मिलिंदाची मुरली कोणी वाजवली,
एकनाथांची कावड कोणी भरली :
एक मोठा गौप्य्स्फोट याठिकाणी मी करणार आहे. जशी भारतीय जनता पक्ष हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय मानद संस्था आहे त्याचपद्धतीने भाजपाने देखील आता संघ पद्धतीने आपला विस्तार केला असून त्याची देखील नेमकी सुरुवात महाराष्ट्रातून झालेली असून मनमानी पद्धतीने वागणार्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मुसक्या बांधत, त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाला कायमचे अडगळीत टाकून भले मोठे भगदाड पाडून यापुढे भाजपाच्या मानद राजकीय संस्था म्हणून अजितदादांची राष्ट्रवादी तसेच एकनाथ शिंदेंची शिवसेना कार्यरत झाल्या आहेत कार्यरत असतील, विशेष म्हणजे खरी शिवसेना शिंदे यांची आणि खरी राष्ट्रवादी अजितदादांची म्हणून ओळखल्या जाईल याउलट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याचकडे बंडखोर पक्षाचे नेते म्हणून बघितल्या जाईल, हे दोघे हयात असेपर्यंत थोडेफार त्यांच्या गटाचे अस्तित्व तुम्हाला जाणवेल, त्यांच्यानंतर त्यांचे आणि त्यांच्या गटाचे फोटो फारतर भिंतींवर टांगलेले कुठेतरी तुम्हाला अभावाने बघायला मिळतील, नेतृत्वात आणि व्यवहारात सतत मनमानी केल्याने तसेच इतरांना गृहीत धरून त्यांचा वापर व्यक्तिगत फायद्यासाठी केल्याने एक दिवस एखाद्या बलाढ्य नेत्याचा देखील प्रसंगी कसा कंसमामा होऊ शकतो हेच आज शरदराव आणि उद्धव यांच्याकडे बघितल्यानंतर नक्की लक्षात येते, मनमानी नेतृत्वाची शोकांतिका हि अशी भयावह असते होते….
www.vikrantjoshi.com
अर्थात भाजपने नेमक्या या मानद संस्था महाराष्ट्रातून जोडल्या असल्याने मोदी व शाह या जोडगळीने राज्यातल्या नेतृत्वाची धुरा हे दोन्ही पक्ष सांभाळण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांवर टाकलेली असून त्याची चुणूक मिलिंद मुरली देवरा यांच्या शिंदे सेना प्रवेशाने तुम्हाला बघायला मिळालेली आहे. बघा नियती कशी असते ती म्हणजे जे आजतागायत वर्षानुवर्षे थेट 40-45 वर्षे शरद पवार करायचे ते भोग आता पवारांवरच उलटले असून यापुढे फडणवीस करतील आणि पवार बघतील हे चित्र तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे जवळपास 2015 पासून फडणवीसांचे विरोधकातले एक विश्वासू आणि मित्र मिलिंद देवरा भाजपा प्रवेशाची परवानगी फडणवीसांकडून केव्हा याची वाट बघत होते, अमुक एखाद्या प्रभावी नेत्याला अगदी सहज पक्षात घेता येत नसते कारण त्याचे पक्षांतर केल्यानंतरचे राजकीय पुनर्वसन तेवढेच महत्वाचे ठरते अन्यथा पक्षाची त्यातून मोठी विश्वासाहर्ता रसातळाला जाऊ शकते त्यातून, तेथेच थांबा असे वारंवार फडणवीस त्या देवरा यांना खुणावून सांगत होते, आणि ती योग्य वेळ आली, भाजपा श्रेष्ठींनी देवरा यांना शिंदे यांच्याकडे सोपवा सांगितले आणि भाजपाऐवजी देवरा यांचा शिंदे सेनेत प्रवेश झाला अर्थात जर आवश्यकता वाटली असती तर ह्याच देवरा यांना भाजपा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीत देखील जाण्याचे सांगितल्या गेले असते, नेमके हेच जे शरद पवार आत्ता आता पर्यंत करायचे आता त्यापद्धतीने भोग त्यांना भोगायची वेळ आली आहे. यापुढे आपल्या या राज्यात फडणवीस जे सुचवतील नेमके आणि नक्की तेच घडेल अर्थात त्यात शिंदे, अजितदादा आणि फडणवीस दरम्यान विचारविनिमय होऊनच निर्णय घेतले जातील….
आता तुम्हाला सांगतो कि शरद पवार नेमके काय करायचे, आजतागायत शरद पवार यांचे मित्र अनुयायी चेलेचपाटे जसे ते असलेल्या पक्षात असायचे ते तसे विरोधकांत देखील फार मोठ्या प्रमाणावर असायचे त्यातून कोणी कुठून निवडणूक लढवायची कोणी केव्हा बंड करायचे कोणी केव्हा कोणाविरोधात आंदोलने छेडायची थोडक्यात पवार बुद्धिबळाचा खेळ आपल्या सोयीनुसार खेळून इतर साऱ्यांना छळायचे छेडायचे खेळवायचे वापरून घ्यायचे आणि सत्तेची फळे फक्त स्वतः चाखून इतरांना वाकुल्या तेवढ्या दाखवायचे, उद्धव हे असेच काकांच्या जाळ्यात अलगद अडकले त्यातून स्वतःचे अस्तित्वच घालवून बसले. थोडक्यात काकांचा डाव त्यांच्यावरच आज उलटला आहे. दगाफटका करण्याचा काकांचा जुना स्वभाव व वृत्ती त्यामुळे काकांना सोडून आल्यानंतर देखील थेट भाजपामध्ये दादांकडे संशयाने पाहायला जायचे त्यात तो सकाळचा शपथविधी त्यामुळे संशयाचे ढग त्यांच्यासभोवतालचे अतिशय गडद होते पण नेमकी वस्तुस्थिती फडणवीसांना माहित असल्याने वेळोवेळी अजितदादांना सावरण्याचे सांभाळण्याचे मोठे काम फडणवीसांनी जरी केलेले असले तरी सर्वसामान्यांना आजही दादांचे बंड काकांचीच चाल असे सतत वाटत राहते, मात्र यापुढे दादा हे काकांचे राहिलेले नाहीत हीच निदान आजची तरी वस्तुस्थिती आहे. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे काका पद्धतीने यापुढे या राज्यात मोदी शाह आणि फडणवीस ठरवतील, कोण कुठे जायचे किंवा कोणी कुठून निवडणूक लढवायची त्यामुळे यापुढे भाजपाला नाही तर पवार व उद्धव यांना नेमका धोका आहे कारण शरद पवार पद्धतीने याच फडणवीसांनी जर उद्धव सेनेत किंवा पवार राष्ट्रवादीत आपली माणसे पेरलेली असतील तर, जे नेमके देवरा पक्षांतर प्रकरणावरून अगदी सहज सिद्ध होते….
शेवटी मुद्दा असा कि मिलिंद देवरा यांना भाजपाऐवजी शिंदे सेनेत का पाठविण्यात आले, कारण एकमेव यावेळी काहीही करून कसेही करून येणाऱ्या लोकसभेला विशेषतः भाजपा आणि शिंदे सेनेला, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्या अरविंद सावंत यांना पराभूत करायचे आहेत, लागोपाठ दोन वेळा देवरा यांना पराभूत करणाऱ्या अरविंद सावंत यांना तेही देवरा यांच्याकडूनच पराभूत करावे असे जे महायुतीला वाटते ते तसे अगदी मनापासून महाआघाडीतल्या उद्धव सेनेतल्या देखील अनेक मात्तबरांना वाटत असल्याने देवरा यांना भाजपा ऐवजी शिंदे सेनेत धाडण्यात आले जेथे त्यांना भाजपापेक्षा उद्याचा विजयचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. यापुढे अमुक एखादा नेता किंवा कार्यकर्ता नेमका कुठे हा मुद्दा महत्वाचा राहिलेला नाही कारण त्या साऱ्यांचे मुख्यालय फक्त आणि फक्त भाजपा असल्याने संघात विविध मानद संस्थेत कार्यरत असणारेही जसे संघाचे स्वयंसेवक म्हणूनच ओळखले जातात तेच राज्याच्या महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचे आहे असेल जो तो अप्रत्यक्ष भाजपाचाच माणूस म्हणून त्याच्याकडे बघितले जाईल नेमकी हीच वस्तुस्थिती आहे. फडणवीस ठरवतील कि कोण कुठे राहायचे आणि कोण कुठून निवडणुकीत उतरायचे. रहाटगाडगे नेहमी फिरते असते त्यातून उद्या भाजपाचा देखील शरद पवार किंवा उद्धव ठाकरे होणार नाही, भाजपा नेत्यांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे, नेहमीच्या उत्तम संस्कारांना कसे जपता येईल त्यांना बघावे लागणार आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी