फडणवीस वाला ये लो अंदर का मामला :
बालपणीचा माझा एक मित्र भेटला कि हमखास म्हणतो, तू जेमतेम दहावा वर्ग सेकंड क्लास मध्ये पास झालेला आहेस अन्यथा मी तुला देवेंद्र फडणवीस विषयात डॉक्ट्रेट मिळव, नक्की आग्रह धरला असता, अनेकांना माझ्या तोंडून नेमके आणि आगळे वेगळे फडणवीस कसे, ऐकायचे असते, नेमकी वस्तुस्थिती अशी कि मला सेक्स सिनेमा पेक्षा राजकारण विषयावर लिहायला बोलायला आवडते त्यात फडणवीस हा विषय समाविष्ट असेल तर आवडत्या मैत्रिणीने करकचून मुका घेतल्यागत मला आनंद होतो. तुम्हाला हे माहित आहे का कि विधी म्हणजे कायदा परीक्षेत देवेन्द्रजी संपूर्ण नागपूर विद्यापीठातून दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले होते, तर दोन विषयात त्यांना सुवर्ण पदके प्राप्त झाली होती, जर फडणवीस राजकारणात आले उतरले नसते तर त्यांनी उत्तम वकिली करायची, मनाशी ठरविलेले होते त्यात त्यांचे आदर्श जगविख्यात मनोहर वकील होते. विशेष म्हणजे देवेन्द्रजी नागपुरातले आजतागायतचे सर्वाधिक तरुण नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते, फडणवीसांनी नगरसेवक झाल्यानंतर सार्वजनिक जीवनात अगदी तरुण वयात अति व्यस्त असतांना देखील कायद्याची परीक्षा दिली ज्यात त्यांनी अतुलनीय यश मिळविले होते. मला आजतागायत फडणवीसांचे कितीतरी गुण मनापासून आवडलेले पण त्यांचा सर्वाधिक आवडणारा गुण जो सहसा इतर कुठल्याही कोणत्याही नेत्यांमध्ये अभावाने बघायला मिळतो, नेत्यांमध्ये फार कमी यशवंतराव चव्हाण, राजेंद्र पटणी, गणपतराव देशमुख उल्हास पवार अनंत गाडगीळ पद्धतीचे नेते बघायला मिळतात तयातलेच एक श्रीमान देवेंद्र फडणवीस, अलीकडच्या काळातला हा असा एकमेव टॉपचा नेता ज्याच्याकडे अगदी रात्री अपरात्री एकट्या असतांना देखण्या उफाड्या तरुण सुंदर स्त्रिया कायम सुरक्षित असतात, अमुक एखाद्या तरुणीने फडणवीसांकडे मोठा भाऊ या नात्याने नजरेने बघणे फारसे वेगळे त्यात नाही पण भेटायला येणारी तरुणी साक्षात अप्सरा जरी असली तरी देवेन्द्रजी त्या स्त्रीकडे एकतर खालची मान वर न करता बोलतात तिला मनापासून सहकार्य करतात, आणि भेटायला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे ते पोटची लेक किंवा सख्खी बहीण याच नजरेने बघतात…
www.vikrantjoshi.com
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा कि प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या आणखी दोन पावले पुढे फडणवीसांचे नेतृत्व, स्वतःच्या जातीपाती पलीकडले तरीही विरोधक त्यांना बामन म्हणून जेव्हा मुद्दाम डिवचतात चिडवतात तेव्हा मनापासून वाईट वाटते, मनातले सांगतो, नेमके सत्य सांगतो कि फडणवीसांच्या हाती महाराष्ट्र नक्की सेफ आहे विशेष म्हणजे फडणवीस किमान पुढली दोन दशके भाजपाला महाराष्ट्राला आणि प्रसंगी देशाला सुद्धा अगदी शंभर टक्के दीर्घकालीन उत्तम सशक्त प्रगत असे नेतृत्व देऊ शकतील पण त्यांच्या पायात पाय जेव्हा त्यांच्याच पक्षातले काही मूर्ख नालायक उपटसुम्ब अडकविण्याचा सतत इकडून तिकडून प्रयत्न करतात तेव्हा बासुंदी मध्ये थेट विषारी पाल पडल्याचा फील येतो. विशेषतः शेतकरी आणि मराठा समाजाच्या मागण्या अडचणी आणि त्यावर कायमचा तोडगा हा फडणवीसांचा चिंतेचा व चिंतनाचा विषय तरीही या दोन्ही विषयांवर त्यांना जेव्हा शरद पवार पुरुषोत्तम खेडेकर पद्धतीचे नेते मुद्दाम सतत बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा फडणवीस सर्वाधिक अस्वस्थ होतात. फडणवीसांच्या तोडीस तोड, साकारत्मक भूमिका घेणारा राष्ट्रभक्त आणि राज्यव्यापी प्रतिमेस तुल्यबळ ठरणारा दुसरा कुठलाही कोणताही नेता आपल्याकडे नाही याची खाजगीत स्वतः शरद पवार कायम खंत व्यक्त करतात त्यातून सूडाच्या राजकीय द्वेषापोटी अगदी सतत दररोज त्यांना अपमानित करण्याची अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत मात्र त्याचवेळी सय्यम राखीत फडणवीस प्रत्येक विरोधकांची तिरकस चाल मोडीत काढून मोकळे होतात. अहंकार करायला वेळ काढावा लागतो, सुदैवाने तो फडणवीसांकडे नसल्याने भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी ते केवळ नेमक्या कामांविषयी बोलून मोकळे होतात….
जेथे जेथे फडणवीस असतात किंवा जातात तेथे त्यांची सतत कायम सोबत करणार्या एका अधिकाऱ्याने मला जी नेमकी वस्तुस्थिती सांगितली ती तर नक्की अभिमानास्पद आहे म्हणजे फडणवीसांना एकांत मिळत नाही ते प्रवासात देखील नेमक्या कामांचा निपटारा करण्यात किंवा ज्या योजना त्यांना पुढे राबवायच्या आहेत त्याचे नियोजन किंवा अभ्यास करण्यात गुंतलेले असतात. विशेष म्हणजे आजतागायत आपल्या या राज्यातून जे जे नेते दिल्लीत कामानिमित्ते जातात किंवा जायचे त्यातल्या बहुतेकांच्या वाट्याला अपमान हमखास ठरलेले अगदीच तुरळक काही नेते ज्यांना दिल्लीतले नेते व अधिकारी ओळखतात पण मानसन्मान देतील असे अनेकांच्या बाबतीत क्वचित घडते याला अपवाद देवेंद्र फडणवीस, राजधानीतली व्यक्ती मग ती कितीही थोर असली तरी फडणवीसांशी अतिशय अदबीने बोलते त्यांनी आणलेल्या सार्वजनिक कामांवर लगेच निर्णय घेऊन मोकळी होते, फडणवीसांना अगदी दारापर्यंत सोडून सतत सन्मान देते, अशी फडणवीसांची केवळ देशभरात नव्हे तर ते जगात जेथे जातात तेथे तेथे देखील नेमके हेच घडते. उच्चशिक्षित, जगाचा अभ्यास, इंग्रजी हिंदी मराठी भाषेवर प्रभुत्व, आश्वासक भाषा आणि उगाच बडबड न करता नेमक्या विषयाला हात घालत अभ्यासपूर्ण बोलणे, थोडक्यात देशव्यापी नेत्याचे तंतोतंत गुण त्यांच्यात काठोकाठ भरलेले, फडणवीस आपल्या राज्याची शान आहेत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी