सूर्यास्त : मोपालवारांच्या मस्तीचा अस्त : भाग 1
जेथे मैत्री तेथे पत्रकारिता कोसो दूर ठेवायची आणि पत्रकारितेत ज्यांच्यावर तुटून पडायचे आहे असते त्यांच्याशी कोणत्याही कुठल्याही लोभातून लाभातून मैत्री करायची नाही हा मूलमंत्र मी आजतागायत जपलेला, साल नेमके आठवत नाही पण कदाचित 1985-86, राधेश्याम मोपलवार तेव्हा गोरेगावच्या चित्रनगरीत कार्यरत होते तेव्हापासून त्यांच्याशी मैत्री म्हणजे त्यांच्या पहिल्या लेकीच्या जन्मापासून तर अलीकडे ते पुन्हा बाप झाले तोपर्यंत आजपर्यंत ती मी टिकून ठेवलेली आहे कदाचित मान अपमान गिळूनही कारण एकदा का मैत्रीचे किंवा रक्ताचे नाते जुळले, असले कि तेच, काहीही झाले, घडले तरी आपणहून तेथे कसलीही कुठलीही घाण करायची नाही, नजर आणि नियत साफ ठेवायची, आईची हि मला शिकवण, त्यामुळेच आजही मी अंथरुणावर पडल्या पडल्या पुढल्या पाच मिनिटात झोपायला जातो अन्यथा मोपलवार यांच्यावर किंवा त्यांच्या टोळीतल्या शामसुंदर शिंदे यांच्यासारख्या कायम वादग्रस्त अधिकारी मंडळींवर जर मी कादंबरी लिहिली तर ती नक्की तेलगी प्रकरणापेक्षा देखील अधिक स्फोटक होईल, पण केलेल्या मैत्रीला तेही कायम सतत निरपेक्ष मनाने बघायचे, वास्तविक ते खूप कठीण असते पण जपलेल्या तत्वांसमोर सारे राग लोभ फिके असतात,अर्थात असे कितीतरी मोपलवार मी अनुभवलेले, अनुभवतो आहे, पण नात्यात आणि मैत्रीत सहनशील स्वभाव काहीही केल्या सोडायचा नसतो अन्यथा रक्ताच्या नात्यातला पत्रकार लिहितो कमी आणि कमावतो अधिक, मी पुरावे देऊन नक्की मोकळा झालो असतो, जाऊद्या, मी केलेल्या पापांची भरपाई परमेश्वर येथेच करवून घेत असतो असे मला माझ्याबाबत वाटत राहते…
www.vikrantjoshi.com
अखेर राधेश्याम मोपलवार जवळपास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून अखेर पायउतार झाले त्याहीपुढे जाऊन काही घडले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे त्यांच्याकडे जी मुख्यमंत्री कार्यालयातली जबाबदारी आहे त्यातूनही त्यांना मुक्त केले जाण्याची दाट शक्यता आहे, एका अतिशय वादग्रस्त कारकिर्दीचा अस्त आता कदाचित कोणत्याही क्षणी होऊ शकतो मात्र मला तो काळ जसाच्या तसा आठवतो फडणवीस मुख्यमंत्री झाली आणि त्यांनी आमच्या विदर्भाला जोडणाऱ्या समृद्धीची पायाउभारणी केली त्यात माझ्या ज्या दोन जवळच्या मित्रांवर जबाबदारी टाकल्या गेली त्यातले एक होते अर्थात राधेश्याम मोपलवार आणि दुसरे होते सार्वजनिक खात्याचे बिग बॉस अनिल गायकवाड, हो जो समृद्धी महामार्ग पूर्णत्वाला नेला आहे त्यात सिंहाचा वाटा जसा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा तो तसा मोपलवार आणि गायकवाड या दोघांचाही, एकनाथ शिंदे म्हणजे शरद पवार नव्हेत कि ज्यांना भकास विदर्भाच्या विकासात कायम सतत बाधा आणण्यात विकृत आनंद वाटावा, फडणवीसांनी समृद्धी महामार्गाचे जे स्वप्न बघितले ते पूर्णत्वाकडे नेण्यात नक्कीच शिंदे मोपलवार गायकवाड फडणवीसांच्या पाठीशी दरक्षणी एखाद्या उत्तुंग पहाडासारखे भरभक्कमपणे उभे होते उभे आहेत म्हणूनही मी त्या मोपालवारांवर मनातली अस्वस्थता विसरून खुश आहे पण जेव्हा मोपालवारांच्या डोक्यात सत्तेची आणि पैशांची मस्ती गेली आणि उठता बसता ते माझ्यासारखे मित्र असतील किंवा अनिल गायकवाड यांच्यासारखे कर्तबगार सहकारी, मंडळींचा अगदी चार चौघात अपमान करू लागले, एका भेटीत मी गायकवाडांकडे बघून फक्त हसलो, पुढे काय घडले, बातमी आता तुमच्या पुढ्यात आहे….
प्रभुदेसाई आडनावाचे दोन सख्खे भाऊ जळगावचे, माझे जवळचे मित्र आहेत, दोघेही मोठे धान्य व्यापारी आहेत त्यातला एक ऑफिस सांभाळतो आणि दुसरा सतत बाहेर फिरून व्याप वाढवतो तेच गायकवाड आणि मोपालवारांचे होते, समृद्धी उभारतांना अनेक असंख्य अडचणी होत्या म्हणजे जमिनी ताब्यात घेण्यापासून तर पहाड खोदणे पैशांची जमवाजमव करणे, अनेक परवानग्या, जमीन मालकांचे किंवा पवारांसारख्या नेत्यांचे त्रास, कामांची वाटणी विभागणी आणि उभारणी, पण गायकवाड आणि मोपलवार देहभान विसरून काम करताहेत, काम करीत होते, प्रभुदेसाई पद्धतीने गायकवाड टेक्निकल कार्यभाग झपाटयाने उरकत होते आणि इतर व्यवस्था अर्थात मोपलवार पुढे होते कदाचित मोपलवार आणि गायकवाड हे दोघे शूरवीर आखाड्यात उतरले नसते तर विरोधकांनी कधीही फडणवीसांचे हे भव्यदिव्य अद्वितीय स्वप्न प्रत्यक्षात नक्कीच पूर्ण होऊ दिले नसते. एक ते दहा पर्यंत त्या रस्ते विकास महामंडळात फक्त गायकवाड मोपलवार होते, इतर अधिकाऱ्यांची नावे त्यानंतर, म्हणून या दोघांनाही ढोपरापासून सलाम. एका वादग्रस्त तरीही जबरदस्त अधिकाऱ्याची, मोपालवारांची कारकीर्द समाप्त, मनाला कायम हुरहूर लावणारी, सर्वार्थाने असा अधिकारी होणे नाही, माझ्यासारख्या माहितगार पत्रकाराच्या बघण्यात नाही, मिस्टर मोपलवार माझी या ठिकाणी मेरे अपने सिनेमातली नवर्याच्या बर्या वाईट आठवणीत रमणारी मीना कुमारी झाली आहे, तुमच्या विषयीच्या कटू कडू गोड आठवणी अशाच कायम माझया हृदयात कोरलेल्या साठवलेल्या, तुम्ही संकटात देखील मस्तीत किंवा मौज करून जगत आला आहात, असेच अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आणि अनिल गायकवाड यांना बेस्ट ऑफ लक, त्यांची मोठी स्वप्ने अद्याप अपुरी आहेत, आम्ही आहोतच कि अनिल यांच्या पाठीशी, त्यांच्यावर संकटे ओढावलीच तर ती पळवून लावू. उगवत्या गायकवाडांना नमस्कार आणि मावळत्या मोपालवारांना गुड बाय !!
क्रमश: हेमंत जोशी