जरांगे नका ना होऊ नागडे का घेता पंगे ?
मनोज जरांगे व्हाया राजेश टोपे जोडल्या गेले शरद पवार संगे, हे असे थेट कनेक्शन, त्यावर सरकारकडे कितीतरी पुरावे आहेत तरीही सरकार शांत होते कारण सरकार किंचितही मनोज जरांगेला घाबरत नव्हते सरकारला काळजी सर्वसामान्य मराठा समाजाची होती बदमाश आणि बदनाम मराठा नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नव्हती ज्यांनी आजतागायत केवळ स्वतःची घरे भरली आणि सामान्य मराठा माणूस कायम दुर्लक्षित केल्या गेला, सामान्य मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे त्यात त्यांची अजिबात चूक नाही, मराठा स्त्री मोलमजुरी करायला शक्यतो घराबाहेर पडत नाही थोडक्यात ज्यांनी आधी सोन्याच्या विटा रचल्या त्यांना आता गौर्या वेचायला लाज वाटते त्यात मराठा तरुणाला नोकरी नाही, शेतीतून उत्पन्न नाही त्याला त्यातून कमालीचे नैराश्य आलेले असल्याने या तरुणांचे पाय कधी व्यसनांकडे तर कधी नको त्या भानगडी कारण्याकडे वळताहेत हि वस्तुस्थिती आहे, मूठभर भ्रष्ट मराठा नेते त्यांचे घराणे आणि सरकारी अधिकारी समस्त मराठा बांधवांना कुठलीही मदत सहकार्य करतांना अजिबात दिसत नाहीत केवळ या अशा मजबूर मराठ्यांचा हे बदमाश फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करतांना दिसतात म्हणून समस्त मराठा समाजाची काळजी सरकारला आहे होती, पण आंदोलनाची दिशा मुद्दाम भलतीकडे वळवून आधी देवेंद्र फडणवीसांच्या नाकात दम आणायचा पुढे भाजपाला कोंडीत पकडायचे आणि राज्यातले वातावरण अस्थिर करत स्वतःच्या पोळीवर ऐन निवडणुकांदरम्यान तूप वाढायचे, पवारांची हि नेहमीची नेमकी स्टाईल, पवार यावेळी पार नागडे झाले आहेत उघडे पडले आहेत त्यांनी निदान यापुढे तरी नेहमीचे कुटील उद्योग करीत आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी निदान बदनाम होऊन वर जाऊ नये, तुमचे कुटील डाव आता थेट तुमच्या घरापासून तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या तोंडपाठ झाले आहेत, घरातले जसे तुमच्यापासून पूर्णतः दुरावले आहेत नेमके तेच राज्यातल्या सुजाण मतदारांचे देखील झाले आहे आणि आता तर उरले सुरले उद्धव ठाकरे देखील सावध झाल्याने नक्कीच तुमच्यापासून वेगळे होणार आहेत…
www.vikrantjoshi.com
मी असे कित्येक पुरुष अगदी जवळून बघितले आहेत ज्यांचा बाहेर दिवसभर अपमान होतो मग घरी परततांना हे असे पुरुष आधी दारू ढोसतात नंतर घरी येऊन मजबूर बायको मुलांना विनाकारण बदडून काढतात थोडक्यात घरातले सदस्य त्यांचे सॉफ्ट टार्गेट असतात म्हणून तेथे या अशा अस्वस्थ पुरुषांची दादागिरी चालते, मला त्या मनोज जरांगे वरून हा किस्सा आठवला. सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा अशोक चव्हाण पद्धतीच्या असंख्य प्रभावी पण मराठा नेत्यांना दुर्लक्षित करायचे त्यांना घाबरून पळायचे, आंदोलन करतांना किंवा बोलण्यातून कुठेही कधीही यापद्धतीच्या नेत्यांना साधे दुखवायचे नाही, ज्यांनी याआधी सत्तेत असतांना कधीही काहीही केले नाही आरक्षण दिले नाही त्या शरद पवार पद्धतीच्या नेत्यांना कुठेही घालून पाडून बोलायचे नाही आणि सॉफ्ट टार्गेट ब्राह्मणांना ज्यात त्यांचा दूरदूरपर्यंत काडीचाही संबंध नाही त्यांना आणि त्यांच्या फडणवीस पद्धतीच्या नेत्यांना मुद्दाम खिंडीत गाठून वाटेल ते तोंडसुख घेणाऱ्या जरांगे यांची हि तिरकस चाल आता इतरही आणि थेट मराठ्यांच्या देखील लक्षात आल्याने जेव्हा जरांगे ब्राम्हणांवर फडणवीसांवर खालच्या पातळीवर येऊन घसरायला लागले, मग अनेकांचे टाळके सटकले आणि जरांगे विरोधात लोक रस्त्यावर उतरले. मिस्टर जरांगे आंदोलन हे कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात नसते तुमचे आंदोलन मुख्यत्वे महायुतीच्या विरोधात तुम्ही छेडणे अत्यावश्यक असतांना किंवा फारतर हे आंदोलन तुम्ही भाजपाविरोधात करण्याची गरज असतांना तुमचे आंदोलन व्यक्तिद्वेषातून पुढे रेटल्याचे आता साऱ्यांच्याच ते लक्षात आल्याने ज्या शरद पवार यांना अतिप्रचंड राग त्या देवेंद्र फडणवीसांविषयी आहे, नेमके हे आंदोलन त्या फडणवीसांविरोधात तुम्ही छेडल्याने तुमचे महत्व ज्या झपाट्याने आज वाढलेले दिसते आहे पुढल्या काही दिवसात आजवरच्या इतिहासात जसे विविध अनेक मराठा नेत्यांचे महत्व संपले तेच नेमके तुमच्या बाबत नक्की घडणार आहे. पवारांनी तुमचा मोठयाखूबीने वापर करून घेतला आहे तुम्ही पवारांच्या जाळ्यात अडकला आहात…
मिस्टर जरांगे, तोंडावर पांघरूण ओढून तुम्हाला फडणवीस नेमके कसे आहेत हे समजणे अशक्य. ज्या संघ संस्कारात ज्या उत्तम खानदानात देवेन्द्रजी वाढले घडले मोठे झाले ते फडणवीस तुमच्यावर विष प्रयोग करतील, तुमचे हे पवार सुळे ठाकरे पद्धतीचे रिपीटेड बोल, त्यातून फडणवीस नव्हे तर ठाकरे सुळे पवार पद्धतीने तुम्ही देखील प्रत्येकाच्या मनातून साफ उतरले आहात, अशी वायफळ भाषा जर नेतृत्व टिकवायचे असेल तर अजिबात वापरयाची नसते, जेथे केवळ सतत उत्तम संस्कारांना प्राधान्य असते त्या फडणवीसांवर तुम्ही हे असे आरोप केलेत, दर्जा तुमचा घसरला आणि पत फडणवीसांची वाढली. तुम्ही फडणवीसांवर घसरला आणि इतर नेत्यांना सेफ केले विशेषतः सत्तेतल्या मराठा नेत्यांकडे दुर्लक्ष केले अगदी अजित पवारांना देखील बाजूला ठेवले वरून तुम्ही ब्राम्हणांवर घसरलात आणि जरांगे यांच्या तोंडी हुबेहूब शरद पवार बोलताहेत याची जाणीव प्रत्येक शरद पवार विरोधकाला झाली आणि तुम्ही आधी नागडे झाल्याने आता उघडे पडले आहात. तुम्ही आता याक्षणी त्या फडणवीसांविषयी असलेले सारे मनातले क्लेश द्वेष बाजूला ठेवा, मन निर्मळ करा, चला, मी थेट तुम्हाला त्या फडणवीसांकडे घेऊन जातो, छान गप्पा मारा आणि बाहेर पडतांना नेमके कोण नालायक तुम्हाला विनाकारण भडकवत होते आणि फडणवीस कसे तुम्हा मराठ्यांवर मनापासून प्रेम करणारे, क्षणार्धात तुमच्या ते लक्षात येईल आणि आरक्षणाचे प्रश्न नक्की सुटलेले असतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी