धक्कादायक ! विविध राजकीय व्यथा आणि सत्यकथा :
उर्वरित महाराष्ट्रात ‘ दादा ‘ म्हणजे मोठा भाऊ किंवा आदरयुक्त दरारा, कुटुंबाच्या पाठीशी सतत कायम उभा राहणारा पण आमच्या अख्या विदर्भात आदरयुक्त नात्याला सहसा कोणीही ‘ दादा ‘ हे टोपण नाव न घेता न ठेवता, कुटुंबातला जो आदरयुक्त आणि आधारस्तंभ असतो त्याला दादा ऐवजी ‘ भाऊ ‘ हि उपाधी जोडली जाते. भाऊ म्हणजे मोठा भाऊ, भाऊ म्हणजे कोणत्याही अडचणीत कुठल्याही संकटात सतत कायम उभा राहणारा, भाऊ म्हणजे निर्व्यसनी भाऊ म्हणजे दिलदार मनाचा पराक्रमी माणूस, भाऊ म्हणजे कुटुंब सदस्यांना उत्तम जीवनशैली उपलब्ध करून देणारा मात्र स्वतः दिवस रात्र काबाडकष्ट करणारा, स्वतःकडे कायम दुर्लक्ष पण कुटुंबाची मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेणारा. मित्रहो, वास्तविक भाऊ म्हणजे वयाने अनुभवाने मोठा पण आधी उभा विदर्भ आणि आता अख्खा महाराष्ट्र ज्याला भाऊ म्हणूनच ओळखतो, ते समोर असतांना किंवा त्यांच्या पाठीमागे देखील त्यांचा केवळ भाऊ म्हणून उल्लेख करतो ते एकमेव आपले देवेंद्र भाऊ काही त्यांना देवेन भाऊ असेही म्हणतात. पाठीशी जेव्हा फारसा अनुभव नव्हता किंवा ते पोक्त वय देखील नव्हते तेव्हापासूनच थोडक्यात अगदी लहान वयात ऐन तारुण्यात देवेंद्र यांना भाऊ हि उपाधी चिकटविल्या यासाठी गेली कारंण ते अगदी सुरुवातीपासून त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या भावासारखे सहकार्य करून मोकळे व्हायचे. काहीही घडले कोणतेही संकट आले, कुठलीही आपत्ती ओढवली कि त्यांना ओळखणारा किंवा बिनओळखीचा आपली अडचण देवेनभाऊंना सांगतो आणि एकदा का देवेनभाऊंनी शब्द दिला कि चिंतामुक्त मनाने पुढल्या कामाला लागतो. असा हा भाऊ, देवेनभाऊ, जणू राज्यातल्या घरघरातला जातपात किंवा पक्षभेद न मानणारा प्रत्येकाच्या भल्यासाठी झटणारा झगडणारा, थोरला भाऊ…
www.vikrantjoshi.com
इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांच्याच पक्षाच्या अनुभवी प्रभावी नेत्यांचे अजिबात ऐकून घ्यायला तयार नाहीत, ज्या पृथ्वीराज चव्हाण यांनी ते मुख्यमंत्री असतांना मोठ्या खुबीने शरद पवार आणि गॅंगला पद्धतशीर अडगळीच्या जागी जखडून बांधून ठेवलेले होते, आज महाआघाडीत तेच शरद पवार काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांना प्रसंगी फाट्यावर मारून बासनात गुंडाळून स्वतः सारेच निर्णय घरत सुटलेले आहेत कारण तिकडे नाना पटोले यांच्या अस्तव्यस्त राजकीय कारभारामुळे नेतृत्वाच्या बाबतीत राज्यातली काँग्रेस अगदीच दुबळी ठरलेली आहे आणि आजही उद्धवजींना नेमके हेच लक्षात येत नाही किंवा आलेले नाही कि कुठे पवारांचे ऐकायचे आणि कुठे त्यांना दाराबाहेर उभे करायचे, उदाहरण द्यायचे झाल्यास जळगाव लोकसभा उमेदवार हा उबाठा सेनेचा ठरलेला असतांना तेथे भाजपाच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात ललिता पाटील नावाच्या ज्या महिला उमेदवार नक्की करण्यात आल्या आहेत, त्यांना अद्याप उद्धव यांनी कधी पाहिलेले देखील नाही किंवा कधी त्यांची साधी भेट देखील झालेली नाही तर ललिता पाटील यांना अलीकडे एक दिवस अचानक स्वतः शरद पवार यांनी मुंबईत तातडीने बोलावून घेतले आणि तुमचे नाव उबाठा सेने तर्फे आमचे अधिकृत उमेदवार म्हणून निश्चित केले असून तयारीला लागा, सांगितले. थोडक्यात ललिता पाटील पद्धतीच्या महा आघाडीच्या जवळपास साऱ्याच उमेदवारंवार इतर कुठल्याही घटक पक्षाचा आदरयुक्त दरारा न राहता भविष्यात जे शरद पवार सांगतील तेच नेमके हे उमेदवार करतील हे साधे सरळ गणित आहे. तिकडे काँग्रेस मध्ये पटोले कुठल्याही जाणकार नेत्यांचे मग ने बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले विश्व्जीत कदम किंवा सतेज पाटील असतील, विजय वडेट्टीवार किंवा अगदी आत्ता आता पर्यंतचे अशोक चव्हाण असतील, असा एकही नेता नाही जो पटोले यांच्या भूमिकेवर नाराज नाही, त्यामुळे राहुल गांधी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची जमवाजमव करून गेले आणि त्यांची पाठ वळताच, नाना नेहमीप्रमाणे गोंधळ घालून मोकळे झाले. जत्रेत दिवसा कमविले आणि रात्री तमाशात गमावले, हे असे पटोले यांचे आडमुठे विक्षिप्त विचित्र वात्रट वाह्यात वागणे आणि भूमिका घेणे…
येथे मी जे सांगतोय त्यातला एकही शब्द चुकीचा निघाला तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास वेडा म्हणा किंवा बिचुकले थत्ते काहीही म्हणून मोकळे व्हा. तिकडे भाजपामध्ये वेगळेच वातावरण आहे म्हणजे बावनकुळे म्हणतात, देवेन्द्रजी व मी, आम्हा गुरु शिष्यांची जोडी झक्कास जमलेली आहे, फडणवीस आणि बावनकुळे या दोघात जसे गुळपीठ आहे तेच आदराने वागणे बोलणे विचारणे सल्ला घेणे त्या बावनकुळे यांचे त्यांच्या पक्षातल्या किंवा महायुतीमधल्या इतरही मान्यवर नेत्यांच्या बाबतीत नेमके घडते आहे थोडक्यात नितीन गडकरी असोत किंवा रावसाहेब दानवे, अगदी काल पर्वा आलेले अशोक चव्हाण असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील, अनुभवी चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगंटीवार, महायुती मधले अजित पवार असतील किंवा थेट एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर अगदी निलमताई गोरे महायुतीचे समस्त आमदार खासदार किंवा भाजपा अथवा महायुतीमधला असा एकही नेता नाही, भाजपाचा असा एकही पदाधिकारी नाही कि ज्यांना बावनकुळे आणि फडणवीस त्याच्या घरातलेच एक सदस्य आहेत असे वाटत नाही, महायुतीच्या कुठल्याही नेत्याला मंत्र्याला किंवा पदाधिकाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस आपल्यातलेच एक यासाठी वाटतात कारण हे दोघेही प्रत्येकासाठी उपलब्ध असतात, आपल्या माणसांसाठी धडपडत असतात. मध्यंतरी जेव्हा याच बावनकुळे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची राज्य तसेच जिल्हास्तरीय जी कार्यकारिणी जाहीर केली अर्थात ती फडणवीस यांना जरी विश्वासात घेऊन केली तरीही त्या त्या जिल्ह्यातल्या मान्यवर नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांनी ती यादी जाहीर केल्यानंतर नाना पटोले पद्धतीने राज्यातल्या भाजपामध्ये कुठेही कुठलीही कुरबुर नव्हती, मोठया मनाचा नेता साऱ्यांना कसा बरोबर घेऊन पुढे जातो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जेथे संघ आणि भाजपा मधल्या विविध अनुभवी आणि बुद्धिमान नेत्यांचा मोठा घोळका आहे तेथे किंवा त्यांच्यासमोर माझा प्रदेशाध्यक्ष म्हणून अनुभव नक्की तोकडा पडू शकतो त्यामुळे मी प्रत्येक मान्यवरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करीत पुढे जातो आणि तणाव विरहित त्यातून जगतो हे अगदी उघड उघड बावनकुळे यांचे सांगणे, त्यामुळेच राज्यातल्या भाजपाचा मस्त चाललंय…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी