कोकण नेतृत्वाचे दावेदार, सामंत बंधू हकदार :
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना नृत्यातली हेलन व्हायची असेल आणि भाजपातील व्हिलन व्हायचे नसेल तर त्यांनी कोकणातल्या मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या संघ स्वयंसेवकांना हाताशी धरून तेथे वारंवार जाऊन मुक्काम ठोकून म्हणजे मधूनच एखाद्या पाहुण्यासारखे न जाता जर पार विस्कटलेली घडी बसवली तर इतर कोणत्याही राजकीय पक्षांच्या स्पर्धेत पुढल्या काही वर्षात कोकणातली भाजपा इतरांच्या तुलनेत शंभर टक्के पुढे निघून जाईल अन्यथा आज आहे त्यापेक्षा देखील अधिक रसातळाला जाईल, त्या सामंत बंधू यांच्या कार्यपद्धतीमुळे शिंदे यांच्याच शिवसेनेला अधिकाधिक बळकटी येत जाईल कारण किरण आणि उदय या सामंत बंधूंचा झंझावात हा धृतराष्ट्रासारखा आहे त्याने जसे शंभर मुले पाठोपाठ पटापट झटपट आणि बायकोशी झटापट करून जन्माला घातली तेच सामंतांचे, जेथे कमी तेथे आम्ही, हा त्यांचा नेहमीच व नेमका फॉर्म्युला, त्यातून सामंतांना कोकणातल्या नेतृत्वात जेथे जेथे पोकळी जाणवते अशावेळी केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा संकुचित विचार न बाळगता, हे दोघे जातीने लक्ष घालतात आणि व्यक्तिगत तसेच ते ज्या पक्षात असतात त्या पक्षाची राजकीय ताकद वाढवून मोकळे होतात. हेच सामंत बंधू अगदी कोवळ्या वयात होते तेव्हा ते पवारांच्या राष्ट्रवादीत होते, पुढे याच शरद पवारांनी त्या अजितदादांच्या आग्रहावरून जेव्हा उदय सामंत यांना युवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले त्यानंतर पुढल्या काहीच महिन्यात उदय आणि किरण सामंत त्यांच्या जोडीला संगतीला भास्कर जाधव आणि सुनील व अनिल तटकरे, त्यावेळेच्या शिवसेनेच्या नाकात या नेत्यांनी दम आणला, एरवी बोलबाला असलेली काँग्रेस आणि शेकाप दोघांनाही मोठ्या फरकाने मागे खेचले आणि शरदरावांच्या राष्ट्रवादीला कधी नव्हे ते कोकणातल्या कानाकोपऱ्यात सर्वत्र नेले पण त्यानंतर जेव्हा सुनील तटकरे एकाकी पडले, ते आणि त्यांची अजितदादा राष्ट्रवादी केवळ रायगडपूर्ती मर्यादित राहिली आहे आणि अख्या कोकणात शरदरावांच्या राष्ट्रवादीचा अखेरच्या दिवसातला राजेश खन्ना झालेला आहे, औषधाला शरदरावांचे कार्यकर्ते व नेते शोधावे लागतात…
www.vikrantjoshi.com
भाजपामध्ये कोकणच्या राजकीय वर्तुळाचा नेमका आणि मोठा अभ्यास विनोद तावडे यांनाच आहे, विशेषतः मंत्री असताना त्यांनी कोकणात भाजपा आणि आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविण्याचा काही काळ प्रयत्न केला पण त्यांचेही मुसलमानांच्या व्यवसायासारखे असते जसे मुसलमान पावसाळ्यात भंगारचा व्यवसाय करतो मधेच उन्हाळ्यात तो आंबे विकायला सुरुवात करतो, हिवाळ्यात त्याला कोंबड्या विकायची लहर येते, तावडे यांचे हे असेच, कधी त्यांना दिल्लीत रस असतो तर कधी आपल्याच पक्षात स्वतःचा गट उभा करण्यात ते वेळ घालवतात तर कधी ते भलतीकडेच व्यस्त असतात अन्यथा याच विनोद तावडे यांनी प्रसंगी कोकणातल्या अगदी विरोधी पक्षातल्या भास्कर जाधव सारख्या नेत्यांना हाताशी धरून त्यांनी भाजपाची ताकद नक्की वाढवली असती, नितेश राणे हे या दिवसातले भाजपाचे कोणालाही अंगावर घेऊन इट का जवाब पत्थर से देणारे हुकमी एक्के, त्यांना आता त्या कोकणात बसून भाजपा बांधायला वेळ नाही, भाजपाला ते सतत यादिवसात मुंबईत हवे असतात आणि निलेश यांचा राजकारणातला रस कमी झालेला, नारायणरावांचे वय झाले असल्याने बाळासाहेबांचे एकेकाळचे कोकणातले वाघ त्यांच्यात दिसणार नाही, उरलेले नाहीत सुनील तटकरे यांना देखील पूर्वीसारखे रायगड पलीकडे उतरायचे नाही, या सार्या गोंधळाचा नेमका फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त आणि फक्त उदय आणि किरण सामंत या दोन भावांमुळे होतो आहे होणार आहे किंबहुना येणाऱ्या निवडणुकात अख्ख्या महायुतीला सामंत बंधू तारून नेतील, विरोधकांना मारक व घातक ठरतील हे नक्की आहे.
अमुक एखाद्या निवडणुकीची पूर्व तयारी कशी व कोणत्या पद्धतीने करायची असते हे बाप अण्णा सामंत आणि मुले किरण तसेच उदय सामंत यांच्याकडून शिकण्यासारखे विशेष म्हणजे हे सारे पूर्वापार व्यावसायिक त्यामुळे नेता असो वा कार्यकर्ता, भेटणार्या प्रत्येकाला क्षणार्धात आपलेसे करण्याची त्यांची हातोटी, त्यामुळे राजकारणात ते जे जे ठरवितात ते नेमके व नक्की घडवून आणतात जसे कि यावेळी किरण सामंत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा लढवायची आहे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पराभूत करायचे आहे, त्यांनी हे जे ठरविले आहे, ते घडणार आहे, किरण सामंत पुढले खासदार आहेत आणि या बंधूंना उद्धव ठाकरेंच्या कोकणातील नेतृत्वाला सुरुंग लावायचा आहे तसे वचन त्यांना एकनाथ शिंदेंना दिलेले आहे, सामंत बंधू वचन निभावत वचन पूर्ण करतील हि आता काळ्या दगडावरची रेघ आहे. राज्यातला, कोकणातला अफाट जनसंपर्क, कार्यकर्त्यांसाठी मदतीला धावून जाण्याची वृत्ती, कायम लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव त्यामुळे कोकणातले सामंत बंधू राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा तसेच कौतुकाचा विषय ठरले आहेत, वागण्या बोलण्यातली कोणतीही चूक हातून घडणार नाही एवढी काळजी त्यांना पुरेशी आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी