शी ! हेमंत जोशी, तुमच्या या भानगडी !!
सतत 44-45 वर्षे राजकीय पत्रकारितेची, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 रविवार वगळता दररोज 12 तास फक्त काम काम आणि आजही काम, माझे एक अख्खे कार्यालय केवळ विविध पुराव्यांनी शासकीय व राजकीय भानगडींच्या माहिती व कागदपत्रांनी तसेच विविध मराठीतील पुस्तकांनी खचाखच भरलेले त्यातले जवळपास सारेच मला तोंडपाठ, पत्रकारिता ध्येयवादी ध्येयवेडी पद्धतीची असायला करायला हवी जे मी करतो, अत्यंत महत्वाचे म्हणजे सतत 44-45 वर्षे ज्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या, दलाल, पत्रकार मीडिया आणि विविध राजकीय पक्षांच्या हाती सत्ता होती सत्ता आहे त्यातल्या प्रत्येकाचे धंदे, पैसे ओरबाडण्याची पद्धत, चांगली वाईट कामे व कृत्ये तसेच केलेल्या भानगडींचे तसेच विकृत वाईट किंवा उत्तम कार्याचे कामांचे पुरावे मला तोंडपाठ आहेत माझ्याकडे लेखी स्वरूपात देखील आहेत, या अशा प्रदीर्घ अनुभवातून अभ्यासातून फिरण्यातून बोलण्यातून संपर्कातून आपला महाराष्ट्र नेमका कोणाच्या हाती सुरक्षित आणि प्रगतिशील राहू होऊ शकतो, मला नक्की ठाऊक आहे माहित आहे, नेमका निष्कर्ष काढून गेली सतत दहा बारा वर्षे मी एक मिशन राबविण्याचा तेही विनापेक्षा सतत प्रयत्न करतो आहे आणि ते मिशन अर्थात ‘ मिशन फडणवीस ‘ आहे आणि हे मिशन राबवितांना कोणत्याही पदाची पैशांची अपेक्षा अजिबात न ठेवता मी व चिरंजीव विक्रांत जोशी हे मिशन राबवितो आहे कारण देवेंद्र फडणवीस असा एकमेव नेता ज्याला अख्खा महाराष्ट्र मुळासकट बदलवून टाकायचा आहे त्यात प्रसंगी आपला जीव जरी द्यावा लागला तरी घाबरून मागे हटायचे नाही, अशी देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे, सारेकाही राष्ट्रसाठी रा स्व संघासाठी राज्यासाठी, भाजपा आणि मोदी यांच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, हा एकमेव विचार कायम 24 तास डोक्यात ठेवून आणि दरक्षणी अनेक संकटांना विविध समस्यांना असंख्य अडचणींना तोंड देत न थकता न थांबता काम करणारा कार्यव्यस्त असा हा एकमेव नेता, ज्याचा मी अगदी बारकाईने अभ्यास केला आजही करतो त्या सूक्ष्म अशा निरीक्षणातून मनापासून मला भावलेला हा समाजसेवी आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्रसेवक…
www.vikrantjoshi.com
नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर तुमच्या मनात मोठी अस्वस्थता आहे हे त्या फडणविसांना तंतोतंत माहित आहे पण त्यांच्या स्वतःच्या हातून कोणतीही चूक नक्की घडलेली नाही तर त्या चुका त्यांच्याच काही विघ्नसंतोषी नेत्यांनी त्यांच्यावर आधी लादल्या आणि मोठ्या खुबीने त्यांना या चुकांचे खापर देखील फडणवीस यांच्यावर फोडून मोकळे व्हायचे आहे जर लोकसभा निवडणुकांचे निकाल नेमके महायुती विरोधात लागून अपयश पदरी पडले तर, नेमके हेच मला याठिकाणी तुम्हाला सुचवायचे आहे सांगायचे आहे कि हीच ती वेळ परतफेड करण्याची, फडणवीसांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहण्याची, उगाच मतभेद न करता निवडणुकीचे आवाहन पेलण्याची मग भलेही तुम्ही माझ्यासारखे एक सर्वसामान्य मतदार असलात तरी, उभा महाराष्ट्र आणखी आणखी पुढे नेण्यासाठी त्या फडणवीसांसाठी, तुमच्या या आवडत्या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तुम्हाला मतदान करायला नक्की मतदान केंद्रावर जायचे आहे. वास्तविक जेव्हा पुन्हा महायुती सत्तेत आली तेव्हाच जर भाजप श्रेष्ठींनी पुन्हा एकवार या फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते त्यानंतर पुढले रामायण घडले नसते म्हणजे अत्यंत वाईट अशा अनेक नेत्यांना येथे जवळ करण्याची महायुतीच्या सत्तेमध्ये सामावून घेण्याची नक्की दूरदूरपर्यंत अजिबात गरज पडली नसती पण, फडणवीसांना मिळणारे उत्तम राजकीय यश त्यांच्याच काही हलकट नेत्यांच्या डोळ्यात भरले त्यानंतर फडणवीसांचा प्रचंड छळ करून स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेणारे काही हलकट थेट नरेंद्र मोदी यांना देखील मोठ्या खुबीने अंधारात ठेवून मोकळे झाले त्यात तिकडे अत्यंत दुष्ट कावेबाज धूर्त दळभद्री निंद्य नाटकी अशा शरद पवार यांनी राज्यातल्या फडणवीस विरोधी असलेल्या नेत्यांना हाताशी धरून त्यांना हरप्रकारे त्रास देण्याचा जो चंग बांधलेला आहे, त्याला तोडीस तोड उत्तर तेही मतदानातून देण्याची नेमकी हीच ती वेळ, मतदारांनो आपल्याला फडणवीस व मोदी यांना निवडून आणायचे आहे, पुन्हा पुढली पाच वर्षे हे राज्य हे राष्ट्र जगात गाजवून सोडायचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत सुशीला श्रीराम जोशी