मौल्यवान मतदार तुम्ही, मतदानाला बाहेर का पडावे ?
विदर्भात घडलेला एक सत्य किस्सा. पैसे वाटून मतदान विकत घेणारे काँग्रेसचे एक उमेदवार गावातल्या नामदेव कुंभारासमोर हजाराची नोट हातात धरून म्हणाले, काकाजी हे घ्या आणि मला मतदान करा. त्यावर नामदेवराव म्हणाले, बेटा मला पैसे नकोत पण माझ्या घरातले दहाही मतदार तुलाच मतदान करतील फक्त मला एक गाढव विकत घेऊन दे. एकदम दहा मते तेही केवळ दहा हजारां ऐवजी गाढवाच्या मोबदल्यात, उमेदवार तडक गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला, पण कोठेही त्याला 50,000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही, तो परत येऊन नामदेव कुंभाराला म्हणाला, मला वाजवी किमतीत एकही गाढव सापडले नाही, गाढवाची किंमत किमान 50,000 आहे, त्यामुळे मी गाढव देऊ शकत नाही त्याऐवजी मला प्रत्येकी एक हजार रुपये देणे सहज शक्य आहे…
www.vikrantjoshi.com
त्यावर नामदेवकाका खिन्नपणे चेहऱ्यावर कसेबसे हसू आणत म्हणाला, साहेब मला आता आणखी लाजवू नका, माझ्या ते लक्षात आले कि तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे थोडक्यात जेव्हा गाढव 50,000 पेक्षा कमी भावाने विकले जात नाही, तेव्हा मी का म्हणून केवळ हजार रुपयात विकले जावे, चालते व्हा…
मतदार मित्रांनो, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व न मानणारे असे उमेदवार नक्की तुमच्याहीकडे येतील, पण स्वतःची आणि तुमच्या अनमोल मताची कदर करा आणि हो, मतदानाला बाहेर पडा, रात्र वैऱ्याची आहे, हे हिंदुराष्ट्र भविष्यात पाकिस्थान न व्हावे…
सोलापूरचा रे नगर नागरी निवारा भव्य दिव्य प्रकल्प पक्के कॉम्रेड नरसय्या अडाम यांनी बघितलेले स्वप्न, काही केल्या हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत नव्हते, सतत 14 वर्षे मास्तर मंत्रालयात, शासन दरबारी चपला झिजवत होते, लाल बावट्याचे नरसय्या मास्तर त्यांना का म्हणून आपणहून मोठे करावे, हा सत्तेत असणाऱ्यांचा दृष्टिकोन तीच भूमिका, पण तो दिवस एकदाचा उजाडला आणि मास्तरांच्या सोलापूर शहरातल्या नागरी प्रकल्पाला गती मिळाली, भारतीय जनता पक्षाचा या देशातला म्हणाल तर शत्रू, मोठा विरोधक, कम्युनिस्ट पक्ष आणि याच पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या अडाम मास्तर त्यांचा हा प्रकल्प, पण जेव्हा एखादी प्रामाणिक व्यक्ती तेही विकासाचे काम घेऊन येते, खालची मान वर न करता तो नेता जेव्हा नगरसेवक होता तेव्हापासुन तर आजतागायत या पद्धतीच्या समाजधुरीणांना प्रसंगी होणार्या टीकेचा त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासाचा एकही क्षण विचार न करता अगदी मनापासून सहकार्य करणारा नेता अर्थातच देवेंद्र फडणवीस, नेमके ते मुख्यमंत्री झाले आणि अडलेले नरसय्या मास्तर त्यांचा आवडता पण रखडलेला प्रकल्प फडणवीसांकडे घेऊन आले. त्यानंतर काहीच दिवसात अधिकाऱ्यांची लगबग सुरु झाली कारण कडक आदेश तेही फडणवीसांनी दिले होते, कॉम्रेड नरसय्या मास्तरांचा हा निवारा प्रकल्प कुठेही न थांबता प्रत्यक्षात उतरवायचा आहे आणि शासन कामाला लागले…
बघता बघता सोलापूरचा हा भव्य दिव्य प्रकल्प त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सततच्या सहकार्यातून पाठपुराव्यातून पूर्ण झाला आणि मागला पुढला काहीही कोणताही विचार न करता याच नरसय्या मास्तरांच्या सूचनेवसरून आग्रहावरून फडणवीसांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदघाटनासाठी पाचारण केले ते आले आणि मास्तरांचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले. वास्तविक प्रकल्प राजीव गांधींच्या नावाने होता, निवारा संकुलाला कॉम्रेड रे यांचे नाव पण मास्तर म्हणाले कि कोणतीही राजकीय अपेक्षा मनात न ठेवता, कोणताही विरोध न करता विरोधाची भूमिका न घेता देवेंद्र फडणवीस या मोठ्या मनाच्या नेत्याने मला आम्हाला सर्वोतपरी मदत केली सहकार्य केले म्हणून मला फडणवीसांचे तोंडभरून कौतुक करतांना कुठलाही कमीपणा वाटत नाही. फडणवीसांपूर्वी मी काँग्रेस काळात अनेक मुख्यमंत्र्यांचे उंबरठे झिजविले पण निराशेपलीकडे हाती काहीही पडत नव्हते पण फडणवीस आले आणि माझे स्वप्न त्यांनी स्वतः पुढाकार घेत पूर्ण केले…
देव कसा दुष्ट असतो बघा त्यांन या फडणवीसांना केवळ दोन हात दिले आणि एक तोंड, काय हरकत होती त्यांना आदेश देण्यासाठी आणखी काही तोंडे देण्याची आणि दहा हातांचा हा नेता जन्माला घालण्याची. त्याचवेळी थेट शरद पवार नजरेसमोर येतात म्हणजे अमुक एखादे काम पूर्ण केल्यास प्रसंगी त्यांच्या पक्षातला भुजबळ किंवा घरातला अजित पवार जरी मोठा होतांना दिसला तरी त्यांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते, त्यांचेही किस्से तुम्हाला सांगून मी आश्चर्याचा नक्की धक्का देईन…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी