काहीतरी भयंकर घडते आहे तसे संकेत
मिळाले आहेत :
एखाद्या उफाड्या देखण्या बुद्धिमान सेक्सी सुंदर तरुणीला तिच्या तापट संशयी रागीट हेकट व्हिमजिकल नवऱ्याने घरात डांबून ठेवल्याने तिच्या भावनेचा स्वातंत्र्याचा पार चेंदामेंदा झालाय या पद्धतीने त्या देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत उगाचच अनेकांना बहुतेकांना आजकाल अलीकडे यासाठी वाटू लागले आहे कारण राज्याच्या राजकारणात विशेषतः अमित शाह यांनी त्यांना कोंडून ठेवून फडणविसांच्या मनाविरुद्ध विविध अनेक निर्णय घेण्याचा सपाटा शाह यांनी लावलाय असा गैरसमज बहुतेकांनी करून घेतल्याने राज्यातली भाजपा रसातळाला चाललेली आहे असे अनेकांना वाटते आहे विशेष म्हणजे त्यातून उगाचच त्या अमित शाह यांचा तिटकारा अनेकांना वाटतो आणि सिम्पथी मात्र तशी गरज नसतांना त्या फडणवीसांना मिळते आहे, जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेत आहेत त्यांच्या अंगात आणि शब्दात दम आहे तोपर्यंत असे काहीही घडणार नाही हे मी तुम्हाला नेमकी माहिती घेऊन सांगतो आहे, मोदी आणि शाह यांचे ना संघाकडे दुर्लक्ष आहे ना फडणवीसांकडे ना त्या मोहन भागवत यांच्याकडे किंवा त्यातल्या एकाचाही अपमान होईल दुर्लक्ष होईल असे काहीही कधीही त्या दोघांकडून अजिबात घडत नाही, सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांनी त्यात उगाचच अस्वस्थ होण्याची अजिबात गरज नाही तशी आवश्यकता नाही किंबहुना अतिशय गुप्तता राखून अनेकदा कधी फोनवरून तर कित्येकदा प्रत्यक्ष भागवत आणि मोदी एकमेकांना भेटत असतात भेटून बोलतात किंवा फोनवरून निर्णयांचे आदान प्रदान ते दोघे आपापसात करतात, हीच वस्तुस्थिती आहे…
www.vikrantjoshi.com
महत्वाचे म्हणजे त्या दोघातले बोलणे जर महाराष्ट्रातील राजकीय निर्णयांशी संबंधित असेल तर लगेचच त्यावर नेमकी कल्पना विशेषतः शाह मोदी किंवा भागवत यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना दिली जाते, भागवत यांना मोदी पद्धतीने केवळ हिंदूंचा सत्तेत वरचश्मा असावा हा त्यांचा सततचा दृष्टिकोन असतो, देशाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कधीही ढवळाढवळ नसते. थोडक्यात फडणवीसांचे त्या मोदी आणि शाह यांनी पक्षातले किंवा राज्याच्या सत्तेतले कोणतेही महत्व कधीही आजही अजिबात कमी केलेले नाही. आता आणखी एक मुद्दा जो तुम्हाला अंधारात ठेवून आहे नेमका याठिकाणी मी त्यावर सत्य प्रकाश टाकणार आहे. एका नवऱ्याला एकाचवेळी एकाच घरात एकत्र दोन बायका नसाव्यात अन्यथा त्यातला एखादाच सलमानचा बाप सलीम निघतो इतर पुरुषांना बसता उठता बेदम मार वरून शिवीगाळ सहन कारवी लागते. नेमकी आजतागायत सतत कायम हीच भूमिका राज्यातल्या दलितांच्या लोकप्रिय नेत्याची म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची होती म्हणून त्यांची अप्रत्यक्ष त्या नरेंद्र मोदी किंवा भाजपाला साथ होती पण पडद्याआड राहून कारण रामदास आठवलेंच्या रुपातला सवतासुभा आंबेडकर यांना मान्य नव्हता,भाजपामध्ये एकाचवेळी आठवले आणि आंबेडकर हे सवती पद्धतीचे राजकीय गणित त्यांना मान्य नव्हते पण यावेळी विशेषतः लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी शंभर टक्के भाजपाचा सलीम खान होणार हे मी तुम्हाला आजच सांगून मोकळा होतो, नेमके कोणाच्या ब्रेन वॉशिंग वर प्रकाशजी त्या भाजपाशी थेट आणि उघड मैत्री किंवा युती किंवा आघाडी करायला तयार झाले म्हणजे त्यांचे ब्रेन वॉशिंग मिसेस आंबेडकर यांनी केले कि मोदींच्या विश्वासू स्वभावाला वृत्तीला आणि समजावून सांगण्याला ते भुलले, नक्की ठाऊक नाही पण आंबेडकर यापुढे भाजपा आणि मित्र पक्षांशी नक्कीच युती करून मोकळे होतील, पुढल्यावेळी ते देखील केंद्रात मंत्री असतील…
देशाला जगाला महाराष्ट्राला फार मोठा संदेश सुखवून सोडेल जेव्हा पहिल्यांदा बाबासाहेबांच्या घरातला घराण्यातला एक मान्यवर नेता मोदी ज्याला मंत्री करून मोकळे होतील, विशेष म्हणजे भाजपा महायुतीकडे महाराष्ट्रांत एकाचवेळी आंबेडकर आणि आठवले, त्यातून राज्यातल्या समस्त दलितांचा अप्रत्यक्ष भाजपाला पाठिंबा, महायुतीची ताकद खात्रीने मोठ्या प्रमाणात वाढेल पण जे फार पूर्वी घडायला हवे होते ते उशिरा घडते आहे, बाबासाहेबांचा वारसदार थेट सत्तेत सामील झाल्याने, मात्र बाळासाहेबांनी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी नेहमीसारखे निदान यावेळी भाजपाला तरी तोंडावर पाडू नये, दिलेला शब्द मोडू नये ज्यामुळे दीर्घकाळ थेट प्रकाश उर्फ बाळासाहेबांचेच मोठे राजकीय नुकसान नक्की होईल….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी