जरा संभालकें : पत्रकार हेमंत जोशी
यादिवसात शक्यतो एखाद्याच्या कुलंगडी भानगडी काढणे नको, मृत्यूच्या दारात आपण सारे उभे नि एकमेकांवर अशाही प्रसंगी चिखलफेक, नको वाटते, त्यामुळे मला नित्यनियमाने पुरावे माहिती पुरविणाऱ्या माझ्या तमाम मित्रांची यादिवसात मी माफी मागून त्यांनाही हेच सांगतो कि काही दिवस जरा धीर धरू या, धीराने घेऊ या, या संकटातून आधी बाहेर निघूया, पडूया. संचारबंदी पुन्हा १५ दिवसांनी वाढविल्या गेली आहे विशेषतः राज्यातल्या महानगरातून हि संचारबंदी मला वाटते मे अखेरपर्यंत तरी सुरु राहणार आहे. यादिवसात एकमेकांना सर्वोतपरी मनापासून सहकार्य करणे आणि मानसिक आधार देणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे आधी हे कर्तव्य योग्य प्रकारे व्यवस्थित पार पाडूया, शक्यतो हलक्याफुलक्या विषयांवर माझे लिखाण असेल ज्यातून वातावरण आनंदी राहील हाच त्या मागचा हेतू असेल. अर्थात या भीषण संकटातून जर राज्यातले विशेषतः आम्ही हिंदू नेमका बोध घेऊन मोकळे होणार नाही का, असे घडणार नसेल तर आमच्यासारखे दुसरे मूर्ख जगात कोठेही नसतील, संकटाच्या या भीषण दिवसात निदान हे जरी आम्हा हिंदूंच्या लक्षात आले कि आमचे नेमके शत्रू कोण, त्यादृष्टीने जर भविष्यात आपण कणखर कायम निर्णय घेऊन मोकळे होणार नसाल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच हेच ध्यानात ठेवावे…
सलून बंद, पार्लर्स बंद त्यामुळे काही दिवसांनी सडे माडे तीन मधले अशोक सराफ कोण आणि मंत्री जयंत पाटील नेमके कोणते हे पाटलांच्या वाढणाऱ्या केसांमुळे लक्षात आले नाही तर त्यात फारसे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. मला तर वाटते, काही दिवसात अनेक बायकांना देखील दाढी मिशा फुटून, विद्या चव्हाण आपल्या सुनेवर मिशांवर पीळ देत दात ओठ खातांना दिसतील किंवा पवारांचा जावइ सुळे अमेरिकेतल्या हिप्पी समूहात सामील झाला तरी ओळखू येणार नाही, अनेक खूबसूरत बायकांच्या भुवया वाघिणीच्या भुवयांसारख्या दिसायला लागतील ज्यातून त्यांनी साधे दातओठ जरी नवऱ्यावर काढले तरी तमाम नवरे मागच्या दाराने जंगलात भीतीने पळून जातील. एवढेच काय, पत्रकार अतुल कुलकर्णी पत्रकार यदु जोशींची वेणी वळताना घालतांना तुम्हाला दिसू शकते किंवा एबीपी माझा च्या खांडेकरांची त्यांच्या बायकोने घरच्या घरी बॉबकट करून त्यांना वाहिनीवर नेहमीच्या पद्धतीने आवंढा गिळून नंतर बोलतांनाचे खांडेकर यादिवसात तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. पत्रकार हर्षल प्रधान दोन छान वेण्या घालून उद्धवजींच्या मागे उभा असल्याचेही तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे…
भाजपाचे प्रसाद लाड मधेच बोलतांना बायका करतात त्यापद्धतीने केसांमध्ये क्लिप्स खोवतांना अडकवितांना दिसतील आणि बाबा सिद्दीकी दारात बसून सकाळच्या उन्हात न्हाऊन आलेल्या बायकांसारखे केस वाळवितांना तुम्हला हमखास पाहायला मिळतील. तुझी दाढी खूपच वाढली आहे ग, काल रात्री माझ्या गालांना टोचत होती हे सांगायची वेळ यापुढे नवर्यांवर येणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांचे केस एखाद्या दाक्षिणात्य स्त्रीसारखे कित्ती कसे लांब आणि दाट आहेत, कौतुकाने चर्चा करतांना त्यांचे कार्यकर्ते पाहायला मिळतील. मेकअप किट बहुतेकांचे आता संपले असल्याने उद्या एखाद्या तरुणाने प्राजक्ता माळी ऐवजी समीर चौगुले यांना एकांत गाठून घट्ट मिठी मारली तरी फारसे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही किंवा मला तर ज्युनियर सोनाली कुलकर्णी आत्तापासूनच ह्रितीक रोशन सारखी दिसायला लागलेली आहे. कपडे आणि मेकप तद्दन सामान्य दिसणाऱ्या बहुसंख्य तरुणींचे आयुष्य कसे खुलविते हे नेमके या दिवसात तुम्हाला बघायला मिळणार आहे. अमुक एखाद्या घरात बायको कोण आणि नवरा कोण कदाचितत्यांच्या सख्खे शेजाऱ्यांना देखील संचारबंदी उठेपर्यंत लक्षात येणार नाही त्यामुळे तुम्ही शेजारच्या एखाद्या पुरुषाला त्याची बायको समजून संधी साधून चुंबन दिले असेही आता हमखास घडू शकते, संचारबंदीने बहुतेकांची पंचाईत करून ठेवली आहे…
क्रमश: हेमंत जोशी