गेले कि हो घरी आता वाजले कि बारा :
महाराष्ट्रातल्या राजकीय परिघात सतत 45 वर्षे श्री श्री शरद पवार त्यांच्या पक्षातल्या किंवा पक्षाबाहेरच्या त्यांच्या विरोधकांना कायम अंडर टेन्शन ठेवायचे सतत त्यांच्या विरोधकांना गॅसवर आहोत वाटायचे, नव्यानेच लग्न झालेला नवरा जसा पहिले काही महिने बायकोला सुचू देत नाही, तोंडही वर काढू देत नाही, तेच पवारांचे होते, विरोधकांना ते नवीन नवरीसारखे अस्वस्थ करून सोडायचे, कृष्ण जन्माला आला आणि जसे कंसाचे दिवस फिरले तेच नेमके पवारांचे त्या फडणवीसांमुळे झाले, सुपरस्टार राजेश खन्ना सुरुवातीला त्या अमिताभला जसा अभिनयात एकदम लल्लू पंजू समजायचा पुढे त्याच अमिताभने जसे राजेश खन्नाला सिनेमातून नोव्हेअर केले, आणि सुपरस्टार पद आपल्याकडे अलगद खेचून आणले नेमके ते तसेच देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दरम्यान घडले, फडणवीस एक दिवस आपल्या नाकात दम आणू शकतो हि साधी कल्पना देखील पवारांना न आल्याने ते फडणवीसांना सुरुवातीच्या दिवसातला अमिताभ समजले, पवारांनी आपल्या चेल्यांना फितवून फडणवीसांच्या नाकात दम आणला त्यांची हेटाळणी केली, नेतृत्वाची खिल्ली उडवली, पुढे तर उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून ज्या फडणवीसांना पवारांनी जिना हराम करून ठेवले त्याच फडणवीसांमुळे आज पवार यांची राजकीय अवस्था, त्यांच्या नेतृत्वाची व पक्षाची अवस्था त्याच नवोदित फडणवीसांनी थेट क्षय रोग्यासारखी केली आहे वरून राज्याच्या राजकारणातले सुपरस्टार पद स्वतःकडे खेचून आणलेले आहे. केवळ फडणवीसांचा इशारा काफी, आजही असे बहुसंख्य नेते या राज्यातले भाजपा मध्ये नसलेले कुंपणावर जे बसून आहेत त्यातले काही पवारांच्या पक्षातले तर काही उरलेसुरले उद्धवजींच्या गटातले तर असंख्य काँग्रेसवाले आहेत अशांना इशारा करताच ते अनुक्रमे पवार, उद्धव आणि काँग्रेस सोडून पक्षांतर करण्या टपून बसले आहेत, मला तर हि नावे तोंडपाठ आहेत. फडणवीस ठरवतात किंवा ठरवतील कि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना कोणत्या पक्षात पाठवायचे म्हणजे उद्या मला मिलिंद नार्वेकर फडणवीसांच्या इशाऱ्यावरून शिंदेंच्या बाजूला बसलेले दिसले तर अजिबात नवल वाटणार नाही…
www.vikrantjoshi.com
देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या राजकारणातले आजचे सुपरस्टार आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचे अजितदादा व एकनाथ शिंदे हे अनुक्रमे विनोद खन्ना आणि धर्मेंद्र आहेत, शरद पवारांचा सिनेमाच्या एन्ड मधला खलनायक झाला आहे म्हणजे प्रेम चोप्रा किंवा अमरीश पुरी झालेला आहे तर उद्धव ठाकरे सतत चुका करत गेल्याने किंवा फाजील आत्मबिश्वास त्यांना नडला त्यातून उद्धव यांचा थेट मुक्री किंवा केश्तो किंवा शोलेतला साम्भा झालेला आहे म्हणजे उद्धव थेट कुठेतरी एखाद्या शिळेवर एकटे बसून गब्बरसिंग उर्फ शरद पवार यांच्याकडे आशेने बघताहेत. आजही या अशा राजकीय आणि शारीरिक विकलांग अवस्थेत हेच पवार एकट्या फडणवीसांना मानसिक त्रास देण्याची संधी सोडतांना दिसत नाहीत त्यामुळे फडणवीस पाक बॉर्डरवर तैनात असणाऱ्या धिप्पाड भारतीय सैनिकासारखे चोवीस तास डोळ्यात तेल घालून पवारांच्या हालचालींवर सतत बारीक नजर ठेवून असतात त्याचवेळी त्यांना उद्धव यांच्या हालचालींवर अजिबात नजर ठेवण्याची गरज नसते त्यांची तशीही राजकीय अवस्था व्हेंटिलेटर वर ठेवलेल्या अखेरच्या घटका मोजणाऱ्या पेशंटसारखी आहे त्यात एकनाथ पैलवान कायम उद्धवजींच्या मानगुटीवर बसून कधी त्यांना गुदगुदल्या करतो तर कधी तंगड्यांच्या कैचीत घट्ट पकडून जिना हराम करतो. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाबतीत भविष्यात नेमके काय वाढून ठेवलेले आहे हे आजच सांगणे जरासे कठीण वाटते पण येणाऱ्या लोकसभा तसेच विधान सभा निवडणुकीपर्यंत फक्त आणि फक्त अपयश त्यांच्या बाजूने असेल, राज्यात कोणालाहि भडकवून विरोधी पक्षांना किंवा नेत्यांना खात्मा करण्याची पवारांची वृत्ती किमया जादू एकदम सफाया झालेली आहे त्याचवेळी सतत दगाबाजी त्यातून मोदी आणि शाह यांनी देखील पवार व उद्धव केसातल्या उवांसारखे बाजूला केले आहेत किंवा नखांनी या दोघांचे नेतृत्व चिरडून टाकले आहे…
येणाऱ्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीतही बऱ्यापैकी महत्वाचा फॅक्टर प्रकाश आंबेडकर यांचा गट असेल मात्र प्रकाश आंबेडकर यांनी कायम स्वतःचा आजतागायत खेळण्यातला भोवरा करून ठेवलेला आहे म्हणजे सुरुवातिला ते एकदम वेगात जोरात स्वभोवताली गरागरा फिरतात नंतर वेग ओसरला कि एकाच जागी निपचित पडून राहतात, स्वतःच्या मर्यादा ओळखून त्यांनी आपला कधी रामदास आठवले करवून न घेतल्याने त्यांची कायमच राजकीय अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे असते. यावेळी देखील ते भारताच्या कानाकोपऱयातून लोकसभा लढवण्याची भाषा करतील शेवटी अर्ज मात्र विदर्भातल्या अकोल्यातूनच दाखल करतील थोडक्यात नेहमीप्रमाणे अकोल्यातून भाजपाला तगडे आव्हान उभे करतील, दुर्दैवाने विद्यमान खासदार आणि भाजपाचा हुकमी एक्का संजय धोत्रे अंथरुणाला खिळून आहेत, वारसदार म्हणून अनुप संजय धोत्रे त्या आंबेडकरांसमोर टिकाव धरतील अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे एखादा सांड बाळंतपणाला गेला, म्हणण्यासारखे त्याऐवजी धोत्रे यांचे निकटवर्तीय मात्र सध्या काँग्रेसमध्ये असलेले नानासाहेब सपकाळ यांचे प्रख्यात डॉकटर चिरंजीव, अकोला जिल्ह्यातले नामांकित प्रसिद्ध व्यक्तिमत्व रणजित सपकाळ यांना किंवा यशोमती ठाकूर यांच्या कझिन तसेच अनंतराव देशमुख यांच्या स्नुषा अमृता नकुल देशमुख, या दोहोंपैकी एक, प्रकाश आंबेडकर यांच्यावर नक्की मात करतील निवडून येतील खासदार होतील पण त्याहीपेक्षा जे यादिवसात नेमके आंबेडकर यांच्या मनात आहे तेच घडावे, त्यांनीच भाजपाचा महायुतीचा पाठिंबा घेत भविष्यातला रामदास आठवले व्हावे, बाबासाहेबांच्या वारसाने एकदा तरी मंत्री व्हावे, आणखी मोठे व्हावे पण जसे माकडाच्या ढुंगणावर फुंकर मारू नये तसे आंबेडकरांच्या डोक्यात काहीही टाकण्याचा प्रयत्न करू नये त्यांची सल्लागार त्यांची ब्राम्हण पत्नी आहे त्या यावेळी तरी योग्य निर्णय नक्की घेतील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी