अबब ! इजा बीजा तिजा, मोदी शहांनी उडविला
गडकरींचा फज्जा !!
फार कमी मंडळींना माहित पडले असावे कि नितीन गडकरी पुन्हा मोठ्या संकटात अडकले आहेत, सापडले आहेत, त्यांच्या माने सभोवताली यावेळीही बदनामीचा मोठा फास आवळल्या गेला आहे, त्यावर नेमकी वस्तुस्थिती मला येथे सांगायची आहे जी अत्यंत धक्कादायक आणि गडकरींच्या दृष्टीने धोकादायक आहे. हे नक्की आहे कि गडकरी यादिवसात प्रचंड तणावाखाली आहेत, त्याचा मोठा परिणाम त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यावर देखील होतो आहे, हे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर आता तिसऱ्यांदा गडकरींच्या बाबतीत घडते आहे घडलेले आहे, प्रेयसीची पाळी टळली कि प्रियकर प्रेयसीला जसे टेन्शन येते तसे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गडकरींचे होते. हेमंत जोशी किस झाडकी पत्ती, पद्धतीने याच नितीन गडकरी यांनी मला अगदी सुरुवातीपासून कमी लेखले नसते तर जशी आजवर मी शरद पवार यांच्यासहित अनेकांना अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे, तेच मी गडकरी बाबत देखील घडवून आणले असते पण गडकरी यांनी मला सतत कायम कमी लेखले जे नेमके त्यांच्या चक्क तीनवेळा अंगलट आले ज्यामुळे त्यांची बदनामी झाली आर्थिक हानी झाली आणि सत्तेत देखील त्यांचे अपरिमित नुकसान झाले….
www.vikrantjoshi.com
2014 दरम्यान लोकसभा निवडणुकात नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे देशात एकमेव होते, गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते, गडकरी आपण भेटूया, एकत्र भेटून बोलूया असा निरोप मी त्यांना त्यादरम्यान एकदा नव्हे तीन तीन वेळा दिला पण गडकरी यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यांच्या भाषेत त्यांनी मला फाट्यावर मारले त्यातून गडकरी यांच्यावर जे संकट कोसळणार होते ज्याची मला अगदी खडान्खडा माहिती होती ते नेमके त्यांच्या अंगलट आले, पूर्ती उद्योग समूहावर आयकर खात्याने धाडी घातल्या कारण आयकर खात्याकडे गडकरींच्या पूर्ती उद्योग समूहाचे आर्थिक गैरव्यवहाराचे नेमके पुरावे असल्याने या धाडी घातल्या गेल्या ज्यामुळे गडकरी यांचे अगदी तडकाफडकी आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद गेले त्यानंतर त्यांना पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून बाजूला टाकण्यात आले आणि मोदी पंतप्रधान झाले, पुढे जे गडकरी, मोदी यांच्या मार्गातली मोठी कटकट होती, तरीही मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले आणि त्यांचे आवडते बांधकाम खाते देऊन त्यांना रान मोकळे करून दिले पण बेसावध पुन्हा गडकरी यांनी नको त्या चुका केल्या. अतिआत्मविश्वास त्यांना नडला, पोटी जन्मलेल्या जेमतेम ताकदीच्या सारंग आणि निखिल साठी या दोन मुलांसाठी गडकरी एकीकडे खात्यातले उत्कृष्ट काम करीत असतांना दुसरीकडे त्यांचे श्रीमंत होण्याकडे लक्ष होते ज्याचे पुन्हा मोठे पुरावे मोदी आणि शाह यांच्याकडे जमा होत होते आणि 2019 दरम्यान लोकसभा निवडणुका लागल्यानंतर पुन्हा जेव्हा नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे येण्याचा प्रयत्न कराया लागले, त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळातील आर्थिक चुकांच्या फाईल्स उघड करण्यात आल्या आणि गडकरी काहीसे घाबरले, अस्वस्थ झाले आणि त्यांना या संकटातून मोहन भागवतांनी वाचविले अन्यथा 2014 पद्धतीच्या धाडींना त्यांना पुन्हा सामोरे जावे लागले असते, अर्थात आर्थिक व्यवहारातून पुन्हा एकवार गडकरी यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला व्हावे लागले…
पुन्हा एकवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी रस्त्यातील अडसर ठरू नयेत त्यातून त्यांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक चुका कि घोटाळे उघड करण्यात आले आहेत. गडकरी यांचे अत्यंत विश्वासू आणि गडकरी यांनी ज्यांना मुद्दाम राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात संचालक म्हणून नेमले आहेत जे आर्थिक वादात कायम संशयित आहेत त्या अरविंद काळे यांच्यासहित जवळपास सहा महत्वाच्या व्यक्तींवर आणि काही कंपन्यांवर थेट सीबीआयने धाडी घातल्या आहेत आणि हि तर सुरुवात आहे अशी माझी माहिती आहे किंबहुना गडकरी यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे रायगड जिल्ह्यातील एक आमदार आणि संभाजीनगर येथील देशपांडे आडनावाचे एक वादग्रस्त बांधकाम व्यवसायिक जे गडकरी यांचे आर्थिक व्यवहार सांभाळतात, ज्या दोघांवर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा संशय आहे किंबहुना या दोघांचेही आर्थिक लागेबांधे आणि घोटाळे नेमके सीबीआयला पुराव्यांसहित माहित असल्याने या पद्धतीचे आणखी काही महाभाग सीबीआय च्या रडारवर आहेत, मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, पद्धतीची आडमुठी भूमिका जर गडकरी यांनी अरविंद काळे प्रकरणावर घेतली तर आणखी अनेक वादग्रस्त मंडळींवर सीबीआय नक्की धाडी घालून मोकळी होईल. गडकरी यांच्याविषयी आजही मला राग नाही पण आपण तेवढे आदर्श बाकीचे सारे चोर, पद्धतीने इतरांना कायम कमी लेखण्याचा गडकरी यांचा स्वभाव, असा कायम त्यांच्या अंगलट येतो. देशाला कर्जाच्या खाईत ढकलून गडकरी यांनी देशात रस्ते आणि पुलांचे जाळे विणले हे नक्कीच गौरवास्पद पण या पद्धतीच्या प्रकल्पातून स्वतःची आर्थिक सुबत्ता वाढविण्याचा गडकरी यांचा प्रयत्न, त्यावरच माझा नेहमी आक्षेप असतो, जो मोदी यांना देखील अस्वस्थ करतो आणि गडकरींना राजकीय सत्यानाश करतो…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी