अखेरचा हा तुला दंडवत :
अखेरचा हा तुला दंडवत, चौकात किंवा पावसात उभे राहून भिजून म्हणावे आणि थेट कायम बारामतीला निघून जावे, ज्या लहान मुलांना जेवण कुठे आटोपते घ्यावे समजत नाही, त्यांना जसे पानावरुन उठवून दिल्या जाते तेच नेमके शरद पवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांकडून घडू शकते पण त्या आधीच खुद्द पवार यांना, आपल्याला अगदी हात धरून उठवून दिल्या जाऊ शकते, हे लक्षात आलेले असल्याने त्यांनी आता आपणहून कार्यकर्त्यांना, अखेरचा दंडवत ठोकून थेट कायमस्वरूपी बारामतीला निघून जावे आणि उर्वरित आयुष्य देवपूजेत घालवावे, समोरच्याला किळस येईपर्यंत किंवा तुम्हाला अपमानित करून हाकलून देईपर्यंत जसे पाहुण्यांनी नातेवाईकांच्या घरात मुक्काम ठोकायचा नसतो नेमके तेच येथे शरद पवारांना सुचवायचे आहे, आजतागायत राजकीय विरोधकांना जेवढे म्हणून छळायचे होते तेवढे एखाद्या खाष्ट दुष्ट सासूसारखे तुम्ही छळून घेतले कि, शेवटी मोदी फडणवीस तुमच्या प्रत्येक डावपेचाला पुरून उरले आणि तुमचा थेट सिनेमातला राजेश खन्ना झाला कारण राज्यातला ‘ अमिताभ ‘ फडणवीस तुमच्यापुढे बघता बघता निघून गेला आणि पुरुनही उरला, जे आधी बळजबरीने तुमचे ऐकायचे तुमच्यासमोर मान खाली घालून उभे राहायचे आज ते सारेच्या सारे मोठ्या मानसन्मानाने थेट फडणवीसांच्या हातात हात घेऊन त्यांच्या शेजारी प्रेमाने आणि विश्वासाने उभे आहेत आणि तुमच्यात नव्हे तर नरेंद्र मोदी यांच्यात पित्यासमान नेत्याचे रूप ते मनात हृदयात साठवताहेत, आयुष्याच्या संध्याकाळी, आपण विश्वास का गमावून बसलो, त्यावर आत्मचिंतन करा आणि हिम्मत झाल्यास लिहून ठेवा कि अमुक एखाद्या नेत्याने कोणत्या घोड गंभीर चुका टाळायला हव्यात…
www.vikrantjoshi.com
वाचकहो, अगदी पुराव्यांसहित मी तुम्हाला सांगतो आहे कि शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही तेही थेट नरेंद्र मोदी यांनी वेळ काढून वेळ देऊन एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा चर्चा केली होती, माझ्या सोबतीला या त्यातच तुमचे नक्की भले आहे त्यांनी या दोघांनाही जेव्हा जेव्हा सांगितले, दोघांकडूनही प्रत्यक्ष भेटीत, आम्ही नक्की तुमच्या साथ संगतीला येतोय, सांगितले जायचे आणि मुंबईत परतले हे दोघेही आळीपाळीने जेवढे म्हणून तोंडसुख घेणे शक्य असे, मोदी फडणवीस आणि भाजपावर जहरी टीका करून मोकळे व्हायचे, विशेष म्हणजे या दोघांनी देखील फडणवीसांवर गोळ्या झाडायच्या तेवढ्या बाकी ठेवल्या, एवढ्या खालच्या पातळीवर येऊन त्यांना वेळोवेळी अडकविण्याचा मोठा डाव रचला पण नशीब आणि पुण्याई फडणवीसांच्या बाजूने त्यामुळे देवेंद्र दरवेळी सहीसलामत बाहेर आले, पवार तर अजूनही दर दिवशी फडणवीसांना छळण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात अर्थात शरदराव आज उद्धव एकेकाळचे राजकारणातले दारासिंग, किंवा वनिता खरात आज एखाद्या क्षयराग्यासारखे क्षिण नेते म्हणून अपेक्षांच्या भिरभिरत्या नजरेने यादिवसात अवजड ठरलेल्या राज्यातल्या विविध दमदार नेत्यांकडे बघू लागले आहेत. पवारांना आता काहीही झाले तरी नव्याने संधी अजिबात नाही त्यांनी खरोखरी मनापासून अखेरचा दंडवत ठोकून बारामतीच्या एखाद्या देवळात टाळ कुटत बसावे पण माझी जी अगदी ताजी ताजी माहिती आहे त्यानुसार पुन्हा एकवार नाईलाजाने उद्धवजी हे मोदी आणि भाजपा जवळ जाण्याचा जो प्रयत्न करताहेत त्यात खरोखरी त्यांना यश यावे. उद्धवजी यांना जवळ घेण्यात अडचण आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची, एका म्यानात एकनाथ नावाची तलवार आणि उद्धव नावाचा एकेकाळचा धारदार पण आजचा काहीसा बोथट झालेला रामपुरी नेमका कसा चपखल बसवायचा त्यावर भाजपा श्रेष्ठींमध्ये वेळोवेळी विचारमंथन व खलबतें सुरू आहेत, बघूया कसे जमते ते…
शरदराव, वाईट वाटते सांगतांना पण इतिहासाची कायम पुनरावृत्ती होत असते. औरंगजेब मुलांच्या हाती सत्ता न देता सतत मुलांना छळत होता, वेळेवर बाजूला झाला नाही त्याला लोभ आवरता आला नाही परिणामी पुढे त्याला दिल्ली सोडून महाराष्ट्रात यावे लागले केवळ मुलगी झीनत सोबतीला होती त्यातून तो एकाकी तळमळत राहिला अखेरपर्यंत, पुढे खंगून मेला. हे उदाहरण मी नाही थेट शालिनीताई यांनी जवळच्या कार्यकर्त्याकडे सांगितले आहे. केवढे त्या उदाहरणात साम्य आहे. तुमच्यामुळे पुतण्या माझ्या दूर गेला हि वेळ तुमच्यावर देखील एक दिवस येईल हे गोपीनाथ मुंडे यांनी काढलेले उद्गगार, नेमके खरे ठरले आहेत. चोर मचाये शोर चित्रपटात नेता नेता मदन पुरी याच्या अंगावरचे कपडे हिरो शशी कपूर लिलावात काढतो, किंमत चांगली येते बघून अखेर मदन पुरी ची अंडरवेअर देखील लिलावात काढण्यासाठी तो अंगावरून खेचायला लागतो, तुमच्याच माणसांनी शरदराव तुम्हाला देखील राजकारणात आज नागडे करून सोडले, चूक सर्वस्वी तुमची आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी