाला पर्यायाने नरेंद्र मोदी समर्थित उमेदवाराला मतदान केलेले आहे, महाराष्ट्रातून महायुतीला केवळ 12-15 जागा मिळतील, विरोधकांचा हा अंदाज नक्की चुकीचा ठरणार आहे…
www.vikrantjoshi.com
संघ भाजपाबाबत माझा किंवा बहुतेकांचा जो संभ्रम होता कि संघ भाजपाला हिंदूंशिवाय इतर धर्मियांचा सहवास सहभाग नको आहे ज्यात त्यांचे मोठे अपयश दडलेले आहे किंबहुना हिंदुतर मतदारांना भारतीयांना आपल्याही राज्यातल्या मतदारांना संघ भाजपा सत्तेवर आले असले कि जी त्यांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना असते त्यावर संघ भाजपाकडे नेमका उपाय किंवा नेमके उत्तर नाही का, मला अलीकडे दिवंगत संघमहर्षी मा गो वैद्य यांच्या लिखाणातला नेमका एक संदर्भ मिळाला कि संघाच्या हिंदुराष्ट्रात मुसलमान ख्रिश्चन बौद्ध धर्मीय आदी अहिंदूंना देखील मोठे महत्वाचे स्थान आहे विशेष म्हणजे संघ भाजपाने त्यांची हि भूमिका देशातल्या अहिंदू नेत्यांपर्यंत नेमकी पोहोचवली असल्याने अहिंदू नेते अलीकडे फार मोठ्या प्रमाणावर भाजपा महायुतीकडे आधी झुकले नंतर झपाट्याने सामील होताहेत झाले आहेत पण संघ भाजपा अहिंदू जनतेसाठी अजिबात असुरक्षित नाही नेमका हा विचार अद्याप व्यापक पद्धतीने अहिंदू सर्वसामान्य लोकांमध्ये न बिंबवल्या गेल्याने आजही विनाकारण देशभरात किंवा आपल्या या राज्यात देखील विशेषतः निवडणुका दरम्यान विनाकारण भाजपा महायुतीला अनेकदा मोठा फटका बसतो. सर्वसमावेशक संघ भाजपा हि भूमिका झपाट्याने लोकांच्या हृदयात बिंबविणे मोठे गरजेचे आहे. वैद्य म्हणतात तेच नेमके सत्य आहे कि मुसलमान ख्रिश्चन बौद्ध सारेच हिंदू होऊ शकतात. जो या देशाचा इतिहास, परम्परा, संस्कृती आपली मानतो, या देशाला जो आपली मातृभूमी समजतो, तो हिंदू. भलेही त्याची उपासना कोणतीही असो. कुराण व पैगंबर मानणारा मुसलमान आणि बायबल व येशू मानणारा ख्रिश्चन जर भारताची परम्परा आणि संस्कृती मानणारे असतील तर तो संघाच्या दृष्टीने हिंदूंच्या व्याख्येत येतो आणि भाजपाची व्याख्या देखील अजिबात वेगळी नाही. विशेषतः मुसलमान व ख्रिश्चन यांनी भारत हिच आपली मातृभूमी मानावी तसेच येथल्या परम्परेशी संस्कृतीशी एकरूप राहावे व्हावे एवढी माफक इच्छा जी संघाची आहे तीच नक्की भारतातल्या प्रत्येक हिंदू नागरिकांची आहे, असे मला वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे केवळ हिंदूंचा विकास आणि इतर धर्मियांकडे दुर्लक्ष पद्धतीची संकुचित भूमिका कधीही संघ भाजपाची नसल्याने त्यांच्याविषयी किंवा कुठल्याही हिंदू संघटना किंवा राजकीय पक्षांविषयी अहिंदूंनीं उगाच संशय किंवा आकस
बाळगू नये….
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी