नेत्यांचे नातेवाईक व मुले, काही सुवासिक फुले
काही सडकी फळे :
चाळीवजा इमारतीमध्ये राहणाऱ्या बायका कठड्यावर अशा पद्धतीने साड्या वाळत घालतात कि त्या खालच्या मजल्यावर येऊन पोहोचल्याने खालून वर बघणार्यांच्या नेमके लक्षात येत नाही कि वाळत घातलेली साडी दुसऱ्या माळ्यावरच्या वाघमारे बाईची आहे कि तिसऱ्या माळ्यावरच्या मोरे बाईंची आहे, जयंत पाटलांचे नेमके हे असेच काही महिन्यांपासून सुरु आहे म्हणज त्यांना शरदरावांच्या राष्ट्रवादीत राहायचे आहे कि अजितदादांना येऊन बिलगायचे आहे, इकडे दादांनी त्यांच्यासाठी महत्वाचे एक खाते मुद्दाम राखून यासाठी ठेवले आहे कि मेरा जयंत आयेगा और शपथविधी होवेगा, पण जयंतरावांचे व्यक्तिगत आयुष्यात देखील हे असेच आहे म्हणजे कायमस्वरूपी ‘ बजाज ‘ वर स्वार होऊन घराबाहेर पडायचे कि घरची मर्सिडीज असेल भले जुनी पण माझ्यासाठी बावनखणी, म्हणून मोकळे व्हायचे, त्यांच्या या ‘ धर – सोड ‘ वृत्तीला मला वाटले होते कि दोन्ही मुले कंटाळून वाममार्गाला लागतील पण सुदैवाने दोघेही म्हणजे राजवर्धन आणि प्रतीक सद्गुणी हुशार चाणाक्ष स्वावलंबी तर निघालेच पण दोघेही लग्नानंतर चांगल्या घरी पडले, उतारवयात शैलजा पाटील मनापासून नक्कीच सुखावल्या असतील. थोडक्यात, माणूस आपला पुनर्जन्म आपल्या मुलांमध्ये बघतो आणि पोटची मुले कर्तबगार निघालेत कि मनोमन सुखावतो. ज्यांच्याकडे वाममार्गाने अतोनात पैसा येतो त्यांचे आपोआप घराकडे कुटुंबाकडे संसाराकडे दुर्लक्ष होते आणि त्यांच्या घरातली पुढली पिढी जवळपास अखेरची निघते कारण त्यानंतर या अशा घरांचे वाटोळे होते, तिसरी पिढी रस्त्यावर येते, तुम्ही सभोवताली नजर टाका, मी सत्य सांगतोय तुमच्या ते लक्षात येईल. शरद पवारांची सुप्रिया अमेरिकेतून परतल्यानंतर किंवा अजित डोक्यावर बसत चाललाय हे शरदरावांच्या नेमके लक्षात आल्यानंतर त्यांनी सुप्रियाला इकडे बोलावून घेतले आणि घोगऱ्या आवाजाच्या मुलीला थेट लता मंगेशकर हो, सांगितले त्यामुळे सुरुवातीची सुप्रिया खूपशी उद्धट उर्मट वाटणारी, वागणारी पण जसजशी ती राजकारणात परिपकव होत गेली, स्वभावात त्यानंतर त्यांनी घडवून आणलेले बदल अनपेक्षित कौतुकास्पद होते पण तोपर्यंत शरदरावांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांना नेमके ज्या स्थानी सुप्रियाला पाठवायचे बसवायचे होते, स्वप्न ध्येय निदान आज तरी अपूर्ण आहे…
www.vikrantjoshi.com
डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे, नेत्यांच्या मुलांमधला मला मनापासून भावणारा आवडणारा तरुण नेता आणि खासदार. जे संधीसाधू आहेत कपटी लबाड दुटप्पी स्वार्थी आहेत, त्यांच्यासाठी डॉ श्रीकांत एकदम खडूस त्यामुळे यापद्धतीच्या मंडळींना खासदार श्रीकांत समोरून येतांना दिसले कि असे किंवा त्यांची साधी चाहूल जरी लागली तरी हे असे बदमाश द्वाड लबाड मागल्या मागे पळ काढतात, पसार होतात तरीही असे बेरकी सत्तेच्या राजकारणात अनेकदा खपवून घ्यावे लागतात साठवून ठेवावेच लागतात, त्यांचे हे स्पष्ट मत. डॉ श्रीकांत यांचा मला माहीत असलेला एक किस्सा सांगतो. अलीकडे एका अतिशय नीच वृत्तीच्या सिंधी तरुण उद्योजकाने अनेक नेत्यांना आधी लुबाडले नंतर त्यांना अडचणीत टाकले प्रसंगी तुरुंगाचा रस्ता देखील हा लफडेबाज बेईमान उद्योजक दाखवायला कमी करीत नाही पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले या हरामखोराने त्यांच्यावर देखील नेहमीचे जाळे टाकायला सुरुवात केली पण चाणाक्ष डॉ श्रीकांत यांच्या नजरेतुन तो आणि त्याची वृत्ती सुटली नाही आणि श्रीकांत यांनी त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला, नेमके जे एकनाथजी किंवा डॉ श्रीकांत यांचा गैरफायदा घ्यायला पुढे येतात, एकदा का खासदाराची करडी नजर अशांवर पडली कि डॉ श्रीकांत यांची शाब्दिक छडी मग अशांना क्षणार्धात घायाळ करते, ढुंगणाला पाय लावून धावायला भाग पाडते. अमुक एखाद्या कार्यकर्त्याचे मतदाराचे सामान्य माणसाचे सामाजिक किंवा व्यक्तिगत काम तेथल्या तेथे करवून देणे, अमुक एखाद्याला वारंवार उगाच चकरा मारायला न लावणे आणि मनापासून मदतीला धावणे विशेषतः त्यांच्या आवडत्या वैद्यकीय क्षेत्रात ओळखीचा असो अथवा नसो, मनापासून सर्वोतपरी सहकार्य करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यातून ते केवळ मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून नव्हे तर कल्याणचे सेवाभावी खासदार म्हणून भाव खाऊन जातात. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्यापद्धतीने इतर बहुसंख्य सत्तेतल्या नेत्यांच्या मुलांनी पुढे पुढे करून बापाच्या डोक्याला नको तेवढा ताप करून ठेवलाय किंवा ठेवतात, डॉ श्रीकांत यांना मी मोठ्या बापाचा मुलगा या नात्याने स्वतःला मिरवून आणण्यात अजिबात रस नसतो ते त्यात कमालीचे सावध असतात, चार पावले मुद्दाम मागे उभे राहतात त्यातून एकनाथजी शिंदे मनोमन सुखावतात…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी