हिंदुत्व हेच यापुढे हिंदूंचे राष्ट्रीयत्व तरीही
भाजपाचे कितपत महत्व :
आधी लोकसभा त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकांना आम्ही मराठी नजीकच्या काळात सामोरे जाणार आहोत हे तुम्हाला सांगणे म्हणजे सचिन जोशींचे अवास्तव वाढवून ठेवलेले महत्व हे भविष्यात एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे संजय राऊत पद्धतीने अडचणीत आणणारे ठरणार आहे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कानात उगाच ओरडून सांगण्यासारखे. येणाऱ्या दोन्ही निवडणुकात नेमके मतदान कोणाला हे मतदारांनी ठरवायचे असले तरी ज्याचा त्याचा प्रत्येकाचा अजेंडा हिंदुत्व हाच असणे अत्यावश्यक असायलाच पाहिजे हे लक्षात ठेवावे. सध्या महाराष्ट्रात जातीपातीच्या विषयांवरून अक्षरश: रणकंदन माजलेले असले तरी जात पात अजिबात महत्वाची न मानता मराठी अमराठी असा भेदभाव औषधालाही न ठेवता आम्ही सारे हिंदू आणि हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व हि कठोर व कणखर भूमिका उराशी बाळगून वाटचाल पुढे सुरु ठेवल्यास आज जे केवळ हिंदुत्वाच्या भूमिकेवर आपण जगभर गाजतो व नावाजतो आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीला आणि उन्नतीला देखील त्यातून मोठे बळ मिळेल हे नक्की आहे. भाजपा आणि त्यांच्या महायुतीने आणखी एक अत्यंत महत्वाची बाब ध्यानात ठेवावी कि पार पडलेल्या चार राज्यातल्या विधान सभा निवडणुकीत जे शॉकिंग तेलंगणात घडले आहे त्याची नेमकी पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जरी वरकरणी राज्यातले राजकीय वातावरण राज्याच्या भाजपा महायुतीला पोषक दिसत असले तरी राज्याच्या महाघाडीला कमी लेखून नक्की चालणारे नाही, सध्याची जातीयवादी भडकलेली आंदोलने त्यातून राज्यात विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना का कोण जाणे नेमकी सहानुभूती मिळते आहे आणि महायुतीच्या विशेषतः भाजपाच्या विरोधात घराघरातले वातावरण दूषित करण्याचे षडयंत्र रचण्यात छुप्या आणि उघड विरोधकांना शहरी आणि ग्रामीण भागात दवखील मोठे यश मिळते आहे, नेमकी हीच वस्तुस्थिती आहे…
www.vikrantjoshi.com
अत्यंत अत्यंत धक्कादायक म्हणजे पार पडलेल्या चार राज्यातल्या विधान सभा निवडणुकीच्या आकडेवारीवर विशेषतः राज्यातल्या महाआघाडीच्या भाजपच्या नेत्यांचे लक्ष नसावे अन्यथा आज ते वाजवीपेक्षा अधिक नक्की गाफील राहिले नसते महत्वाचे म्हणजे आपण केवळ आपल्या विधान सभा मतदारसंघापुरते हि जी आघाडीतल्या मंत्र्यांनी स्वतःची मानसिकता करवून घेऊन इतरांना अगदी सऱ्हास दुखावतांना ते दिसतात ज्यामुळे महाआघाडी सरकारविषयी कार्यकर्ते नेते आमदार खासदार अगदी उघड विरोधात बोलतांना किंवा मंत्र्यांच्या नावाने बोटे मोडतांना दिसतात तसे दिसले नसते किंवा तसे घडले नसते तर सध्याच्या सरकारवर आत्मकेंद्रित मंत्री, अशी त्यांना बिरुदावली चिकटली नसती, आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही या अविर्भावात वावरणारे हे मंत्रिमंडळ येणाऱ्या दोन्ही निवडणुकात महाआघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अतिशय सावध भूमिका महाआघाडीला यादिवसात घेणे अत्यावश्यक आहे कारण विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड मध्ये भाजपा आणि काँग्रेस दरम्यान केवळ चार टक्के मतदानाचा फरक आहे तर गाजावाजा झालेल्या किंवा आम्हीच कसे अमिताभ अशा पद्धतीच्या तोऱ्यात तेथील भाजपा स्वतःला मिरवितांना मध्यप्रदेशात देखील केवळ आठ टक्क्यांचा फरक आहे आणि राजस्थानात तर काँग्रेसला 39 टक्के आणि भाजपला 41 टक्के मतदारांची पसंत मिळालेली आहे आणि तेलंगणात काँग्रेस 39 टक्के बीआरएस 37 टक्के आणि भाजपाला फक्त आणि फक्त 14 टक्के मतदान झालेले आहे थोडक्यात तीन ठिकाणी काँग्रेस परभूत झाली पण टक्केवारी राखण्यात भाजपाला नव्हे तर काँग्रेसला फार मोठे यश मिळालेले आहे जो भाजपासाठी नक्कीच आत्मचिंतनाचा मोठा विषय आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसची दोन बलाढ्य नेत्यांसंगे म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी आघाडी असल्याने येथे भाजपा महायुतीला यश प्राप्त करतांना अगदी लंगोट कसून आणि मोठा सराव करून हि कुस्ती जिंकावी लागणार आहे…
क्रमश: हेमंत जोशी