अबब ! भाजपाचे उमेदवार त्यातले धक्कादायक प्रकार :
पत्रकार अभिजित मुळ्ये हे भाजपाचे नामवंत सुनील देवधर यांचे उजवे हात समजले जातात, साधारणतः महिन्यापूर्वी मी काही ओळी अगदी स्पष्ट सुनील देवधर या माझ्याही आवडत्या नेत्यांविषयी याचठिकाणी जेव्हा लिहून काढल्या त्यावर अभिजित मला भेटायला आले तेव्हाच मी त्यांना जे सांगितले किंवा लिहून ठेवले तेच आज घडले आहे म्हणजे पुणे लोकसभा मतदार संघात जरी ब्राम्हण मतदारांचा करिष्मा वरचष्मा असला तरीही तेथल्या मेधा कुलकर्णी यांना भाजपाने याआधीच राज्यसभेवर पाठविले असल्याने तेथे लोकसभेला सुनील देवधर यांचा अजिबात विचार केल्या जाणार नाही त्याऐवजी अगदी सुरुवातीपासून मुरलीभाई मोहोळ यांनाच उमेदवारी देण्याचे तेथे ठरले होते जे नेमके घडले किंबहुना माजी आमदार जगदीश मुळीक आणि सुनील देवधर या दोघांचीही तेथे उमेदवारी मिळविण्यासाठीची धडपड फारशी उपयोगी ठरणार नाही जे मी लिहिले सांगितले तेच आज खरे ठरले. पुण्यातले फडणवीसांचे निकटवर्ती जगदीश मुळीक हे मोहोळ यांच्या उमेदवारीवरून किंवा रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने काहीसे नाराज झालेले असलेले रावेरचे अमोल हरिभाऊ जावळे या दोघांनीही पुढल्या क्षणी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा जोमाने जोरात उघड मनापासून प्रचार करण्यास सुरुवात करावी त्या दोघांनीही मोहोळ किंवा रक्षा यांना विरोध करून विधानसभेला शंभर टक्के मिळणारी उमेदवारी त्यावर पाणी फिरवू नये, सुनील देवधर मोठा माणूस आहे तो पुन्हा भाजपा जोडायला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात निघून जाईल…
www.vikrantjoshi.com
पुन्हा तेच पंधरा दिवसांपूर्वी जे मी लिहिले तेच घडले किंवा घडणार आहे, फडणवीसांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघात एकाचवेळी अनेक दगड मारले आणि ते यशस्वी ठरले. रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देऊन एकनाथ खडसे यांना क्षणार्धात आपलेसे करून घेतले आहे. विशेषतः एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी उगाच आक्रमक होऊन कायम भाजपा आणि फडणवीसांना धारेवर धरून पक्षांतर्गत खळबळ माजविण्याचा अनेकदा आजवर प्रयत्न केले ज्यात भाजपाचे नव्हे तर त्या दोघांचेच स्वतःचे मोठे राजकीय नुकसान झाले पण चुकीची भूमिका न घेण्याचे त्या दोघांनीही ठरविले आणि पंकजा यांना फडणवीसांनी स्वतः उमेदवारी मिळवून दिली वरून पंकजा आणि धनंजय दोघांनाही एकत्र आणले नात्याच्या बंधनात पुन्हा घट्ट बांधले, यापुढे पंकजा नक्कीच मोठी राजकीय झेप घेतील, शंभर टक्के निवडून येतील. मी जे लिहिले तेच पुढल्या काही क्षणात घडणार आहे, एकनाथ खडसे यांनी लाडक्या स्नूषाच्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आणि महाजन फडणवीस यांच्या आग्रहावरून भाजपा श्रेष्ठींनी खडसे यांचा भाजपा प्रवेश नक्की केलेला आहे जे मला आणि शरद पवार यांना जवळपास पंधरा दिवस आधीच ठाऊक होते, मी लिहिले आणि तिकडे पवार देखील अस्वस्थ झाले त्याक्षणी त्यांनी खडसे यांचे उमेदवारीवरून नाव हटविले. यापुढे खडसे नक्की चार पावले मागे येऊन विशेषतः फडणवीस, महाजन यांना पाण्यात बघणार नाहीत त्यातून खडसे नक्कीच आयुष्याच्या संध्याकाळी राजकीय दृष्ट्या मोठी झेप घेतील, मुलगा गमावल्याचे दुःख विसरतील. खडसे आणि महाजन एकत्र, खान्देशातली भाजपाची ताकद त्यांच्या जवळ येण्याने नक्की वाढलेली आहे…
अत्यंत महत्वाचे म्हणजे जे नागपूरकरांचे ठरते आहे ते झटक्यात घडावे म्हणजे ज्या दोघांनी अख्य्या विदर्भाचा, उपराजधानीचा दर्जेदार कायापालट घडवून आणला ते फडणवीस आणि गडकरी, त्यातल्या नितीन गडकरी यांना नागपुरातल्या साऱ्याच राजकीय पक्षांनी बिनविरोध निवडून द्यावे जो नागपूरकरांकडून गडकरी यांचा हक्क आहे. गडकरी विरोधात उगाच उमेदवार उभा करून हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नये, निवडणूक झालीच तर गडकरी देशात सर्वाधिक मतांनी निवडुन येण्याचा पराक्रम करून दाखवतील. गडकरींची उमेदवारी धोक्यात अशा विनाकारण बोंबा विरोधक मारत होते मात्र आठ दिवसांपूर्वी फडणवीसांनी जेव्हा अगदी उघड बोलून दाखविले कि असे काहीही घडणार नाही तेव्हा कुठे विनाकारण तापविलेले वातावरण शांत झाले. गडकरी पुन्हा एकवार खासदार होतील आणि नक्कीच यावेळीही मंत्री होतील. भाजपच्या यादीत चिखलीकर सारख्या काही नेत्यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने काहींना राग आलेला आहे तर काहींना आश्चर्य वाटलेले आहे पण हा प्रकार तुरळक असल्याने, फार काही स्फोटक घडेल असे वाटत नसले तरीही भाजपा आणि महायुतीने विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अजिबात कमी लेखू नये विशेषतः त्यांना ग्रामीण मतदारांची मिळणारी सहानुभूती धोकादायक ठरू शकते कारण मतदानासाठी ग्रामीण आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात आणि भाजपा धार्जिणे मध्यमवर्गीय एकतर मतदानाच्या दिवशी झोप काढतात किंवा सहलीसाठी दूरवर निघून जातात, त्यासाठी भाजपाला होणारे मतदान मोठ्या प्रमाणावर घडवून आणण्यासाठी महायुतीला प्रयत्नांची शिकस्त करावीच लागणार आहे. धक्कादायक बाब अशी कि लातूर या राखीव लोकसभा मतदार संघातून काहीसे अकार्यक्षम विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही त्याऐवजी विश्व्जीत अनिलकुमार गायकवाड या नव्या दमाच्या तरुणाला संधी मिळेल असे लातूर जिल्ह्यातील समस्त सर्वपक्षीय नेत्यांची अटकळ होती मात्र अनिलकुमार गायकवाड यांना देखील मी केवळ आठ दिवस आधीच विश्व्जीत यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले होते जे नेमके घडले मात्र विश्व्जीत यांनी त्यांना लातूर जिल्ह्यात सुरक्षित वाटणार्या विधान सभेची तयारी आतापासून सुरु करावी तसेच नाराजी बाजूला ठेवून श्रुंगारे यांचा मनापासून प्रचार करण्यास सुरुवात करावी ज्यात त्यांचा मोठा राजकीय फायदा होणार आहे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत जोशी