उभे राज्य ड्रग्सच्या विळख्यात पाक मुस्लिमांचे
कुकर्म जोमात : भाग दोन
ज्यांना मुलबाळ नाही असे आयुष्यभर दुख्खी असतात, अनेकांच्या पोटचे गोळे अचानक जेव्हा परलोकात निघून जातात त्यांना झालेले दुःख निपुत्रिकांपेक्षा काकणभर अधिक असते पण ज्या पालकांची पुढली पिढी नालायक व्यसनाधीन कुमार्गी निघते असे मायबाप असे पालक शेवटच्या श्वासापर्यंत जिवंतपणी ज्या नरकयातना भोगतात ते बघतांना थेट दगडाला देखील पाझर फुटून त्याच्या डोळ्यात आसवे जमा होतात. महाराष्ट्राच्या राजकारणातले किंवा सत्तेच्या ताकदीवर अफाट संपत्तीतून वाढलेले घडलेले आणि पुढे लयाला गेलेले एखादेच मुंडेमहाजनांचे घर व्यसनाधीनतेतून लयाला गेलेले माहित असेल पण मला असे आणखी कितीतरी कुटुंब तोंडपाठ आहेत ज्यांच्या कुटुंबप्रमुखांनी सत्ता पैसे मिळविण्याच्या नादात पुढल्या पिढी दोन पिढीतच घराण्याचा नेमका नाश थेट जिवंतपणी जे अनुभवताहेत, तुम्हाला मी नेहमीच सांगत आलोय कि कुठे नेमके थांबायचे, नेमके कुठे आवरते घ्यायचे हे सरकारी नोकरीतल्या ज्या कर्मचाऱ्यांना, प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांना, आमदार खासदार मंत्री किंवा अन्य पुढाऱ्यांना व्यवसायात सतत काळी कामे करणाऱ्यांना, सत्तेतल्या दलालांना कळले आणि ज्यांनी कुकर्म आवरते घेत घरात लक्ष घालून पुढल्या पिढीला उत्तम संस्कार देण्याचे काम केले त्यांनाच चांगले दिवस इतरांच्या पुढल्या पिढीचे आणि स्वतःच्या आयुष्याचे नक्की बारा वाजलेले असतात. निखिलच्या आत्महत्या करण्याने त्यातले एखादेच एकनाथ खडसे महाजन पद्धतीने उघडे पडले आणि लोकांनी मग नक्की बोलून दाखवले कि सर्वसामान्यांच्या शापाचा मोठा वाईट परिणाम येथेच भोगून मोकळे व्हावे लागते, आज नाही तर उद्या येथेच सारे हिशेब चुकते करून वर जावे लागते. असे खडसे महाजन संख्यने फार मोठे आहेत जे मला नेमके माहित आहेत…
www.vikrantjoshi.com
थेट आक्रमण करून भारतियांविरुद्ध कधीही कोणतेही युद्ध जिंकणे अशक्य आहे हे जेव्हा पाकिस्थानच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी कधी थेट भारतात तर कधी भारताजवळच्या दुबई सारख्या देशात भारतातल्या असंख्य बहुसंख्य पाक विचारांच्या आणि हिंदूंना कडवा विरोध करणार्या येथल्या मुस्लिम जात्यंध तरुणांना एकत्र करत त्यांना कधी लव्ह जिहाद तर कधी कशा रीतीने ड्रग्स येथे पसरवायचे, याचे पद्धतशीर प्रशिक्षण दिले त्यातून आधी पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश सारखे त्यात अडकले त्यानंतर अलिकडल्या पंधरा वर्षात याच पाक विचारांच्या मुसलमानांनी आपले लक्ष संपूर्ण महाराष्ट्रवर केंद्रित करून अचानक श्रीमंत होणाऱ्या झालेल्या कुटुंबातील तरुण पिढीला हेरत त्यांना व्यसनाधीन केले ड्रग्सच्या आहारी नेले ज्यात त्यांना विशेषतः चित्रपटसृष्टीतील बहुतेकांची मोठी मदत झाली, यशस्वितेतून व्यसनाधीनता हा चित्रपटसृष्टीतील कॉमन दुवा, अगदी मीनाकुमारी गुरुदत्त पासून तर कपूर खानदान किंवा आजचे दीपिका रणवीर ते शाहरुख किंवा मराठी सिनेसृष्टीतील अनेक नेमके अडकलेले आहेत, राज्यातल्या ज्या नामवंत घराण्यांची सर्वसामान्य सरळमार्गी कुटुंबाला मोठे आकर्षण असते त्यातले तरुण तरुणी जेव्हा ड्रग्सचे सेवन करतात तेव्हा त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला कसे रस्त्यावर आणून ठेवलेले असते, हे जर पोलिसांनी व्हिडीओ करून या सामान्यांना दाखविले तर लोकांना फसवून श्रीमंत होणारी चित्रपटसृष्टी किंवा सत्तेतले किंवा काळी कमाई करणारे नेमके कसे विदारक आणि बेताल हे बघून आपोआप या मोहमयी जगापासून दूर राहण्यात सामान्यांना समाधान वाटेल…
ड्रग्स पुरवठा करणारे पेडलर खरेदीदार आणि ड्रग्स च्या आहारी गेलेल्यांना आणखी चार जणांना तू प्रोत्साहन दे, तसे केल्यास तुला आम्ही मोफत ड्रग्स देऊ असे सांगतात त्यातूनच ड्रग्स घेऊन एकत्र सेक्स करणार्या टोळ्या जाणकारांना हमखास माहित असतात, विशेष म्हणजे अत्यंत महागडे ड्रग्स फारतर अमिषाला बळी पडणाऱ्यांना चार दोन वेळा मोफत मिळते, त्यानंतर ड्रग्स विकत घेण्यासाठी जाळ्यात अडकलेले तरुण तरुणी ज्यापद्धतीने खालची पातळी गाठतात त्यातून एड्स सारख्या विषारी अवस्थेला त्यातले कित्येक बळी पडतात, पुढे पुढे तर थेट कुटुंब सदस्यांनाच ड्रग्सच्या आहारी गेलेल्यांना बाहेरून नियमितपणे ड्रग्स उपलब्ध करून द्यावे लागते, माझे खोटे वाटत असल्यास मी तुम्हाला नक्की काही नेत्यांची किंवा अधिकाऱ्यांची नावे खाजगीत सांगतो, त्यांना विचारा कि राहुल पद्धतीने कसे अनेकांना या दुःखाला सामोरे जावे लागते. ड्रग्स विकणारे गरीब किंवा प्रसंगी थेट रस्त्यावर भिका मागणारे असतात किंवा हे एजंट कुठल्यातरी दाटीवाटीच्या मुस्लिम मोहल्ल्यात राहायला असतात जेथे मुंगी शिरायला देखील जागा नसते, ड्रग्स थेट ग्राहकांना विकणारे फारतर पोलिसांच्या नजरेस पडतात पण यांचे सूत्रधार लांब बसलेले असल्याने आणि मुख्य सूत्रधार हमखास त्या ललित पाटील पद्धतीने प्रतिष्ठित म्हणून वावरत असल्याने ड्रग्स विक्रीचे जाळे उखडून टाकणे कठीण होऊन बसलेले आहे म्हणजे आमच्या परिसरातील एक प्रतिष्ठित मुस्लिम नेता जो स्वतः ड्रगच्या आहारी गेलेला आहे तो चित्रपट क्षेत्रात साऱ्यांचा अत्यंत जवळचा आणि लाडका कारण त्याची मैत्री म्हणजे हमखास महागड्या ओरिजनल ड्रग्सची उपलब्धता, हे समीकरण जवळपास सर्वांनाच सिने क्षेत्रात तोंडपाठ आहे किंबहुना रात्री उशिरापर्यंत हा बदनाम व बदमाश नेता नेमका कोणत्या घोळक्यात बसून ड्रग्स सेवन करीत होता त्यावर आशिष शेलारांसारख्या स्थानिक नेत्यांकडे नेमकी माहिती असते. व्यसनाधीन पिढी हे आपले नेमके आव्हान आज समोर वाढून ठेवलेले आहे, सतत काळ्या पैशांच्या मागे लागून नवश्रीमंत होण्याच्या नादी लागण्यापेक्षा घराकडे सतत लक्ष आणि उत्तम संस्कार त्यावरच मन केंद्रित असावे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी