राज्यातले काही कलंदर आणि काही बिलंदर नेते :
परिस्थिती बिकट असो कि उत्कट, अनेकदा उतार चढ बघणार्या भारतीय जनता पक्षात आपल्या या राज्यात फार कमी असे नेते जे दरवेळी हमखास यश मिळवून द्यायचे, देतात स्वतः निवडून येतात किंवा सहकार्यांना निवडून आणतात, थोडक्यात भाजपाला यशस्वी करण्यात ज्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यातलेच एक अकोला विदर्भातील विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी, मतदार संघात त्यांच्या समाजाची या अमराठी नेत्याची पंचवीस घरे नसतील पण आमदारकीला लालाजी उभे राहिले आणि निवडून आले नाही असे कधीच घडले नाही, निवडणूक मग ती महापालिकेची असेल किंवा आमदारकीची, नाही म्हणायला दिवंगत गोपीनाथ मुंढे आणि प्रमोद महाजन यांच्या सुचने वरून सांगण्यावरून मनोहर जोशी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले होते पण अत्यंत साधे वागणे आणि काहीसा फटकळ स्वभाव त्यातून त्यानंतर लालजींना पुन्हा सत्तेत स्थान मिळविता आले नाही आणि आता तर ते एका दुर्धर रोगातून आयुष्याचे शेवटचे काही तास मोजताहेत, हे असे काही बोटावर मोजण्याएवढे राज्यातले आजतागायतचे मारवाडी गुजराथी अमराठी नेते मला मनापासून भावले आवडले त्यातलेच जळगावचे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन ज्यांना राजकारणातला अतिआत्मविश्वास विनाकारण नडला किंवा वाशिमचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी. मी तुम्हाला अगदी अलीकडे सांगून टाकले किंवा एक सिक्रेट फोडून मोकळा झालो होतो कि राज्यातले सर्वाधिक आघाडीचे जगमान्य लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस, राज्यातल्या त्यांच्या भाजपामध्ये याच फडणवीसांवर त्यांचे काही निकटवर्तीय कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात विशेष म्हणजे त्यात काही बडे शासकीय अधिकारी देखील आहेत काही नागपूरकर आहेत पण असेही काही आहेत जे फडणवीसांऐवजी त्यांच्याकडून काही कसे मिळविता येईल यासाठी देखील जीवापाड प्रेम असल्याचा देखावा दिखावा दृश्य निर्माण करतात मात्र काही मिळो अथवा न मिळो, माझा नेता महत्वाचा, तो मोठा व्हावा असे ज्यांना सतत मनापासून वाटते त्यातलेच एक आमदार राजेंद्र पाटणी, थेट मागल्या पंचवीस वर्षांची या दोघात दोस्ती मैत्री आणि पाटणींची, फडणवीसांशी लॉयल्टीची शंभर टक्के खात्री…
www.viknatjoshi.com
या पंचवार्षिक योजनेत यापुढे राज्यातल्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा नाही तसे नक्की सांगता येत नाही येणार नाही कारण राज्यातली विशेषतः भाजपा सभोवतालची राजकीय स्थिती यादिवसात कशी चित्रविचित्र निर्माण झालेली आहे आपण सारे बघतो आहोत पण जर विस्तार झाला तर पाटणी नक्की शपथ घेतील किंवा पुढल्यावेळी देखील ते हमखास निवडून येतील आणि भाजपा जर सत्तेत आला तर पाटणी त्यावेळी निदान हमखास मंत्री असतील पण आशा अपेक्षा ठेवून ज्यांनी फडणवीसांशी कधीही संबंध जोपासले जोडलेले नाहीत त्यातले एक पाटणी, ते देखील अलीकडे थेट गोवर्धन शर्मा पद्धतीने दुर्धर रोगाशी सामना करून त्यातून इच्छाशक्तीच्या जोरावर आणि फडणवीसांच्या भरवशावर सहीसलामत बाहेर पडले आता ते एकदम फिट आहेत, आमदार पाटणी किंवा शर्मा किंवा गोरे, थोडक्यात देवेन्द्रजी यांचे आपल्यावर प्रेम करणाऱ्यांकडे बारकाईने लक्ष असते, पुढल्याक्षणी अडचणीतल्या मित्रांना सहकाऱ्यांना थेट फडणवीसांचा फोन असतो, काळजी करू नका मी सारी व्यवस्था केलेली आहे, म्हणून या बामणावर राज्यातले बहुतांश जीवापाड प्रेम करतात त्याला आपला नेता मानतात. नेमके हेच जे धनंजय मुंडे यांच्यासारख्या विरोधकांना जमले किंवा समजले ते दुर्दैवाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे सारख्या काही मूठभर नेत्यांना समजूनही उमजले नाही आणि त्यांनी स्वतःचे फार मोठे राजकीय नुकसान करवून घेतले, जे गिरीश महाजनांच्या लगेच लक्षात आले ते खडसे यांच्या फार उशिरा लक्षात आले पण तोपर्यंत वेळ निघून गेली आणि अतिलोभाच्या किंवा अतिरागाच्या भरात या अशा काही नेत्यांनी स्वतःच्या पायावर अक्षरश: कुर्हाड मारून घेतलेली आहे….
हा लेख संपवितांना अतिशय महत्वाचे सांगतो कि जे नेमके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले ते इतरांना किंवा थेट अजित पवारांच्याही जर ते लक्षात आले नाही तर अशांची ताकद बाजूला किंवा तोकडी पडेल आणि त्यांचाही मग खडसे होईल मात्र अलीकडली ती जाहिरातीची चूक वगळता एकनाथ शिंदे सारख्या देवभोळ्या आणि प्रचंड मेहनती मुख्यमंत्र्यांच्या जे लक्षात आले कि फडणवीसांना बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्की अंगलट येतो, शिंदे वेळीच सावध होऊन पुन्हा ज्या प्रेमाने व विश्वासाने फडणवीसांना अलगद जाऊन बिलगले झोंबले कवटाळले, मला माहिती अशी कि फडणवीस त्यांना प्रत्येक अडचणीच्या वेळी मनापासून सहकार्य करित असल्याने फडणवीस जे जाहीर बोलले तेच नेमके घडणार आहे किंवा घडेल, विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे पायउतार होणार नाहीत म्हणजेच चतुर लबाड डावपेची अजित पवार यांनी निदान यावेळी तरी मुख्यमंत्री पदाची स्वप्ने अजिबात बघू नयेत, पुन्हा सांगतो, फडणवीसांनी शिंदे यांना आता पुन्हा एका मोठ्या संकटातून वाचविले आहे, विश्वास ठेवा अगर ठेवू नका…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी