हिंदुस्थान हिंदुमय आणि महाराष्ट्र वेगाने बदलतोय :
आधी लोंढेच्या लोंढे काँग्रेस मध्ये काम करण्यास जाण्यास काँग्रेस कडून निवडणुका लढविण्यास काँग्रेसला मतदान करण्यास उत्सुक इच्छुक असायचे, एक ते दहा फक्त काँग्रेस त्यानंतर भाजपासहित इतर अनेक पक्ष कुठेतरी कानाकोपऱ्यात सापडायचे असायचे दिसायचे थोडक्यात जळी स्थळी ज्याच्या त्याच्या जवळपास प्रत्येकाच्या मनात हृदयात आधी इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी आणि काँग्रेस असायची, अत्र तत्र सर्वत्र सर्वदूर फक्त आणि फक्त काँग्रेस दिसायची पण गांधी मायलेकाचा खून झाला त्यानंतर पुढली दिवटी दिशाहीन विदूषक वृत्तीची भांबावलेली गोंधळलेली गांधी घराणे त्यांची पिढी बिनकामाची निघाली त्याचवेळी देशातली राज्यातली भाजपा नेमकी जोमात जोशात त्वेषात पुढे आली आणि सर्वसामान्य हिंदू त्यातून कधी नव्हे ते उसळून उफाळून वर आला आणि महाराष्ट्रात व हिंदुस्थानात हिंदूंना तेही उजळ माथ्याने सत्तेत स्थान मिळायला लागले अत्यंत महत्वाचे म्हणजे सो कॉल्ड सेक्युलर देखील हळूहळू आपण देखील कडवे हिंदू आहोत असे उजळ माथ्याने अलीकडे सांगायला लागलेले आहेत त्यामुळे कधी काळी इंदिरा राजीव गांधी कालखंडात जशी काँग्रेस देशभरतल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यात रुजली रुतली होती नेमके तेच चित्र आता विशेषतः भाजपाच्या बाबतीत दिसायला लागले आहे, एकेकाळी थट्टेचा चेष्टेचा विषय असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याची आता विशेषतः संघ विरोधकांच्याच घरातला चर्चेचा कौतुकाचा विषय झाला आहे, होय! आम्ही हिंदू आहोत हे म्हणवून घेण्यात आता तेच काँग्रेसवाले पुढाकार घेऊ लागले आहेत, त्यामुळे जे इतरत्र देशातल्या जवळपास सार्या निवडणुकांमधून घडायला दिसायला लागलेले आहे तेच नक्की आणि नेमके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शंभर टक्के घडणार आहे, पुढल्या काही दिवसात एकेकाळी जशी काँग्रेस फोफावलेली होती तेच नेमके भाजपाबाबत बघायला मिळणार आहे, ज्याची भूमिका हिंदुत्वाची त्याचा वरचश्मा हेच यापुढे वर्षानुवर्षे बघायला अनुभवायला पाहायला मिळणार आहे….
www.vikrantjoshi.com
तिकडे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचे त्यांच्या श्रेष्ठींकडून अहोरात्र ब्रेन वॉशिंग यासाठी सुरु आहे कि त्यांनी ठरल्याप्रमाणे काँग्रेस सोडून तेही भाजपात सामील होऊ नये पण घेतलेल्या निर्णयावर काँग्रेस मधले विविध प्रभावी नेते घेतलेल्या निर्णयावर ठाम आहेत त्यांना कोणत्याही क्षणी आता भाजपामध्ये सामील व्हायचे आहे. अत्यंत धक्कादायक म्हणजे राज्यातला फार मोठा नेता जो काँग्रेस मध्ये नाही असा प्रभावी नेता देखील फडणवीसांच्या सांगण्यावरून कोणत्याही क्षणी भाजपामध्ये सामील होईल तसेही हा नेता आजकाल भाजपाला रुचेल तारेल आणि आवडेल अशीच भूमिका घेतो आहे. आज जे काय चार दोन विरोधी पक्ष औषधाला सापडतेहत तेही कोणत्याही क्षणी भाजपाशी युती नव्हे तर भाजपामध्ये सामील होतील वास्तविक हिंदुत्वाची कडक भूमिका घेऊन नेतृत्व करणाऱ्यांची यापुढे डिमांड असतांना जेव्हा उद्धव ठाकरे विनाकारण बोटचेपे धोरण त्या शरद पवारांच्या सांगण्यावरून घेऊन पायावर मोठा धोंडा मारून घेताहेत अन्यथा जर भाजपा पद्धतीने याच उद्धव यांनी कडवी भूमिका विशेषतः हिंदू आणि मराठी माणसाच्या बाबतीत घेतली असती तर उद्धव यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या शिवसेनेचा झपाट्याने ह्रास झाला नसता किंबहुना अजूनही वेळ गेलेली नाही त्यांचा करिष्मा आजही ओसरलेला नाही पण पवारांच्या नादाला लागून उद्धव चुकीच्या भूमिकेवरून मागे हटायला तयार नसल्याने हळूहळू त्यांचे नेतृत्व एखाद्या क्षय रोग्यासारखे दिवसेंदिवस झपाट्याने खालावत जाऊन त्या नेतृत्वाचा कायमस्वरूपी नक्की अस्त होईल कारण हिंदुत्वाच्या लाटेत मतदार कडव्या हिंदुत्वाशी बघता बघता एकरूप झाला आहे. यापुढे येणारया प्रत्येक निवडणुका राज्यातली भाजपा नक्की कुबड्याविना म्हणजे युती किंवा आघाडीविना लढणार आहे, सध्याच्या कुबड्या देखील भाजपामय होणार आहेत, आहे ना आश्चर्यकारक आशादायी आणि धक्कादायक ? ज्यांना देशातले किंवा राज्यातले नेता म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे त्यांना, आम्ही देखील कट्टर हिंदुत्व मानणारे आहोत हेच लोकांना वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून दाखवून द्यावे लागणार आहे, पाक विचारांच्या बहुसंख्य मुसलमानांचे लांगुलचालन करणे यापुढे देशातल्या राज्यातल्या कुठल्याही नेत्याला किंवा राजकीय पक्षाला परवडणारे नाही, नसेल…..
तूर्त एवढेच : हेमंत जोशी