एकनाथा पुरे तो मनस्ताप खडसेंना पश्चाताप :
एकनाथ खडसे यांचा आता पूर्णतः आप कि कसम मधला राजेश खन्ना झालाय म्हणजे मनस्ताप कि पश्चाताप या व्दिधा विचारातून त्यांचा राजकीय गोंधळ उडालाय पण नेमकी वेळ आणि संधी त्यांच्या हातून केव्हाच सुटल्यामुळे सुसशदादा जैन यांनी ज्या अक्कल हुशारीने योग्य वेळी राजकीय सन्यास घेऊन अनेक त्रासातून विविध जाचातून फुकटच्या तापातून जशी स्वतःची बऱ्यापैकी मुक्तता करवून घेऊन आज ज्या तणावमुक्त पद्धतीने दादा उर्वरित आयुष्य नातवंडांसमवेत सुखाने समाधानाने घालवताहेत त्याच पद्धतीने तेही
तातडीने जर एकनाथ खडसे यांनी निर्णय घेऊन राजकीय सेवानिवृत्ती पत्करली तरच त्यांची देखील सुरेशदादा पद्धतीने विविध जाचातून त्रासातून मुक्तता होऊन विविध शारीरिक व्याधींना ते यापुढे सामोरे जाऊन त्यांना उर्वरित आयुष्य बऱ्यापैकी सुखा समाधानाने व्यतीत करता येईल हीच नेमकी भविष्यवाणी मी जोशी या नात्याने त्यांना याठिकाणी सांगतो आहे अन्यथा आणखी आणखी त्यांचा आणि त्यांच्या पुढल्या पिढीचा पाय खोलात रुतून नको नको त्या कटकटींना बदनामीला खडसे आणि कुटुंबाला सामोरे जाणे भाग पडणार आहे….
www.vikrantjoshi.com
निदान महाराष्ट्रात तरी चारही बाजूंनी एकनाथ खडसे यांना भाजपा प्रवेशाची दारे पूर्णतः बंद झालेली आहेत, तुम्हाला याआधी जे मी सांगितले आहे तेच येथे पुन्हा सांगतो कि आधी नाही म्हणायला खडसे यांनी भाजपामध्ये स्थान मिळविण्यासाठी विनोद तावडे सारख्या काही अस्वस्थ मित्रांच्या मदतीने जोमाने जोराचे प्रयत्न केले पण खडसेंना भाजपामध्ये पून्हा मानाचे स्थान म्हणजे अनेक कटकटींना आपणहून आवतण, हे फडणवीस यांना नेमके ठाऊक असल्याने किंवा राजकारणाचे फायदे केवळ स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या आर्थिक भल्यासाठी त्यात खडसे नेमके अनेकदा उघडे पडल्याने किंवा नागडे झाल्याने, खडसे यांचा हा केविलवाणा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. आप कि कसम मध्ये मुमताजचे वडील रहमान अतिशय पश्चाताप झालेल्या राजेश खन्नाला, आता वेळ निघून गेलेली आहे, हे जे सांगून घराबाहेर काढतात, तेच आता खडसे यांचे झालेले आहे वरून आवाजातली आणि स्वभावातली फुक्काची दादागिरी काही केल्या त्यांच्या वृत्तीतून आजही ते घालवायला तयार नसल्याने ज्या पद्धतीने पंकजा मुंडे दादागिरीला मुरड घालीत चार पावले मागे आल्याने त्यांना जसे पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि भाजपाने मोठ्या प्रेमाने आपुलकीने जवळ घेतले ते तसे अजिबात एकनाथ खडसेंबाबत घडणार नाही हे राज्याच्या वरिष्ठ भाजपा नेत्यांना आणि संघातल्या मान्यवरांना नक्की ठाऊक असल्याने शेवटचा प्रयत्न म्हणून अजित पवार यांच्या संगे महायुतीमध्ये सामील होण्याचा प्रयत्न देखील भाजपाने हाणून पाडला…
अर्थात याठिकाणी एकनाथ खडसे हा विषय पुन्हा यासाठी कि अलीकडे याच खडसे यांनी एबीपी माझा वाहिनीवर जी मुलाखत दिली त्यात नवीन काहीही फारसे नव्हते, मी कशी राज्यातली भाजपा वाढविली मोठी केली आणि मी कसा चारित्र्यवान असूनही माझ्यावर भाजपाच्या फडणवीस गटाच्या नेत्यांनी अन्याय केला, पूर्वीचीच ती तद्दन खोटी टेप त्यानंतर पुन्हा तेच ते केविलवाणे आरोप त्यांनी विशेषतः गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांवर करून पुन्हा एकदा स्वतःला जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत, विशेष म्हणजे मुलाखती दरम्यान त्यांची अवस्था एखाद्या घटस्फोट घेतलेल्या स्त्रीला जशी वारंवार आधीच्या बलदंड नवऱ्या संगतीने घालविलेल्या रोमांचक रात्रीची आठवण होऊन त्यातल्या गमतीजमती ती जशी वर्तमान नवऱ्याला सांगून त्याच्या मनात संशयाचे व भीतीचे वातावरण निर्माण करते तेच या मुलाखतीला बघितल्यानंतर नेमके आणि नक्की शरद पवारांचे झाले असेल म्हणजे ओढा आजही भाजपाकडे पण स्वीकारलेले नेतृत्व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, माझे वाक्य लक्षात ठेवा कि खडसे आणि कुटुंबीय केवळ संधीच्या शोधात, योग्य संधी चालून आल्यानंतर खडसे शरद पवारांकडे कुटुंबासहित पाठ फिरवतील हे आता साऱ्यांचाच लक्षात आल्याने शरद पवार देखील यानंतर शंभर टक्के खडसेंना संधी न देता केवळ दरवेळी वापरून घेतील त्यांच्या उरल्यासुरल्या ताकदीचा उपयोग करून घेतील. लोकसभा निवडणुकीला उभे राहा, हा खडसे यांना दिलेला भाजपातल्या फडणवीस विरोधकांचा आणखी एक खतरनाक सल्ला, हे असे केल्याने चुकून जर खडसे लोकसभेला निवडून गेले तर तिकडे दिल्लीत खुबीने शहा मोदी यांच्याशी जुळवून घेऊन इकडे फडणवीसांना डोकेदुखी निर्माण करतील त्याचवेळी सून रक्षा खडसे किंवा कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना विधानसभेत पाठविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न असेल पण मित्रांनो जो विचार खडसे आणि भाजपातले फडणवीस विरोधक करताहेत त्यावर नेमके काही चांगले घडून येईल असे अजिबात वाटत नाही कारण जळगाव जिल्हा आता पूर्वीसारखा खडसे यांच्या पाठीशी फारसा उभा नाही त्यामुळे कोणत्याही निवडणुका जिंकणे यापुढे त्यांना अजिबात शक्य नाही…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी