महायुती कशी पिछाडीवर, महाआघाडी का बाजीगर :
यावेळी महाराष्ट्रातील मीडिया आणि सोशल मीडिया बाबत विशेषतः भाजपा आणि महायुती पिछाडीवर असून काँग्रेस आणि महाआघाडीने मोठी आघाडी घेतली आहे, कसबा विधानसभा पोटनिवडणुकी प्रचारादरम्यान शरद पवारांनी जे उघड जाहीर वादग्रस्त वक्तव्य केले होते, मोदींना पराभूत करायचे असेल तर प्रत्येकाने मुसलमान मतदारांना सोबत घेत मतदान करायला हवे, हे जे वक्तव्य पवारांनी केले होते तेच यावेळी पुनःपुन्हा यासाठी मीडिया सोशल मीडियातून दाखवले जाते आहे कारण पवारांच्या या वक्तव्याचा मोठा फटका भाजपा महायुतीला याच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत बसला होता, भाजपाचा थेट पुण्यात पराभव झाला होता किंबहुना ज्या सुनेत्रा पवारांना एकत्र असतांना पवार कुटुंबातून विशेषतः प्रतिभा शरद पवार यांच्याकडून बऱ्यापैकी सासुरवास सहन करावा लागला टोमणे सहन करावे लागले आज मृदुभाषी सुसंस्कृत मितभाषी किंवा भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे करून घेणाऱ्या याच सुनेत्रा अजित पवारांना थेट त्यांच्याच पवार कुटुंबातून त्या उद्धट उर्मट कशा, मुद्दाम यापद्धतीने त्यांची बदनामी यासाठी केल्या जात आहे तसा सतत अपप्रचार मुद्दाम केल्या जात आहे कारण शरद पवार आणि प्रतिभा पवार जोडप्याला आपल्या लेकीचा, सुप्रिया सुळे पवारांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. महाराष्ट्रात एकंदर पाच टप्प्यात मतदान होत असून त्यापैकी दोन टप्प्यातले मतदान उरकले आहे आणि जेथे मतदान उरकले तेथे भाजपा महायुती मीडिया आणि सोशल मीडिया हाताळण्यात पूर्णतः अयशस्वी ठरलेली असून त्यावर महाघाडीचे काँग्रेसचे नियोजन अचंबित करणारे आहे, उरलेले मतदान आटोपण्यापूर्वी विशेषतः महायुतीने आणि भाजपाने चांगला वाईट प्रपोगंडा किंवा प्रसिद्धी घडवून आणणार्या मीडियाला सोशल मीडियाला योग्य पद्धतीने धडा शिकविणे, बेलगाम झालेल्यांना लगाम घालणे मोठ्या गरजेचे अत्यंत आवश्यक आहे…
www.vikeantjoshi.com
मुंबईतील महायुतीचे एक उमेदवार जेव्हा त्यांच्या विरोधात एका कमी खपाच्या इंग्रजी दैनिकाने अपप्रचार करायला सुरुवात केली तेव्हा मोदींच्या या खास उमेदवाराने थेट त्या इंग्रजी दैनिकाचे कार्यालय गाठले आणि संपादकाला जाब विचारला कि कालपर्यंत तुमचा हरामखोर मालक आमच्याकडून व्यक्तिगत फायद्याचे मलिद्याचे कामे करवून घेत असतांना तुम्हाला भाजपा महायुती मनापासून आवडायची आणि आज माझ्या आमच्या विरोधात तुमची भूमिका, एवढे का तुम्ही निर्लज्ज आहात, अर्थातच त्या संपादकाला घाम फुटला, नेमके हे असेच वागणे बहुतेक मीडियाचे आहे असते, थोडक्यात अशा निर्लज्ज बेईमान मीडियाला महायुतीचे नेते का पाठीशी घालताहेत, हेच समजेनासे झाले आहे. तिकडे केवळ रामदास आठवले यांच्या भरवंशावर दलितांचे मतदान आपल्याला मोठ्या प्रमाणावर होईल, हा भ्रम डोक्यातून काढत महायुतीच्या भाजपाच्या नेत्यांनी विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे असंख्य शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी विशेषतः भाजपावर मनापासून प्रेम करणारे आहेत त्या समस्त सरकारी मंडळींच्या बैठका घेत त्यांना जर विश्वासात घेतले तर दलितांचे मोठे मतदान आजही फिरू शकते जे महायुतीला नक्की पडू शकते कारण दलित मतदार नेत्यांपेक्षा सरकारी नोकरी करणाऱ्यांचे लगेच आणि अधिक ऐकतात पण हे प्रयत्न का तोकडे पडताहेत याचा भाजपा नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे…
आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे भाजपा व महायुतीचे पूर्णतः दुर्लक्ष होते आहे झाले आहे पण अजूनही वेळ निघून गेलेली नाही. मुद्दा असा कि माजी मंत्री नसीम खान आणि मुस्लिमांचे आणखी एक प्रभावी नेते अबू आझमी, त्यांच्या स्वतःच्या पक्षांवर अतिशय नाराज आहेत, हे दोघेही महायुतीच्या आवतनाची वाट पाहत असतांना अद्याप महायुतीचा एकही नेता या दोघांकडे फिरकलेला नाही, इतर अनेक वादग्रस्त मंडळींना छातीशी कवटाळणारी भाजपा आणि महायुती, तिकडे याच मुसलमानांच्या मोठ्या नेत्याकडे नवाब मलिक यांच्याकडे पाठ फिरवून आहे, वास्तविक यानंतर नवाब मलिक आपल्या कन्येला विधान सभा निवडणुकीत उतरवणार असल्याने त्यांना देखील महायुतीचा मनापासून प्रचार करायचा आहे, तिकडे देखील महायुतीचे दुर्लक्ष, बाबा सिद्दकी यांचाही थेट अजित पवार निवडणूक प्रचारात फारसा उपयोग करवून घेतांना दिसत नाहीत शिवाय अब्दुल सत्तर किंवा हसन मुश्रीफ पद्धतीचे जे आणखी काही प्रभावी मुस्लिम नेते अगदी सहज महायुतीकडे उपलब्ध आहेत त्यांना देखील मुस्लिम वस्त्यांमध्ये फारसे प्रचारात उतरविण्यात आलेले नाही, सांगण्याचा एकमेव उद्देश हा कि महायुतीकडे मुस्लिम मतदान वळविण्यात जे नेते महायुतीला उपयोगी ठरणार आहेत ठरले असते त्यांच्याकडे पूर्णतः किंवा जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या गेले केल्या जाते आहे, विरोधासाठी विरोध असे वातावरण निर्माण होण्यापेक्षा महायुतीच्या मुख्य प्रवाहात मुसलमानांना सामील करवून घेण्यात ऐन मोक्याच्या वेळी महायुतीने दुर्लक्ष करू नये…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी