चालू नेत्यांच्या राज्यात खाऊ बाई जोरात :
यादिवसात ज्यांचा राजकारणाशी इकडून तिकडून संबंध येतो त्यांचा थायलंडला जाणार्या आंबटशौकीन पुरुषांसारखा पुरता फियास्को झालेला आहे, थायलंडला एकाच खोलीत अनेक वेश्या सजवून बसवून ठेवलेल्या असतात ज्या ग्राहकांना दाखवल्यानंतर हिला घेऊ का तिला नेऊ या गोंधळात अनेक भारतीय आंबटशौकीन तेथे पसंती न दर्शवता भलत्याच खोलीतल्या देखण्या तरुणीला पसंत करून जेव्हा भरमसाठ पैसे मोजून हॉटेलात नेतात, काही क्षणानंतर खोलीच्या बाहेर ओरडत यासाठी येतात कारण संगतीने आणलेली स्त्री नसून तो चक्क पुरुष किंवा हिजडा असतो, पतिव्रता भारतीय स्त्रियांचे आंबटशौकीन बाहेरख्याली नवरे कायम सतत थायलंडला का जातात, मी नेमके सांगितले कृपया मी मुद्दाम चावट लिखाण केले असा आरोप करू नका उलट मी बाहेरख्याली पुरुषांना येथे नागडे केले आहे आणि हा असाच गोंधळ राज्यातल्या राजकारणाशी संबंध ठेवणार्या बहुतेकांचा यासाठी झालाय कि नेमके काय चालले आहे किंवा काय घडणार आहे हे विशेषतः भाजपा संघात जे बहुसंख्य सुसंस्कृत मतदार आहेत किंवा कट्टर हिंदुत्ववादी मतदारांचा जनतेचा त्यांच्या नेमके काहीही लक्षात येत नसल्याने गोंधळ उडाला आहे, बहुतेकांना त्यातून नैराश्य आले आहे आणि कधी नव्हे ते त्यांना विशेषतः अमित शाह आणि अगदी देवेंद्र फडणवीसांचा देखील राग आला आहे ते या दोघांवर नाराज आहेत…
आपल्या या राज्यात अलिकडल्या वर्षभरात अतिशय वेगाने ज्या राजकीय घडामोडी घडून आलेल्या आहेत त्यामागे केवळ अमित शाह यांचे दूरदर्शी राजकारण आणि श्रुड वृत्ती कारणीभूत आहे आणि हे असे निर्णय घेताना सर्वसामान्य भाजपा किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नेत्यांना जी अस्वस्थता आलेली आहे ति त्यांनी तडकाफडकी मनातून काढून मोकळे व्हावे किंवा फडणवीसांनी जर माझे चुकून ऐकायचे ठरविले तर त्यांनी या दिवसात त्यांचा आणि अमित शाह यांचा जो कॉमन जवळचा जिवलग आणि विश्वासू असा स्नेही, नेता म्हणजे शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ज्यांना पुढली निवडणूक शंभर टक्के त्यांना छळणार्या पुण्यातून लढवायची नसल्याने, जे चंद्रकांतदादा यांनी फार पूर्वी भाजपासाठी फार मोठे काम करून ठेवले आहे म्हणजे राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाऊन याच दादांनी त्याकाळी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्र करीत त्यांचे ब्रेन वॉशिंग करत ज्यापद्धतीने राज्यातली अखिल भारतिय विद्यार्थी परिषद उभी केली वाढविली मोठी केली दणकट केली, नैराश्य आलेल्या कार्यकर्त्यांचे त्याच पद्धतीने मोठ्या खुबीने ब्रेन वॉशिंग करून त्या सर्वांना नैराश्य व आळस झटकून कामाला लावण्याची जबाबदारी पाटलांवर टाकण्यात यावी. नाही म्हणायला प्रदेशाध्यक्ष झाल्या दिवसापासून चंद्रशेखर बावनकुळे राज्य पिंजून काढतांना,भाषणातून कार्यकर्त्यांचे मोठ्या खुबीने मनोबल वाढविण्याचे काम नक्की करतात पण त्यांच्या जोडीला चंद्रकांतदादा, समीकरण छान जुळून येईल…
www.vikrantjoshi.com
किरण नावाचा माझा एक मित्र आहे जेव्हा तो लग्नाला आला तेव्हाच वडील म्हणाले, मामाच्या मुलीशी उरकून घे एकतर ती पाह्ण्यातली आहे वरून उच्चशिक्षित आहे, किरणने तेव्हा वडिलांना नकार देऊन अनेक मुली बघितल्या शेवटी वय वाढल्यावर त्याच्या उशिरा लक्षात आले कि बघितलेल्या त्या साऱ्यात मामाचीच मुलगी खूप उजवी आहे आणि त्याने शेवटी मामाच्या मुलीशी लग्न केले. भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले काही अति महत्वाकांक्षी विशेषतः फडणवीसांवर त्यांच्या लोकप्रियतेवर अस्वस्थ होणाऱ्या त्यांच्या काही धूर्त नेत्यांचे आमच्या या मित्राच्या लग्नसारखे झालेले आहे म्हणजे काहीही करून फडणवीसांना संपवायचे बाजूला करायचे अडगळीत टाकायचे बदनाम करायचे असे नक्की ठरवून या लबाड नेत्यांनी फडणवीसांऐवजी राज्यातल्या पक्षातल्या किंवा पक्षाबाहेरच्या अनेक नेत्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताकद दिली, शब्द दिला, सत्तेत स्थान दिले, अनेकांना फडणवीसांच्या विरोधात कधी जाहीर तर कधी कानाफुसी पद्धतीने बोलण्यास भाग पाडले त्यात काही नावे तर माझ्या अगदी ओठावर आहेत अगदी एकनाथ खडसे विनोद तावडे आशिष शेलार पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार पासून तर एकनाथ शिंदे अजित पवार पर्यंत अनेकांना अनेकदा फडणवीसांविरोधात उचकवण्यात आले पण फडणवीस अजिबात विचलित न होता अतिशय सकारात्मक भूमिका घेत पक्षासाठी राज्यासाठी दिनरात झटत होते ज्यांनी फडणवीसांना संपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यांचाच एकनाथ खडसे झाला किंवा झाला असता, आता मात्र फडणवीसांना मानसिक त्रास देणाऱ्यांच्या आपली मोठी चूक लक्षात आलेली असल्याने त्या नेत्यांचा माझा मित्र किरण झाला आहे , मित्राने जसे मामाच्या मुलीशीच शेवटी लग्न केले तेच या नेत्यांचे देवेंद्र बाबत घडले आहे, या नेत्यांनी माघार घेत पुन्हा फडणवीसांना बाहुपाशात घट्ट पकडले आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी