एका खवय्या पण लढवय्या नेत्याचा राजकीय अंत :
या मथळ्यावरून तुम्हाला मी येथे शरद पवारांविषयी लिहितोय बोलतोय, वाटले असेल पण तसे नाही मात्र हाही नेता यादिवसात नेमका पवार यांचाच भक्त व चेला आहे त्यांच्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीचा नाईलाजाने एक भाग आहे कारण या नेत्याला पुन्हा भाजपामध्ये एंट्री नाही आणि अजितदादांची इच्छा असली तरीही या नेत्याला तेथेही प्रवेश नाही थोडक्यात नाईलाज झाला म्हणून उतरत्या वयात मामाचा न आवडणारा मुलगा नवरा केला अशी एखाद्या भाचीसारखी या नेत्याची अवस्था आहे यात तो स्वतःच जबाबदार आहे, तसेही मी या एकेकाळच्या गाजलेल्या नावाजलेल्या नेत्यावर लिहावे हे त्याच्या जिल्ह्यातल्या त्याच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांना फारसे यासाठी रुचत नाही कारण त्यांचे म्हणणे सांगणे असे कि जशी नसबंदी केलेल्या पुरुषाकडून अपत्याची अपेक्षा ठेवू नये तद्वत हा संपलेला खंगलेला नेता, त्याला तुम्ही उगाच मोठेपणा देऊ नये, लिखाणातून त्याचे संपलेले महत्व वाढवू नये. तुमच्या ते लक्षात आले असेल कि मी माजी वादग्रस्त मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी येथे नेमके काही सांगणार आहे, येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी साडेसाती कशा, हेही येथे नक्की विषद करणार आहे…
www.vikrantjoshi.com
ज्यांच्या बाजूने मराठा आणि लेवा पाटेदार समाज त्यांची जळगाव जिल्ह्यातून निवडून येण्याची शंभर टक्के खात्री हे ठरलेले गणित, नाही म्हणायला शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यात देखील याच लेवा पाटेदार समाजाची बऱ्यापैकी ताकद असली तरी जळगाव जिल्हा हाच खऱ्या अर्थाने या राज्यातला लेवा पाटेदार समाजाचा हुकमी बालेकिला ज्या समाजातून जी तू महाजन मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी आणि एकनाथ खडसे असे काही नेते मंत्रिमंडळात होते, अनेक आमदार आणि खासदार देखील आजतागायत निवडून आलेले पण लेवा समाज तसा राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक, चाणाक्ष व प्रगल्भ त्यामुळे जिल्ह्यातून नेमक्या कोणत्या नेत्याच्या केव्हा व कुठपर्यंत पाठीशी उभे राहायचे त्यांचे गणित ठरलेले असते थोडक्यात नेता हा लेवा समाजाचाच असायला हवा त्यांचा आग्रह किंवा त्यापध्दतीचा दृष्टिकोन नसतो म्हणून समस्त लेवा समाजाने अलीकडे काही वर्षात थेट एकनाथ खडसे यांना बाजूला सारून लाथाडून चक्क गुजर समाजाच्या मंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्व स्वीकारले आहे किंवा याच पद्धतीने एके काळी किंवा सतत कित्येक वर्षे एकेकाळच्या त्यांच्या अत्यंत लाडक्या नेत्याला बाळासाहेब चौधरी यांना ढकलून दूर सारून बाजूला करून मूठभर मारवाड्यांच्या सुरेशदादा जैन यांना आपला नेता मानले होते, सतत जवळपास 30 वर्षे जळगाव जिल्ह्यातले हेच प्रभावी मराठा आणि लेवा त्या सुरेशदादा यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा नित्यनियमाने जय जयकार करायचे त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे….
ज्या जळगाव जिल्ह्याने एकेकाळी श्री शरद पवार आणि एकनाथ खडसे यांना डोक्यावर घेतले होते आज त्या दोघांचेही संपूर्ण जिल्ह्यातले महत्व व अस्तित्व जवळपास संपल्यात जमा आहे याउलट भाजपा हा या जिल्ह्यातला टॉपचा पक्ष ठरलेला असून विनिंग फॅक्टर लेवा समाज प्रामुख्याने गिरीश महाजन व भाजपा व महायुतीच्या पाठीशी नेमका आणि नक्की उभा आहे. लेवा समाज किंवा एकंदर जिल्ह्यातले मतदार तसे प्रोफेशनल आहेत, ज्यांनी राष्ट्रपती पदाला पोहोचलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील जसे कधी फार मोठे महत्व दिले नाही नव्हते याच जिल्ह्याने सत्तेतून बाजूला पडताच दिवंगत बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाला अडगळीची जागा दाखवली होती जे नेमके आज एकनाथ खडसे यांच्याही बाबतीत घडले आहे कदाचित याच जिल्ह्यात पुन्हा एकवार माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे राजकीय व सामाजिक महत्व वाढले असते पण सुरेशदादा यांनी स्वतःच राजकीय निवृत्ती स्वीकारलेली असल्याने ते जळगाव पेक्षा मुंबईतच अलीकडे अधिक रमतात, नातवंडांशी उतारवयातल्या आजोबा गोष्टी करतात. ज्या लेवा पाटेदार समाजाच्या भरवंशावर एकनाथ खडसे विरोधकांना अंगावर घ्यायचे, कोणालाही ललकारायचे, आज त्याच लेवा समाजाने जवळपास पूर्णतः खडसेंकडे स्पष्ट फिरवलेली असल्याने, सुनबाई रक्षा खडसे यांना देखील भाजपा लोकसभेची उमेदवारी देणार नाही, म्हणून नक्की व नेमके सांगतो कि खडसे यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय व्हेंटिलेटरवर आहे आणि हे व्हेंटिलेटर जसे इतरांनी काढून घेतले तेच नेमके रक्षा बाबत भाजपाचे होणार आहे….
अपूर्ण : हेमंत जोशी