बावनकुळे बारीक झाले, घोर लावून घनघोर अघोर गेले :
काही दिवसांपूर्वी अचानक सकाळी विक्रांतचा मला फोन आला कि आमचा आवडता अश्विन अघोर गंभीर आजाराने त्रस्त आहे इस्पितळात दाखल आहे त्याच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास 40-45 लाख रुपये खर्च असल्याने आर्थिक सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यावर मी संबंधितांना लगेच फोन करून सांगितले कि काय जमतात ते बघा उरलेल्या रकमेची मी व्यवस्था करतो, काळजी घ्या काळजी करू नका, जमा झालेली रक्कम हि अश्विन अघोरच्या लोकप्रियतेची जणू पावती होती, जवळपास 28 लाख रुपये केवळ कशी दिवसात जमा झाले. पण शस्त्रक्रियेआधीच अश्विन आम्हाला कायमचा सोडून गेला, मनापासून श्रद्धांजली येथे अर्पण करतो. मी विदर्भ सोडून आता जवळपास पाच दशके उलटलीत पण आजही मुद्दाम न चुकता दररोज एखाद्या वैदर्भीय मित्राशी अगदी वर्हाडी गावठी गावरान भाषेत बोलतो, मला वाटते माझ्याएवढा गावरान वर्हाडी बोलणारा खचितच एखादा ब्राम्हण असेल मात्र येथे मुंबईत लिखाणातून किंवा बोलण्यातून माझी बोलीभाषा चुकूनही तोंडातून काढत नाही त्यात माझे महत्व कमी होईल अशी मनात भीती असते पण आमचा अश्विन तीच वर्हाडी बोलीभाषा त्याच्या यु ट्यूब वाहिनीवर अगदी बिनधास्त बोलायचा ज्यातून त्याला अख्य्या मराठी विश्वात अमाप लोकप्रियता मिळाली ज्याचे आम्हा पिता पुत्राला कायम मनापासून कौतुक असायचे, जेवायला येतो असे हक्काने सांगणारा आमचा लाडका अश्विन अघोर मनाला कायमचा घोर लावून गेला. कुठल्याही कलावंताला पत्रकाराला जर या स्पर्धेच्या युगात बदनाम न होता चुकीचे न वागता अतिशय प्रोफेशनली जर आर्थिक गणित जमत नसेल तर ते त्याच्या आयुष्याचे मोठे अपयश असते असे मला वाटते, पत्रकारितेतला हा अर्जुन आर्थिक दृष्ट्या मात्र धारातीर्थी पडला, खूप चांगला माणूस मनाला चटका लावून गेला…
www.vikrantjoshi.com
अधून मधून कधीतरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होते मग बावनकुळे उगाच प्रदेशाध्यक्ष झाले असे मनाला वाटते कारण बावनकुळे मंत्री होते तरीही भेटायचे खूप छान बोलणे व्हायचे पण आता ते मंत्री नसूनही त्यांची भेट दुर्लभ झालेली आहे थोडक्यात प्रदेशाध्यक्षपद कसे व किती जबाबदारीचे आहे असते हे बावनकुळे यांनी दाखवून दिले अर्थात राज्यात भाजपाला मिळणारे चौफेर यश त्यात नक्कीच बावनकुळे यांची धावपळ मेहनत कष्ट आणि त्यांच्या विरोधात कुठलीही बोंबाबोंब न होता त्यांची कार्यकारिणी आणि पक्ष बांधणी त्यांच्या कार्यमग्न नेतृत्वाची मोठी मदत नक्कीच म्हणाल तर त्यांच्या मित्राला म्हणाल तर त्यांच्या नेत्याला, फडणवीसांना मोठ्या प्रमाणात होते त्यात तिळमात्र शंका नाही. अलीकडे वाढलेले शरीर कमी करण्याचे फॅड आले आहे अगदी फडणवीसांपासून तर बावनकुळे तावडे पद्धतीचे अनेक नेते अधिकारी बारीक होताहेत, चांगले आहे पण काहीही झाले तरी शस्त्रक्रिया करून बारीक होऊन जीव धोक्यात घालू नका, बारीक होण्याची माझी पद्धत अगदी सोपी आहे माणूस नक्की बारीक होतो. सकाळी नियमित एक तास कुठलाही व्यायाम आणि दिवसभर थोड्या थोड्या वेळाने अगदी थोडे थोडे खाणे. गोड व तळलेले पदार्थ मैदा आणि मांसाहार पूर्णतः वर्ज्य आणि दारू आठवड्यातून एकदाच दोन पेग, झपाट्याने आणि हमखास बारीक होण्यास मदत होते. बावनकुळे बारीक झाले त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक तरुण दिसत असल्याने मिसेस बावनकुळे काहीशा चिंतेत असल्याचे कानावर पडले आहे. तुम्हाला बावनकुळे यांचे मोठे वैशिष्ट्य सांगतो कि ते जे बोलतात ते करून दाखवतात म्हणजे अगदी सहज शक्य असूनही राज्यसभेला त्यांनी ऐनवेळी चंद्रकांत हंडोरे विरोधात उमेदवार दिला नाही कारण त्यांनी तसा शब्द थेट जनतेला अगदी मीडियासमोर येऊन दिला होता अर्थात हंडोरे समोर उमेदवार दिला असता तर काँग्रेसचे आणखी नेमके आणि कोणते आमदार भाजपा सोबत आहेत हे आजच उघड झाले असते जे भाजपाला लगेचच सांगायचे नाही नव्हते त्यात त्यांची काही राजकीय गणिते दडलेली आहेत त्यासाठी भाजपाला या एका जागेवर पाणी सोडावे लागले आणि कफल्लक काँग्रेसची अचानक हि लॉटरी लागली, कमकुवत हंडोरे निवडून आले…
फार पूर्वी एक मुसलमान माझा शेजारी होता तो दुबईला नोकरी करायचा आणि येथे त्याचे कुटुंब वास्तव्याला होते. हा अधून मधून आला कि मुले आईला जाऊन सांगायची कि बाबा आले, हे ऐकले कि लगेच तिच्या छातीत धस्स व्हायचे वरून ती म्हणायची देखील कि आले मुलांना खेळवायला आणि मला लोळवायला, अर्थातच तो पुन्हा दुबईला जाताना बायकोला दिवस गेलेले असायचे. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील अमुक एखादा नेता त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांसहित अलीकडे आला, प्रवेश झाला कि त्या मुसलमानांच्या बायकोसारखे दचकून उठायला घाबरायला होते. वास्तविक त्यांनी अजिबात काळजी करू नये, अस्वस्थ होण्याचे घाबरण्याचे काहीही कारण नाही त्यातून तुमचा एकेकाळचा छळवादी आणि मोठा शत्रू काँग्रेस संपते आहे आणि देशातले हिंदुत्व जोर धरते आहे. आज अशोक चव्हाण आले उद्या विजय वडेट्टीवार नक्की येतील कारण मोदी यांना काँग्रेस कायमसवसरूपी भुईसपाट करायची आहे जे नक्की घडणार आहे याउलट बाहेरून येणाऱ्या या अशा नेत्यांना त्यांच्या कार्यकार्त्यांना भाजपा आणि संघ तुम्हाला नेमका त्यांना समजावून सांगायचा आहे, संघाची शिस्त कार्यपद्धती आणि भाजपाची कार्यप्रणाली त्यांच्या मनावर कशी खोलवर रुजेल त्यावर संघाच्या वरिष्ठांमध्ये जी खलबते सुरु आहेत ती प्रत्यक्षात उतारण्यापूर्वीच संघ स्वयंसेवकांनी आणि मूळ भाजपा कार्यकर्त्यांनी एक मिशन म्हणून बाहेरून अचानक आलेल्या या मंडळींना संघ आणि भाजप नेमका कसा, समजावून सांगायला सुरुवात करण्यास हरकत नाही किंबहुना येणाऱ्या मुस्लिमांना देखील हेच सांगायचे आहे आमच्यातले नेमके उत्तम जे आहे त्याचा स्वीकार करा त्यात तुमचे हित आहे, विशेष म्हणजे मुस्लिम धर्माला बाधा येईल असा दूरदूरपर्यंत साधा विचार देखील संघ भाजपाच्या मनात नाही हेही त्यांना जीव तोडून तुम्ही सांगायलाच हवे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी