अवघड जागी गाठ आणि सासूबाई डॉक्टर :
माझे पुढील लिखाण हे हवेतले तिर नाहीत तर माहिती घेत पुरावे जमा करीत ते तुम्हासमोर आणतो आहे मांडतो आहे, काळजीपूर्वक वाचा आणि लगेच कामाला लागा. याठिकाणी दोनच महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा कि महाराष्ट्राचे गृहमंत्री अजिबात बावळट नाहीत आणि घरात बसून गळ्याला भू भू सारखा पटत बांधून अडकवून राज्यकारभार हाकणारे नाहीत, ते सतत कायम राज्यातल्या पोलिसांच्या संपर्कात असतात आणि दर तासाला अगदी कानाकोपऱ्यातले अपडेट घेतात, कोणतीही चुकीची चाहूल त्यांना लागली तर रुद्रावतार धारण करून एरवी पोलिसांना पोटाशी घेणारे हेच प्रेमळ गृहमंत्री गाफील असणाऱ्या पोलिसांना धारेवर धरून पुन्हा यापद्धतीने कोणतेही विपरीत प्रकार यापुढे घडता कामा नये अशी तंबी जेव्हा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देतात तेव्हा भल्या भल्या पोलिसांची घाबरगुंडी उडालेली असते. थोडक्यात फडणवीस हे गाफील बावळट बेसावध बेअक्कल आळशी अडाणी गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नसून ते भाजपचे देशातले राज्यातले नामांकित नेते व वलयांकित असे नेते असतांना याच फडणवीसांना नेमके आणि नक्की अशी नावे माहित आहेत जे नेते व सरकारी अधिकारी विशेषतः जरांगे आणि मराठ्यांच्या आंदोलनाला आतून मोठी आर्थिक रसद तर पुरवितातच पण मराठ्यांच्या आंदोलनाला ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत एकाचवेळी भाजपा, मोदी यांना अप्रत्यक्ष तर फडणवीसांना प्रत्यक्ष त्रास देताहेत डोकेदुखी ठरताहेत जे अजिबात योग्य नाही, समजा या त्रास देणाऱ्यांमध्ये थेट शरद पवार यांचे सहकार्य व मदत होत असेल तर त्यात फडणवीसांना मोदींना अजिबात आस्चर्य वाटन्सर नाही कारण पवारांचा तो सुरुवातीपासूनच स्वभाव आहे त्या पद्धतीची विक्षिप्त वृत्ती आहे आणि या अशा वृत्तीतूनच पवारांनी आपल्या व पोटच्या सुप्रियाचे मोठे राजकीय आयष्याचे वाटोळे करवून घेतलेले आहे पण पवारांव्यतिरिक्त ज्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा महायुतीमधल्या नेत्यांना फडणवीसांनी घडविण्यात वाढविण्यात मोलाची महत्वाची कामगिरी पार पाडलेली आहे त्याच फडणवीसांशी यापद्धतीच्या हलकट मंडळींनी दगाफटका करणे म्हणजे स्वतःच्या आईला धंद्याला लावणाऱ्या नीच मुलासारखे हे कृत्य आहे. विशेष म्हणजे ज्यांची या आंदोलनाला सततची चिथावणी व आर्थिक मदत होते आहे त्यांची प्रत्येक हालचाल गृहमंत्री फडणवीस टिपून ठेवताहेत, त्यातून फडणवीसांच्या राजकीय प्रतिष्ठेला नव्हे ता आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या घरच्या भेदींना नेमकी आणि नक्की मोठी किंमत मोजावी लागणार आहे….
www.vikrantjoshi.com
दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो देखील नेमकी माहिती घेऊनच. आंदोलन सुरु होण्यापूर्वी या राज्यात इतर समस्त जातींमध्ये मराठा समाजाचे अनन्यसाधारण महत्व होते, आम्ही सारेच मराठेतर मराठ्यांकडे राज्याचा किंवा गावगाड्याच्या राजा याच नजरेने बघत असू म्हणजे तुम्ही सारेच मराठे आमचे शिवाजी हीच भावना प्रत्येक मराठेतर किंबहुना अगदी बौद्ध, मुस्लिमांच्या मनात रुजलेली खोलवर रुतलेली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे आणि संख्यने मोठे कोण तर मराठे, गावचे मुखिया कोण तर मराठे किंवा सरकारी नोकरीतले बडे अधिकारी कोण तर मराठे, सहकारात कोण तर मराठे, जमीनदार कोण तर मराठे, कारखानदार कोण तर मराठे थोडक्यात आजतागायत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठे मराठे आणि मराठे. ज्यांच्यात आम्ही शिवाजी आणि संभाजी बघत आलोय, अनेकदा तुम्हा मराठ्यांकडून आम्हा मराठेतरांना मोठा मानसिक त्रास होतो, अपमान होतो, झालेला आहे तरीही राजासमोर खालची मान वर न करता आम्ही असे त्रास सहन केलेले आहे आणि मराठ्यांवर खूप खूप खूपच प्रेम केले आहे ज्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. पण तुमच्या या आंदोलनामुळे समस्त मराठेतर थोडक्यात मराठ्यांशिवाय प्रत्येक जाती धर्माचे सारेच नाराज आहोत, आमचाच राजा आम्हाला वेठीस धरून आम्हाला छळतो आहे अशी आता मराठेतर प्रत्येकाची पक्की समजूत झालेली असल्याने इतिहासात पहिल्यांदा असे घडते आहे कि समस्त मराठेतर मंडळींच्या मनातून मनापासून मराठे उतरले आहेत उतरत चालले आहेत जी खोलवर दरी नक्कीच मराठ्यांना अशुभ आणि अशोभनीय आहे, राजेहो, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती कि कृपया आम्ही मराठेतर एकत्र आणि तुम्ही एकाकी असे न घडण्यासाठी कृपया हिंदूंच्या महायुतीला बाधा आणणारया कोणत्याही लबाड नेत्याच्या सांगण्याला चिथावणीला न भूलता चाललेले आंदोलन स्थगित करावे, तुमच्याच हाती सत्ता असते तेव्हा सत्तेत राहून खुबीने युक्तीने व सामोपचाराने मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, आम्हाला आमचा राजा पुन्हा पूर्वीसारखाच आमच्या जवळ हवा ज्याला आमच्या मनातून हृदयातून आजही अजिबात घालवायचे नाही, हाकलून लावायचे नाही. मराठ्यांशिवाय कसे राहायचे कसे जगायचे यापद्धतीने मोठा विचार मराठेतर मंडळींमध्ये चर्चेत आहे जो विचार प्रत्यक्षात उतरू नये असे मनापासून वाटते. मला हे नक्की ठाऊक आहे कि मराठ्यांना तेही मी आव्हान करणे समजावून सांगणे म्हणजे मुंगळ्याने हत्तीणीशी सेक्स करण्याची मनीषा बाळगण्यासारखे किंवा उंटाच्या ढुंगणाचा मुका एखाद्या तीन फुटी इसमाने घेण्यासारखे, तरीही माझा हा तोकडा प्रयत्न यासाठी, या अशा आंदोलनातून आपल्याच जात बांधवांना फितवून केवळ व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा ईर्ष्येपोटी चार दोन बेरकी व हलकट नेते राज्यातले एकीचे वातावरण मुद्दाम बिघडविण्या सरसावले आहेत नक्की…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी