कुठे उल्हास कोण बकवास :
लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर भाजपा वगळता महाआघाडी तसेच महायुतीच्या साऱ्याच घटक पक्षांना विचार करायचा आहे कि राज्यातले आपले नेमके स्थान काय आहे कुठे आहे कारण काँग्रेस नाही म्हणायला देशपातळीवरील प्रमुख पक्ष पण त्याच काँग्रेसचे महाराष्ट्रात स्थान अगदीच नगण्य आहे, राहुल गांधी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांची इभ्रत वाचवतात अन्यथा राज्यातल्या काँग्रेसमधल्या प्रत्येक नेत्याचे स्थान म्हणजे सिनेमात प्रमुख कलाकारांच्या मागे केवळ वाकडे तिकडे हातवारे आणि चित्रविचित्र हावभाव करीत नाचणार्या इतर दुर्लक्षित कोरस कलाकारांसारखे आहे, ना या नेत्यांच्या सभांना उत्स्फूर्त गर्दी असते ना त्यांचे भाषण ऐकण्यात जमवून आणलेल्या गर्दीला इंटरेस्ट असतो, नेते भाषण करतात तेव्हा जमलेले जमा केलेले श्रोते मातीतल्या रेघोट्या मारण्यात गुंग असतात. राज्यातल्या महाआघाडीत नेमकी उत्स्फूर्त गर्दी होते ती एकमेव उद्धव ठाकरेंच्या भाषणाला पण त्यांची प्रकृती अगदीच तोळामासा त्यामुळे कडक उन्हात त्यांच्यवर सभा घेण्यात मोठया मर्यादा आहेत, अर्थात यावेळी उद्धव ठाकरे यांचे राज ठाकरे किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभांना जमणाऱ्या विशाल गर्दीसारखे नक्की होणार आहे म्हणजे या दोघांच्या सभांना जशी गर्दी व्हायची होते पण मतदार मात्र मतदान त्यांच्या विरोधकांना करून मोकळे व्हायचे तेच यावेळी अगदी शंभर टक्के उद्धव यांचे देखील यासाठी होणं आहे कारण उद्धव यांचे हिंदुत्व फाट्याला मारणार्या शरदराव राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पद्धतीच्या महाआघाडीतल्या घटक पक्षांना जाऊन बिलगणे, महत्वाचे म्हणजे भाजपाकडे गर्दी जमविणार्या नेत्यांची यादी लांबलचक आहे अगदी थेट उत्तर प्रदेशातले योगी आदित्यनाथ देखील राज्याच्या कानाकोपऱ्यात येऊन सभा गाजवुन मोकळे होतात, मात्र मोदी आणि फडणवीस महाराष्ट्राच्या बाबतीत नेमके आणखी काय काय करणार आहेत हे ऐकण्यासाठी महायुती व्यतिरिक्त इतरही वेगळ्या विचारांचे दर्शक श्रोते त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी करतात, त्यामुळे या दोघांनी व्यक्तिगत टीका तर करावीच पण राज्याच्या हिताचे नेमके कुठले प्रश्न हे दोघे सोडवणार आहेत त्यावर अधिक केंद्रित व्हावे कारण मोदी आणि फडणवीस दोघेही नेमके असे नेते कि ते जे बोलतात ते हमखास करून दाखवतात, इतर नेते मतदारांच्या तोंडात केवळ लॉलीपॉप कोंबून मोकळे होतात…
www.vikrantjoshi.com
लोकसभा निवडणूकी नंतर भाजप व्यतिरिक्त इतरांना आपण नेमके कुठे आहोत आपले राज्यात काय स्थान आहे त्यावर चिंतन करून विधानसभा निवडणुकांपूर्वी चौफेर पक्ष बांधणी करणे महत्वाचे ठरेल कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना दोन्ही मनसे रामदास आठवले प्रकाश आंबेडकर इत्यादी प्रमुख पक्ष राज्यातल्या केवळ काहीच भागात आपापले स्थान बळकट करून आहेत किंबहुना भाजपा खालोखाल आजही राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ओळख आहे डिमांड आहे महत्व आहे त्यामुळे लोकसभेला नेमके उद्धव हे भाजपा महायुतीला डोकेदुखी ठरून महायुती उमेदवारांच्या मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी कमी करतिल तरीही आज या क्षणाला महायुती अगदी सहज किमान 35 जागांवर विजय मिळविल यात शंका नाही अर्थात मोदी यांच्या होणाऱ्या सभा याच टक्केवारीत बदल घडवून आणून महायुतीला नक्की सुखद धक्का देतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे किंवा महाआघाडीच्या नेत्यांनी त्या ठाणे जिल्ह्यात प्रचारासाठी जाऊन आपला वेळ व्यर्थ खर्च करू नये तेथे भाजपा आणि शिंदे यांचा जनतेवर असलेला प्रभाव अचंबित करणारा आहे. ठाण्यासहीत अख्ख्या कोकणात उद्धव यांच्या नेतृत्वाची आणि पक्षाची झालेली घसरण, आश्चर्यजनक आहे अर्थात कोकणात तसेही शरद पवार यांचे व त्यांच्या राष्ट्रवादीचे स्थान सिनेमातल्या हास्य कलाकारासारखे आहे म्हणजे असलेत काय किंवा नसले काय. शरद पवार कोकणात रस्त्याने फिरले तर चार माणसे त्यांना रामराम करणार नाहीत, विदर्भात देखील पवार यांची तीच अवस्था आहे. राज्यातली मीडिया मात्र सतत शरद पवारांच्या पाठीशी का, त्यावर निवडणुका आटोपल्यानंतर फडणवीसांनी विधान सभा निवडणुका लागण्यापूर्वी नेमकी माहिती घेणे अत्यावश्यक आहे, धक्कादायक माहिती त्यातून उजेडात येईल…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी