अबब ! हिंदुत्वावर लाथ मुसलमानांना आधी साद आता साथ :
यादिवसात माझे मन कमालीचे अशांत अस्वस्थ आहे कारण जे कानावर पडते आहे पडले आहे तो प्रकार महाभयानक आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शिवसेना भवनात किंवा मंत्रालयात उद्धवजींभोवताली वाढलेली मुसलमानांची वर्दळ सुरुवातीला यासाठी गोंधळात टाकणारी नव्हती कारण मुख्यमंत्री सभोवताली विविध कामाच्या निमित्ताने सर्वसामान्य येजा करतात हे फारसे नवीन नाही किंबहुना मुख्यमंत्री असतांना अंतुले यांनी जरी उर्दू शाळा किंवा मशिदी बांधल्या, आर्थिक दृष्ट्या मजबूत केल्या, मुसलमानांना अगदी उघड ते जरी आर्थिक सहकार्य किंवा विविध माध्यमातून मदत करायचे तरीही हिंदू देखील त्यांना बिलगून असायचे,हिंदूंना देखील हा धाडसी मुख्यमंत्री मनापासून आवडायचा, नेमके तेच मला उद्धव बाबत वाटत होते पण घडले भलतेच, ज्याला कौतुकाने खांदयावर घ्यावे त्यानेच कानात मुतून ठेवावे किंवा पूर्वी मी सात बंगल्याला ज्या इमारतीमध्ये राहत असे तेथल्या एका गृहस्थाने आपल्या लेकीला कौतुकाने फिरण्यासाठी मित्रासंगे दुबईला आठ दिवस पाठविले, त्या गृहस्थाने मित्राच्या लेकीला त्या आठ दिवसात थेट प्रेग्नन्ट केले, नेमके असेच उद्धवजी हिंदूंबाबत वागले त्यांनी मराठी माणसाला थेट फसविले, एखाद्या लोकसभा मतदार संघात समजा मुसलमान मशिदीत उद्धव सेनेच्या अमुक एखाद्या उमेदवाराला मतदान करा, असा फतवा निघाला तर आपण एकवेळ मनाची समजूत घालू पण घडले भलतेच आहे, जेथे जेथे उद्धव यांच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत असतील त्या सर्वानाच समस्त मुस्लिमांनी मतदान करावे असे थेट आदेश त्यांना देण्यात आले आहे जो प्रकार अतिशय गंभीर घातक आहे, याचा सरळ अर्थ असा कि उद्धव यांनी शरद पवारांच्या नादी लागून हिंदुत्वावर आणि मराठी बाण्यावर लाथ मारली हा एकमेव अर्थ त्यातून निघतो, महाराष्ट्राला हादरवून टाकणारा हा किळसवाणा प्रकार…
www.vikrantjoshi.com
उद्धव ठाकरे यांचा खरा इतिहास काय तर राजकीय असुरी महत्वाकांक्षेपोटी जो कोणी त्यांच्या आडवा येतो मग तो सख्खा बाप असेल भाऊ असेल कुटुंब सदस्य असेल किंवा असामान्य शिवसेना नेता असेल, उद्धव असा नेम धरतात कि पुढे लवकरच त्याचा गेम होतो, यादी मोठी आहे, लांबलचक आहे अगदी थेट बाळासाहेब ठाकरेंपासून तर जीवाला जीव देणारा भाऊ राज ठाकरे, आनंद दिघे, वहिनी स्मिता ठाकरे आणि बहुसंख्य जीवाला जीव देणारे मनोहर जोशी पद्धतीचे शिवसेना नेते, काहींना उद्धव यांनी राजकीय जीवनातून उठविले काहींनी उद्धव यांच्या स्वभावाला दहशतीला कंटाळून घर सोडले, शिवसेना सोडली पुढे पुढे मग आपणहून एकनाथ शिंदे पद्धतीच्या चतुर नेत्यांनी शिवसेना सोडली उद्धव यांची साथ सोडली तरीही उद्धव यांची सर्वसामान्य मतदारांच्या डोळ्यातली धूळफेक, आजही अनेक भाबडे त्यांच्या पाठीशी उभे आहेत हि वस्तुस्थिती आहे, नेमके तेच मला सर्वसामान्य मतदारांना मराठी बंधू भगिनींना सांगायचे आहे कि आता पूर्वीची ती बाळासाहेबांची शिवसेना नाही जी केवळ मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी होती, उद्धव यांच्या मनमानी कारभारामुळे मराठी माणसाचा बुलंद आवाज आता निदान मातोश्रीवर तरी नक्की लोप पावला आहे, उद्धव यांचे मराठी प्रेम बेगडी कसे हे उघड झाले आहे. नेमके हे का घडले तर कारण सरळ आहे, उद्धव यांना अगदी मनातून थेट नरेंद्र मोदी विषयी सख्त नफरत आहे प्रचंड द्वेष आह खूप राग आहे आणि हे तर मुसलमानांचे ठरलेले आहे कि जो मोदी याना चार चौघात अपमानित करतो तो हिंदू नेता त्यांना मनापासून आवडतो. उधव ठाकरे यांना आता राज्यात किंवा देशपातळीवर हिंदुत्व मिरविणारी सत्ता नको आहे त्यातून त्यांना मुसलमानांचा आणि मुसलमानांना त्यांचा लळा लागलेला आहे…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करतांना मुंबईतला राज्यातला समस्त जाती समूहातील मराठी माणूस शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणला त्यात सुशिक्षित
मराठी वर्ग ते थेट कामगार थोडक्यात अगदी सामान्य मराठी माणूस विशेष म्हणजे त्यात बौद्ध किंवा आंबेडकरवादी, ब्राम्हण मराठा ओबीसी थोडक्यात साऱ्याच मराठी समाजाची मोळी बांधून विरोधकांना घाम फोडला, मराठी माणसाला खऱ्या अर्थाने ताकद दिली मोठे केले, सत्तेत आणले ज्यातून अनेक प्रभावी नेते तयार केले तयार झाले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे दोघांमध्ये मोठा फरक असा कि बाळासाहेबांना सत्ता आणि पैसा दोन्हींचा अजिबात मोह नसल्याने त्यांनी अनेकांना इतरांना फार मोठे केले ज्यातून शिवसेना गगनाला भिडली आणि उद्धव यांचे नेमके उलटे आहे त्यांना सत्ता आणि पैसा दोन्ही बाबींचा प्रचंड मोह त्यातून त्यांनी आपल्याच सेनेतल्या भल्याभल्यांची पंख छाटायला जशी सुरुवात केली त्या लोभातूनच आज शिवसेना आणि मराठी माणूस रस्त्यावर आला आणि मुसलमान नेमका गैरफायदा घेत आता उद्धव यांच्या डोक्यावर जाऊन बसले आहेत हे बघून बाळासाहेब नक्कीच स्वर्गातून टाहो फोडत असतील हे निर्विवाद आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी