हे घ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही गौप्य्स्फोट :
माझ्या माहितीचा एक देखणा श्रीमंत हुशार तरुण होता, त्याच्या कॉलेजमधल्या मुली त्याच्यावर प्रचंड फिदा होत्या पण हा कधी अगदी मधल्या सुट्टीतही बाहेर आला नाही, शेवटी त्यातल्या साऱ्या देखण्या मुली पुढे दुसऱ्याच्या झाल्या आणि हे महाशय शेवट पर्यंत लाजर्याबुजऱ्या वृत्तीतून अविवाहित राहिले, अखेरच्या आयुष्यात त्याला वेड लागले. अजितदादा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्या तरुणात कमालीचे साम्य आहे, आपण काय आहोत किती मोठे आहोत हे त्यांना कधी उमगले समजलेच नाही, त्यामुळे तटकरे कधी मतदारसंघ फारतर राष्ट्रवादी कार्यालय, अदितीचे केबिन आणि अजितदादांचा हात यापलीकडे बाहेर पडलेच नाहीत त्यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला असता, राज्याच्या कानाकोपऱ्यात ते फिरले असते तर ते आणि त्यांचा पक्ष नक्की कोठल्या कोठे निघून गेले असते पण जे मिळवायचे असते किंवा त्यांना जे मनापासून आवडते ते सर्व येथल्या येथे मिळते हे त्यांना माहित असल्याने मोठ्या उंचीचे नेतृत्व घडविण्यात त्यांनी कधी धावपळ केलेलीच नाही त्यामुळे असे म्हणतात या वयातही त्यांच्यात तगड्या घोड्याची ताकद आहे, अर्थात यादिवसात जरी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला तरीही ते आणि त्यांची राष्ट्रवादी चोहो बाजूंनी वाढतील. नेमके तेच समीर भुजबळ यांचे आहे ते देखील दादांच्या राष्ट्रवादीचे महत्वाचे मुंबई अध्यक्ष आहेत पण हेही साधे मुंबईकरांना माहित नाही, त्यांना एकीकडे स्वतः अजितदादा पूढे जाऊ देत नाहीत आणि काकांसारखी विरोध झुगारून पक्ष बांधणी करून पुढे जाण्याची त्यांची मानसिकता नाही, बाळासाहेबांचे नेतृत्व गूण जसे राज ठाकरे यांच्यात उतरले तेच समीर यांचे आहे म्हणजे काकांच्या दोन पावले पुढे, हेच त्यांचे वर्णन आहे, गर्जना करीत पायाला भिंगरी लागल्यागत मुंबई पिंजून काढणे त्यांनी नेमके हे असे करायला वागायला हवे…
www.vikrantjoshi.com
यादिवसात सर्वाधिक बोंबा कांग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, नाना पटोले विरोधात तेही त्यांच्याच कार्यकर्त्याकडून नेत्यांकडून यासाठी मारल्या जाताहेत कि होळी तोंडावर आहे म्हणून नव्हे तर नाना पटोले नक्की राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले पण काँग्रेस न वाढविता याउलट प्रत्येक जिल्ह्यात दुफळी माजवून आले. आपापसात प्रचंड भांडणे लावून मोकळे झाले. कुठल्याही राजकीय पक्षात प्रत्येक जिल्ह्यात अमुक एखाद्या नेत्याचा फार मोठा प्रभावी गट असतो अशा गटाला ताकद देऊन तुम्ही साऱ्यांना तुमच्याकडे सामावून घ्या असा सज्जड दम वास्तविक प्रदेशाध्यक्षांनी द्यायचा असतो ज्यामुळे त्या त्या जिल्ह्यातला पक्ष अधिक बळकट होतो पण नाना पटोले यांनी नेमके उलटे केले त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात पक्ष एकसंघ न जोडता विविध गटात तो मुद्दाम आणि आपणहून विभागून ठेवला, पक्षांतर्गत तुकडे पाडले त्यातून राज्यातली काँग्रेस नाना प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अधिक दुबळी झाली त्यांचे आपापसात फार मोठे मतभेद निर्माण झाले; किंबहुना अशोक चव्हाण पद्धतीचे काँग्रेस मधले या राज्यात जे अनेक ताकदवान नेते आहेत होते एकतर ते निष्क्रिय झाले किंवा नानाच्या गलिच्छ गटबाजीला कंटाळून बाहेर पडले… काल पर्वाचा राहुल गांधी यांचा मेळावा किंवा दौरा हि वरवरची सूज आहे, काँग्रेस आतून आजही मोठ्या प्रमाणात पोखरल्या गेली आहे जे पटोले यांच्यामुळे घडले आहे त्यातूनच अलीकडे नाना यांची हकालपट्टी करा, सांगण्यासाठी अगदी उघड राज्यातले त्यांचे नेते सोनिया राहुल यांना भेटले, वस्तुस्थिती सांगितली, लोकसभा निवडणुकीनंतर नाना पायउतार होतील हे आता नक्की आहे. येथे कबूल करायला हरकत नाही पण राज्यात पक्ष संघटना बांधण्यात यादिवसात मोठी संधी चालून आलेली असतानाही एकनाथ शिंदे देखील बऱ्यापैकी कमी पडले, त्यांना मुख्यमंत्री म्हणून येथे मुंबईतच जखडून घ्यावे लागले, त्यांच्याच काही बदमाश नेत्यांनी खासदार श्रीकांत किंवा स्वतः एकनाथ यांना येथेच जखडवून घेण्यास यासाठी भाग पाडले कारण एकनाथ यांची पाठ वळण्याचा अवकाश, विशेषतः त्यांचे नेते विचिध कुरापती उचापती भानगडी करण्यात मश्गुल व्हायचे त्यातून शिंदे पितापुत्राला मुंबई ठाण्याबाहेर पक्ष संघटना बांधणीसाठी अजिबात बाहेर पडता आले नाही ज्याची त्यांना स्वतःला खंत आसनी काळजी आहे; किंबहुना पक्ष संघटना कशी बांधायची बळकट करायची त्यात एकनाथ शिंदे वाकबगार मानले जातात तरीही ते दुर्दैवाने कमी पडले, मनातून काहीसे हताश देखील झाले आहेत…
राज्यातली भारतीय जनता पार्टी आणि त्याचे दोन प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे हा विषय फारच व्यापक आहे, मोठ्या विस्ताराने त्या दोघातले अनेक गुपिते सिक्रेट्स आणि प्रसंग तुम्हाला सांगावे लागतील आणि नक्की सांगणार आहे. सुरुवात त्या दोघात जे मोठे साम्य आहे तेथपासून करतो. विरोधक मग तो पक्षांतर्गत असेल किंवा बाहेरच्या कुठल्याही कोणत्याही पक्षाचा, अमुक एखादा विरोधक त्या दोघांकडे काम घेऊन आला, अमुक एखादी अडचण घेऊन आला, तर ज्या विरोधकांने माझे मोठे नुकसान केले आहे त्याचे आता मी का भले करावे हा किंचितही विचार न करता मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून शत्रूच्या विरोधकांच्या संकटात एका क्षणात मनापासून धावून जाणारे पहिलेवहिले नेते म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा चाहता, त्यांचा सखा त्यांचा पाठीराखा चंद्रशेखर बावनकुळे, हे मी येथे आत्मीविश्वासाने यासाठी सांगू शकतो कारण बेरजेचे राजकारण करणारे हे दोघे, त्यांची इतरांना विरोधकांना सहकार्य मदत करण्याची प्रवृत्ती त्यावर मला सपुरावा एक नव्हे दोन नव्हे तर शेकडो उदाहरणे तोंडपाठ आहेत… आणि हि उदाहरणे जनतेसमोर मी नक्की उघड करिन जरी ते दोघेही माझ्यावर व्यक्तीश: नाराज झालेत तरी. समजा फडणवीस व बावनकुळे आणि भाजापाचे अगदी उघड अतिशय कट्टर विरोधक खतरनाक शत्रू ठाण्यातले एक आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्र्वादीतले नंबर दोनचे नेते, शरद पवार यांचे खंदे समर्थक विशेष म्हणजे जाहीर उघड सतत फडणवीस किंवा भाजपा किंवा बावनकुळे याना आव्हान देणारे किंवा ललकारणारे जितेंद्र आव्हाड ते जरी त्यांची अमुक एखादी अडचण फडणवीस किंवा बावनकुळे यांच्याकडे घेऊन आले, आधी त्यांचे अशांचे प्रेमाने स्वागत केल्या जाते कुठलाही अपमान किंवा अपशब्द न वापरता त्यांची नेमकी अडचण समजावून घेत… यापद्धतीच्या कट्टर विरोधकाला सुद्धा एकही क्षण न दवडता मनापासून धावून जाणारे मोठ्या मनाचे दिलदार वृत्तीचे किंवा संकुचित विचारांना अजिबात थारा न देणारे नेते म्हणजे हि जोडगळी, फडणवीस आणि बावनकुळे. म्हणून ते यशस्वी आहेत त्यांच्या नेतृत्वाला जनसामान्यात मोठी मान्यता आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी