एबीपी गाढव माझा :पत्रकार हेमंत जोशी
ज्यांना उद्धव ठाकरे नीटसे समजलेले नाहीत त्यांनी उगाच त्यांच्याशी मस्ती करू नये. उद्धव यांना जो कमी लेखतो अंडरएस्टिमेट करतो पुढे त्याला शंभर टक्के पश्चाताप होतो त्यावर याठिकाणी मी तुम्हाला अगदी संजय राऊत सहित आणि पुराव्यांसहित किमान शेकडो उदाहरणे अगदी सहज देईल. वास्तविक अनेकांना माहित असते कि उद्धव यांचे मारुतीच्या बेंबीसारखे आहे म्हणजे बोट घातल्यानंतर बेंबीच्या आत विंचू आहे तरीही अनेक नको ती मस्ती उद्धव यांच्याशी करायला जातात नंतर आरडाओरड करीत बाहेर पडतात, नेमकी हि अवस्था मंगळवार दिनांक १७ रोजी उद्धव यांनी एबीपी माझा वाहिनीची आणि वाहिनीच्या प्रमुखांची म्हणजे राजीव खांडेकर यांची अतिहुशारीतून झाली. नको तो आगाऊपणा त्यांना १७ तारखेला नक्की भोवला कारण खांडेकरांना उद्धव समजलेले नाहीत तसे ते अद्याप या मीडिया मधल्या अनेकांना समजलेले नाहीत त्यांचाही उद्धव नक्की राजीव खांडेकर संजय राऊत राजेश टोपे करून सोडतील. तमाम मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना आणखी येथे अतिशय महत्वाचे सांगतो कि कोणीही गाढवाच्या मागून आणि उद्धव ठाकरे यांच्या पुढून जाण्याचा प्रयत्न करू नये, उद्धव दिसतात आणि आहेत नाजूक पण ते एकदा का मनातून एखाद्यावर चिडले कि त्यांच्या बसणाऱ्या लाथेमध्ये अचानक शंभर हत्तींचे बळ येते आणि ते ढुंगणासारख्या नेमक्या नाजूक अवयवावर लाथ मारून मोकळे होतात…
एकतर विशेषतः मुंबई आणि पुणेकर यादिवसात करोनामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत पॅनिक झालेले आहेत त्यात त्यांचे मनोबल खचण्यास सर्वाधिक कारणीभूत विविध मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत, या वाहिन्यांना सतत २४ तास टिआरपी च्या नादात करोनाविषयी जणू दुसऱ्या बातम्याच उरलेल्या नाहीत, येता जाता तेच ते आणि तेच ते, बघवत नाहीत या वाहिन्या. त्यात एबीपी माझा आणि राजीव खांडेकरांनी मंगळवारी नको तो आगाऊपणा करून ठेवला, खांडेकरांनी ट्विट केले आणि एबीपी माझा ने सांगून टाकले कि ट्रेन बंद होताहेत आणि शासकीय व निमशासकीय कार्यालये एक आठवड्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. कशासाठी आणि कोणाचा हा या वाहिनीवर आगाऊपणा, अहो, ते काय उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे असते का मुंबईतल्या लोकल ट्रेन बंद करण्याचे आदेश देण्याचे, हे खांडेकर आणि एबीपी माझा चे अशा सडकछाप टुक्कार बातम्या देणे अजिबात योग्य नाही. जोपर्यंत केंद्र सरकार ठरवीत नाही तोपर्यंत केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री या नात्याने उद्धव काहीही करू शकत नाहीत हे निदान खांडेकर यांना चांगले माहित असतांना त्यांनी तिकडे मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक सुरु असतांना इकडे आपल्या वाहिनी वर नको तो आगाऊपणा करून मुंबईकरांना पॅनिक करण्याचे मोठे पाप केले…
www.vikrantjoshi.com
आता पुढे जाऊन विशेषतः आरोग्य मंत्री राजेश टोपे किंवा विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना सांगतो कृपया, मीडिया माझ्या बापाचा पद्धतीने निदान त्या उद्धव ठाकरे यांच्याशी तरी खाजवू नका, तुम्हालाच खरूज होईल, त्यांचे काहीही जाणार नाही, उलट संध्याकाळी घरी गेल्या गेल्या ते आणि रश्मीवाहिनी सोफ्यावर बसून आधी पोट धरून धरून हसून घेतील. अलीकडे एका इंग्रजी दैनिकाचा अतिअगाउ अतिउद्धट अतिकरप्ट सध्या असलेला कि नसलेला वार्ताहर देखील असेच काहीतरी अनेकांकडे बरळत होता कि हे महाआघाडी सरकार त्याच्यामुळे सत्तेत आले आहे. वाटते एखाद्या गाढवाला कि अख्खी बैलगाडी तोच पुढे पुढे ढकलतो आहे, त्याचे नेहमीचे हे असे काहीबाही बरळणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कानावर जर गेले तर ते दोघेही किमान दिवसभर तरी पॉट धरधरून हसतील. किमान निदान शंभर वेळा तरी मी सांगितले असेल कि उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र कुटून तयार झालेले खतरनाक रसायन आहे, एखाद्याने ते खतरनाक रसायन स्वतःच्या ढुंगणावर मुद्दाम ओतून घेऊ नये, ढुंगण भाजते, आग आग होते, जी आग १७ तारखेला एबीपी माझा आणि खांडेकरांची झाली, ना मंत्रालय बंद पडले ना लोकल ट्रेन बंद झाल्या, बावळट कुठले…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी