सत्तेतले सारेच अंदाधुंद महाराष्ट्रातले नेते बेधुंद :
विचित्र योगायोग हा, 3 फेब्रुवारीला खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो त्याच्या नेमक्या आदल्याच दिवशी कल्याण मध्ये गणपत गायकवाड विरुद्ध महेश गायकवाड कांड घडले, महेश आणि गणपतराव दोघांचेही नशीब बलवत्तर, महेश गंभीर जखमी होऊन देखील वाचला त्यानंतर 9 फेब्रुवारीला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस, येथेही तोच प्रकार, नेमके आदल्या दिवशी मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर कांड घडले आणि दोन्ही दिवशी या पिता पुत्राच्या वाढदिवसावर पाणी फिरले आनंदावर विरजण पडले. दोन्ही प्रकार जवळपास सारखे होते म्हणजे दोन्हीकडे बिनधास्त बेधडक अंधाधुंद गोळीबार झाला, दोन्हीकडल्या भानगडी वाट्यावरून जीवघेण्या ठरल्या, दहिसर मध्ये तर दोघांचाही जीव गेला आणि सत्तेतली मस्ती धुंदी लोभ अनुक्रमे मॉरिस आणि अभिषेक या दोघांच्याही मागे उरलेल्या कुटुंबाला उध्वस्त करून गेला, मी जे सांगतो तेच सत्य आहे कि पैशांच्या लोभात अडकलेले जे सारे, लुटताना लुबाडतांना नक्की कुठे थांबावे हेच नेमके या मंडळींना कळत नाही, अतीलोभ आवरत नाही त्यामुळे राज्याला सामान्य माणसाला सतत ओरबाडून खाणार्या या मंडळींचा केवळ वक्त चांगला असतो पण त्यातील प्रत्येक कुटुंबाचा अंत अत्यंत वाईट आहे असतो, जे गायकवाड मॉरिस किंवा घोसाळकरांच्या बाबतीत घडले हुबेहूब तेच आज ना उद्या कदाचित केवळ प्रसंग वेगळ्या पद्धतीचे ओढवतील पण ज्यांनी ज्यांनी म्हणून या राज्याला सतत लुटले लुबाडले आहे किंवा अविरत आजही लुबाडताहेत त्यातल्या प्रत्येक कुटुंबाचा अगदी शंभर टक्के उद्धव ठाकरे शरद पवार गणपत गायकवाड अभिषेक घोसाळकर नक्की होणार आहे कारण या पद्धतीच्या लुटारुंच्या सभोवताली दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात मॉरिस पद्धतीचे अक्राळविक्राळ रूप नक्की घिरट्या घालत असते. एकेकाळचे गुंडांचे टोळीयुद्ध पोलिसांनी गुंडांचा गुंड टोळ्यांचा खात्मा करून आटोक्यात आणले म्हटल्यापेक्षा बऱ्यापैकी संपविले पण राज्यकर्त्यांच्या यादिवसात भडकलेल्या टोळीयुद्धाला पोलीस देखील संपवू शकणार नाहीत कारण ते देखील त्यात सामील आहेत म्हणून अशावेळी नियती आपले काम करीत असते म्हणजे राज्याला पर्यायाने सामान्य माणसाला लुटणारे लुबाडणारे जे नेते, अधिकारी, दलाल, मीडियातले किंवा आमदार मंत्री खासदार, विविध हुद्द्यावरचे पुढारी किंवा अन्य जे कोणी असतील त्यांना पोलीस नव्हे तर नियती हमखास संपविणार आहे…
www.vikrantjoshi.com
नियती नक्की आपले काम चोख बजावत असते म्हणजे दुष्टांचा नेमका बदला घेते, ज्यावर माझा मोठा विश्वास आहे. सत्ताधाऱ्यांमधले कुठलेही भांडण तत्वांसाठी किंवा राज्याच्या भल्यासाठी अजिबात लागलेले नाही नसते, बहुतेक प्रत्येक वाद हा फक्त आणि फक्त वाट्यावरुन असतो, सहजगत्या जे मिळते ते देखील खूप मोठे असते पण त्यावर समाधान न मानणारे सत्तेशी संबंधित हे समस्त खादाड, त्यांना हाव सुटत नाही पुढे नियती त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला सोडत नाही त्यामुळे ज्यांना आपण मस्ती करताना थेट सतत डाकूंच्या भूमिकेत बघितलेले असते त्याच मंडळींचा एक दिवस नक्की व नेमका घोसाळकर होतो आणि परमेश्वर आपला हिशेब चुकता करून या मंडळींकडे छद्मीपणे हसून बघत असतो. घोसाळकर जसे थांबायलाच तयार नव्हते म्हणजे विनोद आधी स्वतः दहिसर भागातला वर्षानुवर्षे शिवसेनेचा अनभिषिक्त नेता त्यानंतर नगरसेवक नंतर आमदार नंतर मुलगा अभिषेक नगरसेवक त्यानंतर सून तेजस्वी देखील नगरसेवक, आता अभिषेक आमदारकी लढविण्याच्या जय्यत तयारीत होता, हे असे कदम कीर्तिकर घोसाळकर पद्धतीचे सारेच नेते त्यांच्या सोबतीला लुटणारे अन्य दलाल मीडिया कंत्राटदार सरकारी अधिकारी, वर्षानुवर्षे कुठे थांबायलाच तयार नाहीत नसतात त्यामुळे आज जे नेमके घोसाळकरांचे झाले कदाचित वेगळ्या पद्धतीने घडेल पण लुटणाऱ्या प्रत्येक लबाडाचा आज ना उद्या शंभर टक्के कधी विनोद घोसाळकर ता कधी निवृत्त प्रशासकीय अधिकारी निर्मलकुमार देशमुख शंभर टक्के होणार आहे आणि मी जर या लुटारू टोळ्यांचा एक सदस्य असेल तर माझ्या बायकोला अगदी चोवीस तास जरी मी नेहमीप्रमाणे सतत देवाचा धावा भक्ती जप करायला सांगितलेले असले तरीही मला देखील देवाची शिक्षा येथेच भोगून नंतर वर जावे लागेल. कुठे थांबायचे हे जसे त्या निवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांना न समजल्याने अलीकडे त्यांच्या घरावर मालमत्तेवर आयकर खात्याने धाड घातली, याच पद्धतीच्या अधिकाऱ्यांवर कदाचित आयकर खाते धाड घालणार नाही पण देवाची नजर त्यातल्या कोणालाही चुकवता येणार नाही, राधेश्याम मोपालवार यांच्यासारखे प्रसंगी परदेशात पळून गेलात तरी. हृदयपरिवर्तन हाच यावर नेमका आणि नक्की पर्याय आहे, हृदयपरिवर्तन इतरांनी नव्हे तर स्वतःच घडवून आणायचे असते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी