प्रियांका चतुर्वेदी डॉ श्रीकांत शिंदे झालेत वांदे …
राजकारणात मोठी गम्मत असते, अगदी महाराष्ट्रात देखील राजकीय इतिहास तपासला तर तुमच्या ते लक्षात येईल कि राजकारणात जाणूनबुजून लादलेल्या नेत्यांच्या मुलांना फारसे भवितव्य नसते. त्यांची अवस्था राजीव कपूर, परीक्षित सहानी, तुषार कपूर, पुरु राजकुमार पद्धतीची होते; म्हणजे लादल्या गेल्याने अशा फिल्मी घराण्यातल्या मुलांचे नाही म्हणायला चार दोन सिनेमे येतातही पण त्यांच्यावर लवकरच “फ्लॉप” असा शिक्का बसतो आणि ते जसे पडद्या आड जातात नेमके तसेच, राजकीय घराण्यातल्या पुढल्या पिढीचे होते… म्हणजे काही बापापेक्षा वरचढ ठरतात आणि कित्येकांचा लवकरच अविनाश वसंतराव नाईक होतो तर काही नेत्यांची मुले बापाच्या चार पावले पुढे निघून जातात, बापसे बेटा सवाई निघतात…त्यातले एक डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे, नशिबाने यांचा बाप एकनाथ शिंदे आहे म्हणजे दुधात साखर फारतर म्हणता येईल, पण माझे वाक्य लिहून घ्या, समजा डॉ श्रीकांत आणि एकनाथजी या दोघात काही नाते नसते तरीही बुद्धिमान धडाकेबाज कष्टाळू डॉ श्रीकांत नक्कीच राजकारणात उतरले असते, खासदारही झाले असते राजकारणात नक्की पुढे गेले असते… आणि यापद्धतीच्या उत्स्फूर्त उत्साही नेत्यावर आणि त्यांच्या मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा राजा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याविषयी उबाठा सेनेच्या खासदार एक जबाबदार तेही महिला नेत्या, राज्याबाहेरची महिला बेजाबदार जाहीर वक्तव्य करून शिंदे पिता-पुत्राला खालच्या भाषेतून डिवचते चिडवते, “मेरा बाप गद्दार है” या त्यांच्या वाक्यावर, राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रियांका चतुर्वेदी काहीही करू शकतात हेच त्यातून सिद्ध होते…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेल्या शब्दाला जागणारे आहेत! त्यांनी रवींद्र वायकर याना लोकसभेला उमेदवारी देणार म्हणजे देणार, शब्द दिला होता, जेव्हा प्रियांका एकनाथ यांना मला नेमकी हि उमेदवारी द्या, आग्रह करीत होत्या, त्यावर शिंदे यांनी स्पष्ट नकार दिला, ज्याचा बदला प्रियांका यांनी असा खालच्या पातळीवर येऊन घेण्याचा प्रयत्न केला. संजय दिना पाटील यांच्या प्रचार सभेत त्यांनी “मेरा बाप गद्दार है,” पद्धतीचे उद्गार एकनाथजी आणि डॉ श्रीकांत विषयी काढले आणि हे वाक्य आश्चर्य म्हणजे राज्यातल्या विविध विचारांच्या प्रत्येक मराठी व्यक्तीला मनोमन एवढे झोंबले कि जणू प्रियांका यांनी समस्त मराठी जनतेचा बाप काढला किंवा गद्दार ठरविले. वास्तविक नेमक्या गद्दार तर तुम्ही कि एकाचवेळी दोन दोन ठिकाणी वाकडी नजर ठेवून जेथे साधले त्यांचे काही दिवस सर्वस्वी होऊन राहण्याची वादग्रस्त भूमिका घेता… अगदी प्रसंगी सर्व पद्धतीची पातळी सोडून म्हणून शीतल म्हात्रे मग तुमच्या दावोस मधल्या रम्य आठवणींना वाट मोकळी करून देतात. प्रियांका चतुर्वेदी यांच्या अशा हलकट वक्तव्यामुळे जसे संजय दिना पाटील यांना निवडणुकीत फटका बसणार आहे, प्रियांका यांना थांबविण्याचे मातोश्रीवरून तडकाफडकी आदेश निघाले अन्यथा प्रियांका जेथे जेथे ओकल्या असत्या तेथे तेथे विरोधकांचा नक्की फायदा झाला असता. प्रियांका चतुर्वेदी यांची लवकरच राज्यसभेची मुदत संपत असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या सतत शिंदे पिता-पुत्राच्या संपर्कात होत्या, काहीही करून लोकसभेत पुन्हा जायचे या असुरी राजकीय ईर्ष्येपोटी त्या स्वतः या पद्धतीची गद्दारी थेट त्यांच्या लाडक्या आवडत्या नेत्याशी आदित्य यांच्याशी करीत होत्या, मला मग सहजच एक घडलेला किस्सा आठवला कि नवरा कामाला दुबईत आणि बायको इकडे भलत्याच पुरुषाच्या प्रेमात, जेव्हा हे नवर्याच्या लक्षात आले त्याने बायकोचा कुऱ्हाडीने खून केला होता. गद्दारी करण्याची नेमकी वृत्ती प्रियांका आणि त्यांच्या नेत्याची उद्धव यांची, ज्या उद्धव यांनी भाजपापासून तर कुटुंब सदस्यांपर्यंत केलेल्या गद्दारीवर मला एक कादंबरी लिहिता येईल आणि याच प्रियांका भट्टी जमली नाही म्हणून संतापून यापद्धतीने गलिच्छ वक्तव्य करून मोकळ्या होतात जे वाक्य येथे वारंवार लिहायला देखील कसेसेच वाटते…
जेव्हा प्रियांका असे चुकीचे शिंदे पिता-पुत्रावर बोलून गेल्या तेव्हा त्यादिवशी मी नेमका डॉ श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात आढावा माहिती नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी फिरत होतो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, प्रियांका चतुर्वेदी यांचे हे भाषण वाऱ्यासारखे अख्ख्या मतदार संघात पसरले आणि उबाठा सेनेच्या वैशाली दरेकर यांनी मोठा धसका घेतला, कारण या हलकट वक्तव्यातून मोठी सहानुभूती थेट डॉ शिंदे यांना मिळाली… तसेही ते निवडून तर येणार आहेतच पण या अशा पद्धतीच्या बेजवाबदार भाषणातून थेट उबाठा सेनेचे मोठे नुकसान होऊ शकते नेमके हेच लक्षात आल्याने यापुढे प्रियांका यांची बडबड थांबविण्याचे आदेश मातोश्रीवरून निघाले आहेत, डॉ शिंदे यांचे मताधिक्य वाढणार आहे, प्रियांका यांची मोठी चूक झालेली आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी.