मान गये उस्ताद : तुम्हीच खरे वस्ताद :
हे तर नक्की आहे कि जे मी बोलतो लिहितो तेच नेमके घडते. महायुती विरोधातल्या कोणत्याही अपप्रचाराकडे मतदारांनी अजिबात लक्ष घालून उगाच मन व तन अस्वस्थ करून घेऊ नये, लोकसभेला महायुतीच्या फारतर 20 जागा निवडून येतील हे तर शंभर टक्के असत्य आहे, आज लिहून ठेवा कि लोकसभेला 38 उमेदवारांचा विजय निश्चित आहे उरलेल्या दहा ठिकाणी तगडी स्पर्धा नक्की आहे पण त्यातले देखील पाच तर नक्की निवडून येतील उरलेल्या पाच ठिकाणी खऱ्या अर्थाने कांटे कि टक्कर आहे त्यातला सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असा कि या उरलेल्या पाचही ठिकाणी महायुती विरुद्ध उद्धव गटाचे उमेदवार असा संघर्ष आहे, शरद पवार वेडे दिवाने नाहीत कि त्यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे किंबहुना त्यांना खरी काळजी चिंता पर्वा पोटच्या लेकीची आहे कारण अगदी सुरुवातिला विशेषतः बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे अंदाज त्यांच्या बाजूने होते पण त्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः अजित पवार आणि महाउस्ताद देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीची चक्रे फिरवून थेट काकांच्या मनात धडकी भरवली विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या या दिवसात सतत संपर्कात येणारे नेते व कार्यकर्ते जेव्हा सुप्रिया आणि सुनेत्रा या दोघींच्या स्वभावाची बोलण्याची तुलना करतात, मित्रांनो सुनेत्रा पवार यांनी आजच बाजी मारलेली आहे ज्याची मोठी काळजी पवारांना लागलेली आहे. काँग्रेस ऐकायला तयार नव्हती अन्यथा काँग्रेसने देखील काही जागांवर आपला हक्क सोडत त्या जागा उद्धव शिवसेनेच्या पारड्यात टाकाव्यात असा शरद पवार यांचा स्वतःचा आग्रह होता पण अल्लड पोरकट डोक्याच्या काँग्रेस नेत्यांनी काकांचे सांगणे हसण्यावारी नेले, लक्षात ठेवा काँग्रेसचे उमेदवार सवयीप्रमाणे पाडण्यात आतून स्वतः शरद पवार असतील, माझे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. महायुतीशी तगडी टक्कर द्यायची असेल तर फुकाचा अभिमान बाजूला ठेवून उद्धव शिवसेनेला अधिकाधिक जागा द्या, पवारांचा हा आग्रह, सल्ला न ऐकणाऱ्या काँग्रेसच्या पर्यायाने महाआघाडीच्या शंभर टक्के अंगलट येणार आहे…
www.vikrantjoshi.com
येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या महायुतीची दाणादाण उडेल त्यांचे अनेक उमेदवार पराभूत होतील असा महाआघाडीचा अपप्रचार म्हणजे पोटाशी उशी बांधून दिवस गेलेत सांगण्यासारखे किंवा संजय राऊतांनी तोंडाला कुलूप बसवून घेतले असे नाक्यावरच्या चाबीवाल्याने तुमच्याकडे सांगण्यासारखे याउलट ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात तुम्हाला महाआघाडीचा त्या कोल्हापूर पद्धतीने उमेदवार तुल्यबळ आहे असे वाटते कोल्हापूरसहित त्या साऱ्याच ठिकाणी महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून तर येईलच पण मुबंईत देखील महाआघाडीचा एकही उमेदवार शंभर टक्के निवडून येणार नाही, मुंबईत तर उद्धव यांचा करिष्मा फेल गेला हेच तुम्हाला दिसून येईल विशेष म्हणजे माझे नेतृत्व आणि माझी राष्ट्रवादी संपली हे स्वतः पवारांनी मान्य केले म्हणजे एरवी स्वतः सतत आजतागायत प्रत्येक ठिकाणी डल्ला मारणाऱ्या शरद पवार यांनी अगदीच कमी जागांवर समाधान मानले नेमके तेथेच निवडणूक निकालांचे गुपित दडले आहे. आणखी एक गौप्य्स्फोट याठिकाणी कि स्वतः शरद पवार यांनी उद्धवजींना असेही सांगितले होते कि आणखी काही जागा कमी करून जर तुम्हाला तुमचा एखादा ताकदवान उमेदवार द्यायचा असेल तर माझी अजिबात हरकत नाही विशेष म्हणजे अगदी शपथेवर पुन्हा तेच सांगतो कि राज्यातल्या काँग्रेसने शिवसेना खालोखाल ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत ते पवारांना अजिबात आवडलेले नाही, तुम्ही स्वतःच्या आणि महाआघाडीच्या पायावर आपणहून धोंडा मारुन घेतलेला आहे हेच पवार आज काँग्रेस नेत्यांना वारंवार सांगताहेत…
पत्नीव्यतिरिक्त एक्स्ट्रॉ अफेअर कोणत्या चावट पुरुषाला नको, कपाटभर साड्या कोंबलेल्या असतानाही, कुठल्या स्त्रीला आणखी एक साडी गिफ्ट करणारा नवरा नको तेच आपल्या या राज्याचे किंवा देशाचे गेल्या दहा वर्षात झाले आहे, महायुतीला ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध धर्मियांचा विरोध आहे हा थेट अपप्रचार आहे, तुम्हीच सांगा अचानक बदललेला आणि जग गाजवून सोडणारा भारत कोणत्या मतदाराला नको आहे, देशाचे नंतर बघू पण आपल्या या महाराष्ट्राचा ज्या प्रचंड वेगाने चौफेर विकास साधल्या जातो आहे, मतदार का म्हणून महा युतीच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. पर्वा तर मी जागच्या जागी आनंदाने उड्या मारायला लागलो जेव्हा फडणवीसांनी महायुतीने केवळ वर्षभरात पार गडचिरोली पर्यंत समृद्धी पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. फडणवीसांचे ते वाक्य तर डोळ्यात आनंदाश्रू आणणारे होते कि ह्यापुढे गडचिरोली हा राज्यातला शेवटचा नव्हे तर पहिला आणि पहिल्या क्रमांकाचा जिल्हा असेल हे तर असे झाले कि एखाद्या अविवाहित थोराड वयाच्या कुरुप कुमारिकेला, मी तुझ्याशी लग्न करतो आहे असे सलमान खानने सांगण्यासारखे किंवा आय लव्ह यु हे त्या अब्दुल सत्तर यांच्या कानात हळू. सेक्सी सनी लिओनीने सांगण्यासारखे. आपलाही एक दिवस येईल आणि आपणही इतरांच्या प्रगत पंगतीला जाऊन बसू, गडचिरोलीकर मंडळींनी तर मला वाटते दिवाळी आधीच दिवाळी साजरी केलेली असेल, मतदान नक्की त्यांना करायचे आहे ज्यांनी हा देश हे राज्य अटकेपार नेण्याचे नक्की ठरविलेले आहे…