भारतीय आणि विवाहबाह्य संबंध : पत्रकार हेमंत जोशी
क्या जमाना बदल गया, हो विशेषतः भारतीय जोडप्यांच्या बाबतीत अलिकडल्या १०-१५ वर्षात नक्की जमाना बदललेला आहे. तत्पूर्वी जोड्याला जोडा क्वचित शोभून दिसे, बहुतेक जोडपी म्हणजे चांगल्या झाडावरची माकडे पद्धतीने असायची दिसायची, पुढ्यात येईल ते स्वीकारण्याची चांगल्या आर्थिक परिस्थिती अभावी वेळ विवाहेच्छुकांवर येत असे, महत्वाचे म्हणजे आर्थिक सुबत्ता असेल तर माकडे देखील उठावदार दिसतात आणि आर्थिक परिस्थिती उत्तम नसेल तर ऐश्वर्याअभावी स्त्री पुरुषांचे सौंदर्य खुलून दिसत नाही. आता पूर्वीचे ते दिवस नक्की राहिलेले नाहीत, उत्तमोत्तम मेन वूमेन पार्लर्स आहेत, बहुतेकांना कपड्यांची नेमकी फॅशन कळते अपवाद शासकीय कार्यालयात आणि राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणाऱ्या स्त्रियांचा, त्यांचे ते ठरलेले पंजाबी कुर्ते व पायजमे बघून वाटते अख्ख्या देशातल्या महिलांचा एकच टेलर ठरलेला असावा जेथून त्या टिपिकल पंजाबी ड्रेस शिवून घेत असाव्यात. रस्त्याने फिरतांना निरीक्षण करा, उत्तमोत्तम जोडपी तुम्हाला पाहायला मिळतात. सौंदय आले पण लग्नानंतरच्या संसार करण्याचे विद्रुपीकरण झाले, मला तर असे वाटते असे एकही जोडपे नसेल ज्यांना आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत वाटावे कि आमचे लग्न कालच झाले. म्हणून एकच सांगणे कि सारे काही अविचाराने केले तरी चालेल पण लग्न मात्र अतिशय विचारपूर्वक करावे…
विशेषतः बहुसंख्य जोडप्यांचे असे असते कि ते सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक समारंभात अगदी सतत एकमेकांना ते खेटून असतात, गळ्यात गळे घालून फिरतात, एकदम रोमँटिक असतात पण त्यांच्या खाजगी जीवनात डोकावले तर असे दिसते कि दोघांचेही हमखास विवाहबाह्य संबंध आहेत. नेमका त्यावरच माझा आक्षेप आहे कि खोट्या प्रेमाचे निदान प्रदर्शन तरी करू नका, पटत नसेल तर एकमेकांना घटस्फोट देऊन मोकळे व्हा किंवा आमचे जमत नाही सांगून मोकळे व्हा. पेज थ्री लाईफ ज्यापद्धतीने अलीकडे बोकाळले आहे त्यात प्रामुख्याने हेच आढळते कि सुरुवातीला वीक एन्ड पार्टीज मध्ये जोडपे अगदी एकमेकांच्या गळ्यात पडून दारू ढोसतात, एकमेकांना घट्ट बिलगून डान्स करतात, काही दिवसानंतर बघावे कि नवरा दुसरीकडे बिलगलाय आणि बायको भलत्याच पुरुषाच्या बाहुपाशात पडून डान्स करते आहे आणि हे प्रकार केवळ पुणे मुंबईत अधिक असलेत तरी इतरत्र देखील चोरी छुपे जवळपास हेच चाललेले असते. अगदी अलीकडे एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याला माझ्याकडून बदली करून घ्यायची होती. तो मध्यस्थांच्या ओळखीने माझ्याकडे आला, मी त्याला प्रयत्न करतो, म्हणालो. नंतरच्या काळात असे घडले कि हा देखणा त्याची बायको देखील अत्यंत देखणी, काहीही गरज नसतांना हा दररोज मला व्हाट्सअपवर त्याच्या बायकोचे विविध उत्तान फोटो पाठवायला लागला, माझ्या जागी एखादा नावात विनोद असलेला आजी किंवा माजी मंत्री असता तर त्याने केव्हाच तिला आत बाहेर खाऊन टाकले असते….
www.vikrantjoshi.com
अर्थात हे सत्ता आणि पैसे असणाऱ्यांना अगदी सहज उपलब्ध असते. आपण पाश्चिमात्त्य देशांना दोष देतो, व्यभिचार करण्यात आम्ही भारतीय खूप आघाडीवर आहोत. विशेषतः आम्ही पुरुष असे लबाड आहोत कि बहुतेक विवाहित पुरुष परस्त्रीच्या बाबतीत ती केव्हा आणि कशी उपलब्ध होईल त्यावर एकतर थेट बिचारून मोकळे होतात किंवा काही पुरुष मोठ्या खुबीने त्याच विषयावर येतात. परस्त्री म्हणजे निख्खळ मैत्री अशी भावना मनाशी ठेवणारे अगदी बोटावर मोजण्याइतके, बहुतेकांचे उद्देश सेक्स याच भावनेशी निगडित असतात. आधी मांसाहार नंतर दारू ड्रग्स आणि सिगारेट्स, आसपास केवळ नजर फिरवली तरी बहुतेक तरुणींच्या बाबतीत हेच घडतांना दिसते. दारू ड्रग्स व सिगारेट्स ज्या तरुणींच्या शरीरात घुसले त्यांनी आपल्या आयुष्याचे विशेषतः पुढल्या पिढीचे वाटोळे आजच करवून घेतले हे समजावे. मला पुण्यातली एक घटस्फोटित म्हणजे सिंगल पॅरेण्ट मैत्रीण म्हणाली कि माझ्या मुलीस तारुण्यातले बरे वाईट नेमके समजावे म्हणून मीच तिला मुद्दाम अधूनमधून माझ्याबरोबर बिअर प्यायला देते. मुलगी दहावीला आहे आणि हीच मुलगी नववीत असतांना तिच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मित्राबरोबर शरीररिक संबंध ठेवते म्हणून हिने माझ्याकडे एकदा चिंता व्यक्त केली होती. सांगायचे हेच आहे कि या पद्धतीचे वातावरण जर तुमच्याही घरात असेल तर घराण्याचे वाटोळे आजच झाले, असे समजून पुढल्या कामाला लागावे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी