गोंधळात गोंधळ, राज्यस्तरीय राजकीय सावळा गोंधळ :
जे राजकारणात आहेत किंवा ज्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे असेल त्यांनी पुढील प्रत्येक वाक्य आजच पाठ करून ठेवा कारण येथे मी जे तुम्हाला सांगणार आहे नेमके आणि नक्की पुढे तेच घडणार आहे. राज्यातल्या भारतीय जनता पक्षातली उलथापालथ फारशी इतरांच्या लक्षात येत नसल्याने विशेषतः भाजपचा बाहेरून आलेला नव्हे तर हार्ड कोअर कार्यकर्ता जो रा स्व संघाचाही हमखास स्वयंसेवक असतो गेल्या काही महिन्यांपासून विमनस्क किंवा गोंधळलेल्या अवस्थेत आहे, नेमके काय सुरु आहे किंवा बाबांचे बाहेर लफडे सुरु असल्याने आपल्याकडे त्यांचे कायम दुर्लक्ष होईल का, अशी जी बाहेरख्याली असलेल्या पुरुषाच्या मुलांना बायकोला भीती असते तीच नेमकी भीती यादिवसात नक्की संघ भाजपाच्या या हार्ड कोअर मंडळींना मोठ्या प्रमाणात वाटते आहे त्यांच्या मनात असुरक्षतेतीची मोठी भावना निर्माण झालेली आहे जी पूर्णतः चुकीची आहे कारण बाहेरून आलेल्या नेत्यांना व कार्यकार्त्यांना विशेषतः महायुती किंवा भाजपामध्ये देण्यात आलेले महत्व हि तात्पुरती सूज आहे ती नक्की ओसरणार आहे किंबहुना पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन केल्या गेल्यास म्हणजे त्यांना तसेच विनोद तावडे या दोघांनाही राज्यसभेवर घेतले गेल्यास, कार्यकर्त्यांच्या स्वयंसेवकांच्या मनातली भीती नक्की कमी होऊ शकते. विशेष म्हणजे केंद्रातल्या भाजपाने आपल्या राज्यातली भाकरी मोठया युक्तीने अशी फिरवली आहे जे फारसे इतरांच्या लक्षातही आलेले दिसत नाही, दिल्लीने हळूच विनोद तावडे यांचे राज्यात व देशात, दिल्लीत मोठ्या खुबीने महत्व वाढवून ठेवले असतांना त्याचवेळी आधी राज्यातल्या ज्या नेत्यांचे महत्व वाढवून ठेवण्यात आलेले होते त्यांना आता जवळपास अडगळीत टाकण्याचे त्यांनी ठरविलेले आहे ज्यात नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर किंवा डॉ सुभाष भामरे असे कितीतरी नामवंत चेहरे आहेत तुमच्या ते लक्षात येईल याउलट विनोद तावडे यांचे वाढलेले महत्व, उद्या त्यांचा नड्डा यांच्या जागी विचार झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही…
www.vikrantjoshi.com
भारतीय जनता पक्षात किंवा इतरही राजकीय पक्षात जो वेळोवेळी तोंड उघडतो, अद्वातद्वा बोलतो, आगाऊ वागतो, नेत्यांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून सतत जाण्याचा प्रयत्न करतो, सो चुहे खा के बिल्ली हज को चली, पद्धतीने वागतो वरून उगाच ज्ञानाचे डोस इतरांना पाजून स्वतः वाटेल ती घाण करून मोकळा होतो त्याचा हमखास एकनाथ खडसे होतो पण सारे काही करून, प्रकरणे अंगलट आल्यानंतर जो शांत बसतो मूग गिळून बसतो काही काळ शांततेत घालवतो तो हमखास विनोद तावडे पद्धतीने काही वेळानंतर यशस्वी होऊन इतरांना मागे टाकत फार पुढे निघून जातो, पंकजा मुंडे यांना सल्ला देणारे देखील नेमके तेच होते एकनाथ खडसे व विनोद तावडे, पंकजा यांनी सुदैवाने विनोद तावडे काकांचा बापासारखा सल्ला ऐकला, आधी हळूच आत्मक्लेश दौरा काढला त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याशी तुझ्या गळा माझ्या गळा पद्धतीने पुन्हा मानाचे सन्मानाचे संबंध प्रस्थापित केले विशेष म्हणजे हे सारे करीत असतांना बोलण्यात वागण्यात पंकजा यांनी कोठेही स्वतःचा एकनाथ खडसे अजिबात होऊ न देता शांत व संयमित राहण्याची भूमिका घेतली त्यातून आधी राज्यसभा त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पद्धतीने या राज्यातली मान्यवर मोठी ओबीसी नेता अशी त्यांची छबी उभी करण्यात पुढल्या काही दिवसात भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे तुमच्या लक्षात येईल थोडक्यात जे दोन नेते राजकारणातून बाजूला पडले संपले असे चित्र निर्माण झालेले होते आज त्याच तावडे आणि पंकजा यांना फार मोठ्या संधी भाजपा श्रेष्ठींनी वाढून आणल्याचे दृश्य जाणकारांना बघायला नक्की मिळते आहे. नेमकी हाच विचार शेवटची संधी असलेल्या उद्धव ठाकरे यांना स्वतःला करायचा आहे म्हणजे स्वतःचा हेमंत सोरेन करून पक्षाचे स्वतःचे कुटुंबाचे कायमसवसरूपी वाटोळे करवून घ्यायचे कि नितीश कुमार पद्धतीची भूमिका घेत पुन्हा राजकारणातले वैभव मोठ्या खुबीने व युक्तीने परत मिळवायचे हे नेमके नक्की आणि त्वरेने उद्धव यांना ठरवावे लागणार आहे, हिंदुत्व हीच माझी उघड आणि कायमस्वरूपी भूमिका त्यातून उद्धव आणि त्यांची शिवसेना कधीही नोव्हेअर होऊ नये, मनापासून वाटते, त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्राचे नितीशकुमार व्हावे आणि हो मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जवळपास निश्चित केले आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी