पुढले पंतप्रधान गडकरी कि मोदी
मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी ?
अलीकडे अमावास्या होती, अधिकातल्या अमावस्येला दान करावे असे म्हणतात, त्यावर नेमके काय व कोणाला दान करावे त्यावर आमच्या घरात उहापोह झाला आणि शेवटी चर्चेतून असे निष्पन्न निघाले कि मला एखाद्या तरुण आणि सुंदर स्त्रीला दान करून मोकळे व्हावे, तुमच्या ओळखीत असे एखादे सौंदर्य स्थळ असल्यास माझ्या घरी लगेच कळविण्यात यावे. मित्रांनो, कोणी वंदा कोणी निंदा, मी याच पद्धतीने अखेरपर्यंत लिखाण करणार आहे. नेमक्या विषयांकडे आता वळतो. मागल्यासारखी लोकसभेला जर यावेळी देखील भारी बहुमताने भाजपा देशात विजयी झाली म्हणजे त्यांचे 300 ते 325 खासदार पुन्हा निवडून आले तर नरेंद्र मोदी हेच पुढलेही पंतप्रधान असतील यात तिळमात्र शंका नाही मात्र संख्याबळ 225 च्या पुढे न गेल्यास सत्तेत येण्यासाठी भाजपाला मित्र पक्षांची मोठ्या प्रमाणावर सहकार्य घ्यावे लागणार आहे, असे जर घडले तर मित्रपक्षांची पहिली आणि शेवटची पसंती फक्त आणि फक्त नितीन गडकरी एकमेव असतील, थोडक्यात मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी आपणहून केलेल्या चुकांतून त्यांची हुकलेली संधी पुन्हा त्यांच्याकडे एकवार यावेळी चालून येऊ शकते हे नक्की मात्र मागल्यावेळी गडकरी यांनी केलेल्या गंभीर चुका आणि त्यांच्याच पक्षाच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्या उजेडात आणून आधी गडकरींना मोठे बदनाम केल्या गेले आणि पंतप्रधानपद त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले ज्याचे फार फार मोठे परिणाम गडकरी यांच्या प्रकृतिस्वास्थ्यावर झाले हीच वस्तुस्थिती आहे. पुन्हा तेच कि मोदी योगी यांच्यानंतर देशभरात महाराष्ट्रातल्या केवळ देवेंद्र फडणवीस आणि गडकरी या दोघांनाच उज्वल उत्तम नेतृत्व म्हणून मान्यता आहे त्यातून पुन्हा एकवार गडकरी यांना पंतप्रधान पदाचे मोठे दावेदार अशी संधी चालून येण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा मागल्या त्याच त्या लोभाच्या चुकांना गडकरी यांनी अजिबात बळी पडता कामा नये अन्यथा त्यांचे प्रतिस्स्पर्धी चुका शोधून एखाद्याला अडचणीत आणण्यात कसे वाकबगार आहेत हे मी नितीन गडकरी यांना वेगळे सांगण्याची गरज नाही, त्यांनी निदान यावेळी तरी सावध असावे…
www.vikrantjoshi.com
राजकीय वर्तुळात रस असणाऱ्यांना नेमके हे जाणून घ्यायचे असते कि राज्यपाल त्या 12 विधान परिषद सदस्यांची यादी नेमकी केव्हा जाहीर करणार आहेत आणि मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे आणखी किती दिवसांसाठी, त्यावर नेमके उत्तर असे कि महायुती मधली मोठी नाराजी निराशा टाळण्यासाठी निदान लोकसभा निवडणुकांआधी राज्यपाल या अशा कोणत्याही नियुक्तीला हिरवा कंदील नक्की दाखवणार नाहीत मात्र येत्या पंधरा दिवसात जर मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार जर केल्या गेला नाही तर महायुतीच्या आमदारांच्या मोठ्या नाराजीला आणि क्रोधाला त्यांच्या नेत्यांना सामोरे जावे लागणार असल्याने विस्तार आणि बदल नक्की होतील अशी माझी नेमकी व खात्रीलायक माहिती आहे. तुम्ही कमावून मोकळे झाला आहात आता इतरांना देखील निदान वर्षभर संधी द्यायला हवी, पद्धतीचे हलकट पण सत्य विचार शिंदे गट आणि भाजपा मधल्या काही मंत्र्यांना ऐकविले जाऊन त्यांची मोठ्या खुबीने हकालपट्टी केल्या जाईल आणि त्याऐवजी काहींना नव्याने संधी दिल्या जाईल असे दिसते. बघूया नव्याने नेमकी कोणा कोणाला संधी मिळते ती…
माझे कुलदैवत माहूरची रेणुका देवी आहे तिच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी लागोपाठ सुट्ट्या आल्याने मुद्दाम जाऊन आलो केलेल्या चुका तिच्यासमोर मांडून, माफ कर आणि चुका पदरात घे, सांगून आलो. नागपूरवरून मित्रवर्य हेमंत नानिवडेकर सोबतीला होते त्यांची महागडी जग्वार त्यांचा ड्रायव्हर 175 च्या वेगाने चालवीत होता, हे असे ड्रायव्हर असतात म्हणून समृद्धीवर नेहमी अपघात होतात पण पोटातले पाणी देखील हलत नव्हते म्हणून मी आणि नानिवडेकर दोघेही ब्राम्हण गडकरी आणि फडणवीस या दोन ब्राम्हणांचे कौतुक करीत अंतर कापत होतो. मित्रांनो, अमेरिकेपेक्षा हा सुखद अनुभव होता कारण आम्ही दोघेही अनेकदा कित्येकदा अमेरिकेच्या किंवा जगातल्या रस्त्यांवरून गाड्या चालवतो. आधीच्या समस्त नालायक मंत्र्यांनी नेत्यांनी आमच्या विदर्भाची वाट लावलेली असतांना, मनात म्हणालो, ब्राम्हणांच्या हाती अशीच सत्ता देऊन बघा, आम्ही भारताला अमेरिकेपुढे नेऊन सोडू. माहूरला दर्शन घेतांना असे लक्षात आले कि एकेकाळी नांदेड जिल्हाधिकारी असतांना ज्या श्रीकर परदेशी यांनी माहूरचे नंदनवन करून सोडले होते आज तोच माहूर गड तेथल्या अधिकाऱ्यांनी विश्व्स्तांनी व्यापाऱ्यांनी बदमाषांनी आधी व्यापून टाकला नंतर या परिसराचे या माहूर गावाचे मंदिराचे साऱ्याच बदमाषांनी एकत्र येऊन पवित्र वास्तूचे या हरामखोरांनी स्मशानवत सारे करून सोडले आहे, देवीने या हलकट मंडळींचे वाटोळे करून सोडावे आणि जे जे त्या रेणुका मातेचे भक्त आहेत आणि ज्यांच्या हाती सत्ता किंवा मीडिया आहे त्या साऱ्यांनी हा परिसर पुन्हा एकवार नंदनवन करून सोडावा. ज्या माहूरगडावर येणाऱ्या भक्तांना साधा प्रसाद देखील मोफत मिळत नाही त्या देवी भोवती जमा होणाऱ्या देणग्यांचे नेमके काय केल्या जाते हा अनुत्तरित प्रश्न मला अस्वस्थ करून गेला. रेणुका माहूर गडाचे देखील शेगाव पद्धतीने नेमके चांगले घडावे हीच देविचारणी प्रार्थना…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी