नावात तेवढे लक्ष्मण, माकडचाळे मात्र विलक्षण :
पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याच वयाचे माझे काही चावट मित्र आहेत म्हणजे अलीकडे लक्ष्मण माने जसे विनाकारण चावट बोलले तसे हे चावट चाळे करतात, माने यांच्यासहित म्हातार्यांना येड लागले, म्हणायची माझ्यावर वेळ येते, नेमके तेच सत्य असते. माझा जीव एकुलता एक, शरिर एक पण हे मित्र माझी एकाचवेळी अनेक रूपे आहेत, सिद्ध करून मोकळे होतात म्हणजे आत्ताही 31 डिसेंबरला मी दिवसा आणि रात्रीही घरीच असतांना, दुपारी दोन मित्रांनी आणि रात्री तीन मित्रांनी यावयातही असलेल्या गर्लफ्रेंड्सला लंच किंवा डिनरला नेले पण नाव माझे पुढे केले कि आम्ही हेमंत जोशी संगे पार्टी करतोय, एकदा तर मी घरी चक्क तापाने फणफणलो असतांना, मी आणि हेमंत बँकॉकला जातो आहे, बायकोला थाप एकाने थाप मारली, दुर्दैवाने मी आणि त्याची ओरिजनल बायको नेमके दवाखान्यात भेटलो त्यानंतर मित्र अंग सुजीमुळे जवळपास महिनाभर अंथरुणावर खिळून होता. शेरखांने आडनावाचा माझा एक अधिकारी मित्र बायकोला, आठ दिवसांसाठी सरकारी कामासाठी नागपूरला जातो सांगून लव्हर सोबतीने शेगावला जेव्हा मंदिरात तिला घेऊन घंटा वाजवायला गेला तेव्हा शेजारची देखील घंटा जोरात वाजली म्हणून याने वळून बघितले तर घंटा वाजवणारी चक्क त्याची बायको, ती देखील आपल्या लव्हरला घेऊन आलेली, लक्ष्मण माने अलीकडे सॉफ्ट टार्गेट ब्राम्हणांवर आणि संघ तसेच सत्तेत असलेल्या भाजपवर चुकीचे आणि खालच्या पातळीवर जाऊन घसरले, माने तुमचा त्या भाजपाविषयी राग, हे वाचल्यानंतर लगेच उठा आणि थोडाफार स्वाभीमान शिल्लक असेल बेश्रमपणा अंगात भिनलेला नसेल तर लगेच तुमची ती पदमश्री परत करा, म्हणजे तुम्हाला निलाजरा निर्लज्ज म्हणण्याची इतरांची हिम्मत होणार नाही…
www.vikrantjoshi.com
याठिकाणी मी अस्वस्थ आहे कारण लक्ष्मण माने वास्तविक लॉर्ड बुद्ध या कुठल्याशा लोकल वाहिनीवर अगदी कंटाळा येईपर्यंत म्हातारवय असल्याने बहुतांश असंबद्ध बोलले पण जे काय ते घालून पाडून बोलले त्यात अधिक बोचरी टीका मराठ्यांवर होती किंबहुना त्यांनी मराठयांना त्यात बावळट बेअक्कल देखील अप्रत्यक्ष ठरविले आहे मात्र मराठ्यांवर थेट घसरण्याची माने यांची हिम्मत झालेली नसल्याने त्यात ते नेहमीप्रमाणे सुसंस्कृत ब्राम्हणांना सॉफ्ट टार्गेट करून मोकळे झाले पण बोलण्याच्या ओघात विशेषतः जरांगे आणि मराठ्यांची थेट लायकी त्यांनी काढली, जरांगे यांना मोठे करण्यात किंवा मराठा आंदोलन चिघळत ठेवण्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचाच मोठा हात आहे हे असे कायम कानावर पडत असतांना किंवा मुद्दाम एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये गैरसमज त्यातून निर्माण होतात अर्थात म्हातारचळ लागलेल्या लक्ष्मण माने यांनी मात्र वेगळाच शोध लावलाय कि आंदोलने घडवून आणण्यात थेट संघ व भाजपाचा हात आहे, हे ऐकून मी किंवा माळी, मराठा किंवा इतरांनी देखील कपाळावर हात मारून घेतला, लक्ष्मण माने यांचा खिलोना मधला संजीव कुमार झालाय, त्यांच्या वायफळ बडबडीकडे दुर्लक्ष करा असे फोन तर मला काही बौद्ध बांधवांकडून आले. मराठा आणि ओबीसी आंदोलना मागे ब्राम्हण संघ आणि फडणवीस आहेत तसेच सावरकर टिळक आगरकर हेडगेवार गोळवलकर यांच्या पराक्रमी जात बांधवांना माने महाशय घाबरट म्हणाले आणि फडणवीस हा एकमेव बामन या मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामागे जेव्हा माने म्हणाले तेव्हा उभे महाराष्ट्र हास्यकल्लोळात बुडाले असावे हे नक्की आहे. पंतप्रधान होण्याआधी ज्या नरेंद्र मोदी यांनी जगात देशात एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव काढले त्या मोदी यांना पंतप्रधान होण्याआधी कोणीही ओळखत नव्हते हे जेव्हा माने म्हणाले ते ऐकून मी हसता हसता जमिनीवर गडाबडा लोळायला लागलो…
बेअक्कल बोलण्याची परिसीमा लक्ष्मण माने यांनी गाठली कारण मराठ्यांनी जमिनी विकल्या आणि त्या सार्या जमिनी राज्यातल्या शेटजी भटजींनी घेतल्या, माने म्हणाले. शेटजींचे माहित नाही पण समस्त बहुतांश भूमिहीन ब्राम्हणांवर त्यांनी आजचे जमीनदार हा आरोप केला तेव्हा मला जातीच्या मर्यादा असल्याने याठिकाणी काही करणे शक्य नाही पण त्यांच्या अशा बेताल बावळट वक्तव्यांवर आता एखाद्या बौध्दानेच त्यांना हजार माराव्यात आणि एक मोजावी. मराठ्यांनी आता बौद्ध धर्म स्वीकारावा हे त्यांनी केलेले आवाहन आणि जरांगे यांची काढलेली लायकी तसेच जरांगे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन केलेले घाणेरडे आरोप, बघूया एक मराठा लाख मराठा म्हणणारे समस्त मराठे आता माने यांचा समाचार कसा घेतात ते, माने यांच्या आरोपांचा मर्द मराठ्यांनी समाचार न घेतल्यास याच मराठ्यांकडे मराठेतर वेगळ्या नजरेने नक्की बघायला कमी करणार नाहीत किंबहुना माने यांनी हा असा अगदी जाहीर केलेला मराठ्यांचा अपमान मी स्वतः ब्राम्हण असूनही मनातून दुख्खी झालो मला राग अनावर झाला पण माझे हात कायद्याने बांधल्या गेलेले आहेत. अत्यंत महत्वाचे म्हणजे मराठ्यांना लग्न करण्या पोरी मिळत नाहीत म्हणून येतात आमच्याकडे, पद्मश्री मिळविणाऱ्या लक्ष्मण माने यांनी हा असा मराठ्यांचा केलेला घवघवीत अपमान, जर तो चुकून एखाद्या ब्राम्हणाने केला असता तर जशी समस्त ब्राम्हणांची घरे जाळल्या गेली असती, मला वाटते हे असे नक्कीच समस्त मराठे लक्ष्मण माने बाबत जर काहीही घडवून आणणार नाहीत अर्थातच त्यातून उद्या अनेक माने अगदी सहज मर्द मराठ्यांवर घसरून मोकळे होतील. माथी भडकविण्याचे कोणतेही कृत्य ना फडणवीसांकडून घडेल ना ब्राम्हणांच्या हातून याउलट मिस्टर माने हे असले बेअक्कल व्हिडीओ पसरवून तुम्हीच याठिकाणी ऐन निवडणुकांच्या तोंडावर जाणून बुजून राजातल्या अनेकांची माथी भडकावलीआहे जे तुम्हाला अजिबात शोभणारे नाही, तुमच्यात ताकद आहे त्यातून करा आणखी मोठे अपमान त्या मराठ्यांचे ते सहन करतील असे जहरी अपमान उगाच निरुपद्रवी आणि भूमिहीन ब्राम्हणांना सॉफ्ट टार्गेट करून स्वतःची अक्कल पाजळु नका आणि जमले तर शिवाजी महाराजांच्या या वंशजांना त्या लढाऊ मराठ्यांना देखील घालून पाडून बोलू नका…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी