आपल्या या राज्यात जो ज्यादा गंदा उसका सबसे बडा धंदा :
एकमेकांना फसविणारे लुटणारे लुबाडणारे जागोजाग त्यातून एकमेकांवरचा आपला एवढा विश्वास उडालाय कि बाहेरचे सोडा पण घरातले देखील एकमेकांशी साध्या फोनवरून नाही तर कायम सतत व्हाट्स अप कॉल वरून बोलतात, ज्याला त्याला साध्या फोनवरून यासाठी भीती असते कि आपले बोलणे समोरचा नक्की टेपिंग करून मोकळा होईल आणि आपल्याला शब्दात पकडून पुरावे दाखवून कायमस्वरूपी अडचणीत आणून ठेवेल, मोठ्या संकटाला त्यातून पुढे सामना करावा लागेल, केवढे हे स्वार्थातून लुटण्या लुबाडण्याचा प्रवृत्तीतून लबाडीतून एकमेकांचे अगदी एकाच कुटुंब सदस्यांचे एकमेकांशी अविश्वासाचे संशयाचे फसवणुकीचे जालीम नाते अलिकडल्या काही वर्षात निर्माण झालेले आहे, त्यातून हाच का तो उत्तम संस्कारांचा महाराष्ट्र हा प्रश्न बोटभर उरलेल्या राज्यातल्या काही उत्तम संस्कारित लोकांना हमखास पडलेला असतो. आईशपथ, माझ्यातल्या पत्रकाराने हे असले टेपिंग उद्योग आजतागायत एकदाही केलेले नाहीत. जो नेता उत्तम संस्कारित खऱ्या अर्थाने समाजसेवी त्याला या राज्यात दरदिवशी विविध अनेक संकटे किंवा समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्याला छळणारा दुर्गुणी बदनाम बदमाश प्रतिस्पर्धी मात्र कायम सत्तेच्या राजकारणातून खोऱ्याने पैसा मिळवितो आणि सर्वोत्तम व्यसनांचा उपभोग घेत असतो, येथे हंस दाणे वेचतो आणि कावळा मोती खातो. येथे वेश्येला वाईट स्त्रियांना मोठी मागणी आहे असते, वाईट चालीरीतींच्या स्त्रियांना उत्तम प्रसिद्धी मिळते आणि उत्तम संसकारीत स्त्रियांना घराबाहेर पडतांना अनेकदा विचार करून बाहेर पडावे लागते कारण लांडगे अगदी तिच्या घराबाहेर सुद्धा दबा धरून बसलेले असतात..
www.vikrantjoshi.com
आयुष्यभर सुविचारांना घट्ट धरून बसलेल्या बहुसंख्य स्त्रियांना भलेहि त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळत असेल पुढला जन्म चांगला मिळत असेल पण वाईट चालीरीतींच्या स्त्रियांची येथे चंगळ आहे असते त्यांच्याच सभोवताली गर्दी जमलेली असते, तुम्ही आपल्या या राज्यात किंवा तुमच्या गावातल्या संस्कार न जपणार्या बायकांवर तरुणींवर नजर टाका त्यांच्याकडे सतत अगदी सहज यश चालून येत असते विशेष म्हणजे सरकारी नोकरीतल्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भ्र्रष्टाचार करण्यात अग्रेसर आहेत, अगदी अलीकडे मूळ मराठवाड्यातल्या पण मुंबईत सरकारी नोकरीत मोठ्या हुद्दयावर असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने जेव्हा दोन हजार रुपयांचे कोट्यवधी रुपये देऊन माझ्या एका सोनार मित्राकडून सोने खरेदी केले तेव्हा क्षणभर घाम फुटला होता, त्याला सल्ला देण्यात आला कि तुझा धंदा पैसे मिळविणे आहे ते करून तू मोकळा हो, उगाच पाप पुण्याचा विचार करीत बसण्यात अर्थ नाही. केवळ छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका पुतण्यांना दोष देण्यात अर्थ नाही कारण राज्याच्या राजकारणावर जर नजर फिरविली तर जे सर्वाधिक पापी लबाड बदमाश गुंड भ्रष्ट राज्य बुडविणारे तेच सरकारी नोकरीत महत्वाच्या पदांवर कायम आणि जे नेते या अशा वाईट प्रवृत्तीचे त्यांच्याच हाती सतत सत्तेची दोरी आणि सभोवताली कसे लुबाडायचे असा सल्ला देणाऱ्यांचा घोळका, चांगल्या माणसाला अशी गर्दी भेदून आपले काम सांगणे देखील जेथे मुश्किल होऊन बसते तेथे न्याय पदरात पाडून घेणे अजिबात शक्य नसते. जेव्हा अलीकडे समीर भुजबळ यांना अजित दादांच्या राष्ट्रवादीने राखी जाधव वर्षा गायकवाड आशिष शेलार इत्यादींच्या रांगेत सन्मानाने आणून बसविले राजकीय पुनर्वसन करून अजित पवारांनी पुन्हा एक नवाब मलिक मोठा केला तेव्हा राजकारण कळणार्या आणि जवळून बघणार्या काही संस्कार जपलेल्या मंडळींच्या म्हणे डोळ्यात क्षणार्धात अश्रू तरळले….
अजित पवारांविषयी तीव्र नाराजी त्यातून मनातली खदखद अनेकांकडे विशेषतः अजित पवारांच्या पवारांच्या कानावर पडेल पद्धतीने मुद्दाम पेरणी करणे, छगन भुजबळांची विशेषतः या कठीण काटकटींच्या दिवसात कायम सत्तेत मनापासून रमणार्या अजितदादांना हि अशी नाराजी नक्कीच परवडणारी नव्हती त्यामुळे काय केले म्हणजे भुजबळ काका पुतण्याचा आत्मा शांत होईल अशी माहिती जेव्हा स्वतः अजित पवारांनी जमा करायला सुरुवात केली तेव्हा वादग्रस्त पुतण्याचे पुनर्वसन तेही तेलगीवर आधारित पुढली वेब सिरीज रिलीज होण्याआधी, हे नेमके भुजबळ काका पुतण्याच्या नाराजीचे व नैराश्येचे कारण, त्यांच्याच पंक्तीला बसणार्या अजित पवारांना नेमके कळले आणि नवाब मलिक यांच्या तोडीचा थोडक्यात राष्ट्रवादीच्या संस्कारांना नेमका शोभणारा पुतण्या समीर भुजबळ यास अजित पवारांनी मग मागला पुढला कोणताही कुठलाही विचार न करता आपण काका पुतणे जसे शोभतो तसेच हे त्याच रांगेतले काका पुतणे असा सारासार विचार करून लगेचच म्हणजे छगन भुजबळ कोणतेही उघड बंड करण्याआधी समीर यांचे मुंबईचे अजित राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष असे नामकरण करून अजित पवार मोकळे झाले. वास्तविक दादा म्हणजे मोठा भाऊ आणि कुटुंबासमोर आदर्श जपणारा त्यागी मोठा भाऊ पण अजित पवारांना मात्र दादा म्हणतांना का कोण जाणे जीभ जड होत असल्याने यापुढे त्यांचा शक्यतो दादा हा आदरयुक्त उल्लेख टाळण्याचा मी बऱ्यापैकी पण केलेला आहे मात्र शब्दांच्या ओघात किंवा त्यांच्या हातून चुकून एखादे चांगले कार्य घडल्यास माझ्या तोंडातून किंवा लेखणीतून दादा असा उल्लेख झाल्यास लगेच त्याचे रूपांतर टीकेत करू नये नम्र विनंती….
क्रमश: हेमंत जोशी