शरदरावांना कोण नडले पवारांशी कोण भिडले
याठिकाणी मी अनेक राजकीय गौप्यस्फोट करणार आहे राज्याच्या राजकारणातली वेगळी आगळी माहिती देऊन मोकळा होणार आहे. छगन भुजबळ आपल्या अनेक साथीदार आमदार आणि कार्यकर्त्यांसहित शिवसेनेतून बाहेर पडले आणि काँग्रेसच्या पवार गटात सामील झाले, विशेष म्हणजे दिल्लीत बसून पवारांनी शिवसेना फोडाफोडीची पद्धतशीर आखणी जरी केली होती तरी इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या सुधाकरराव नाईक यांनी मोठ्या शिताफीने युक्तीने धैर्याने चातुर्याने भुजबळ आणि कंपूला विविध ठिकाणी आधी लपवून ठेवले त्यानंतर योग्य सौरक्षण देऊन त्यांचे सत्तेत पुनर्वसन केले त्यांना भयमुक्त केले कारण त्याकाळी चक्क तलवार हाती घेऊन एकनाथ शिंदे सारख्या आपल्या पराक्रमी आक्रमक शिवसैनिकांच्या सोबतीने आनंद दिघे बाहेर पडलेल्या भुजबळ आणि कंपूला थेट बाळासाहेबांच्या आदेशावरून योग्य धडा शिकवायला आणि योग्य जागा दाखवायला नागपुरात यासाठी दाखल झाले होते कारण हिवाळी अधिवेशनादरम्यान हे बंड घडवून आणण्यात शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यशस्वी ठरले होते, हे असे शिवसेनेत एवढे मोठे बंड पहिल्यांदाच घडले असल्याने बाळासाहेब संतापाने लाल झाले होते, त्यांचे आदेश शिरसावन्द्य मानून तोडफोड धर्मवीर मोहिमेवर रवाना झाले असल्याने नाही म्हणायला मोठ्या पोलीस संरक्षणाखाली असून देखील भुजबळ आणि कंपूची फाटली होती, घाबरगुंडी उडालेली होती, त्यानंतर अनेक वर्षे भुजबळ आणि ठाकरे या दोघात विस्तव देखील जात नव्हता, संधी मिळेल तेथे सेनेचे आमदार भुजबळ आणि फुटलेल्या गटावर तुटून पडत होते ज्याचा फार मोठा फायदा नारायण राणे यांना झाला त्यांना मुख्यमंत्री पदाचे बक्षीस मिळाले. अत्यंत महत्वाचे म्हणजे सेनेतून बाहेर पडायची मोठी सुरुवात छगन भुजबळ यांनी केली त्यानंतर मात्र बाहेर पडणाऱ्यांची भीती चेपली आणि येथूनच सेनेला नजर लागली सेनेची पडझड सुरु होऊन अपयशाचे सावट मळभ सेनेवर पसरले…
www.vikrantjoshi.com
आता अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि काँग्रेस मधून बाहेर पडलेले शरद पवार यांनी जर त्याच वेळी शिवसेनेशी युती केली असती तर पवारांनी पवारांसाठी पाहिलेले स्वप्न तेव्हाच प्रत्यक्षात उतरले असते म्हणजे बाळासाहेब आणि पवारांचे एकत्र मोठ्या संख्यने खासदार निवडून नक्की आले असते आणि पवारांना पंतप्रधान होणे अगदी सहज शक्य झाले असते, पवारांची बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर अलीकडे तीन चार वर्षांपूर्वी झालेली केलेली आघाडी म्हणजे एखाद्या तरुणाला ऐन उमेदीत आवडलेली मुलगी, त्यावेळी आवडलेल्या तरुणीसंगे लग्न न होता तिच्यशी वृद्धत्व आल्यानंतर लग्न उरकण्यासारखे, जेव्हा कि लग्न हे नग्न न होण्यासाठी केले जाते. युती करण्याचे पवार आणि बाळासाहेबांचे एकमत झालेले होते पण त्यात अतिशय खुबीने मोठ्या युक्तीने आणि नकारात्मक वातावरण निर्मिती करत छगन भुजबळ यांनी त्याकाळी त्यादरम्यान विजयसिंह मोहिते पाटील, डॉ पदमसिंह पाटील मदन बाफना इत्यादी पवार गटातल्या म्होरक्यांना फितवून हा युतीचा डाव थेट पवारांना उल्लू बनवीत हाणून पाडला आणि युती न झाल्याने पवार दिल्लीत फारसे मोठे झाले नाहीत, ना ते पंतप्रधान झाले ना देशाचे नेते झाले त्यानंतर झपाट्याने राजकारणाचे अनेक संदर्भ बदलले आणि शरद पवारांनी बघितलेले मोठे स्वप्न शेवटी हवेतच विरले. आता पुढला अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि गौप्य्स्फोट असा कि आजतागायत महाराष्ट्रात शरद पवार यांच्याशी कोण कोण भिडले कोण त्यांना नडले कोण त्यातून यशस्वी ठरले आणि कोण उध्वस्त झाले कोण राजकारणातून कायमचे बाहेर फेकल्या गेले, अर्थात यादी मोठी आहे लांबलचक आहे, सरतेशेवटी खर्या अर्थाने शरद पवार यांच्या नाकात नेमका कोणी दम आणला हेही निश्चित बघण्यासारखे आहे…
शरद पवारांशी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी पंगा घेतला त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मनापासून सहकार्य केले पुढे या राज्यात 1995 ते 2000 दरम्यान शिवसेना भाजपा युतीने शरद पवारांना सत्तेपासून दूर नेले त्यांचे महत्व कमी केले आणि पवारांशी किंवा बलाढ्य काँग्रेसशी दोन हात करणे त्यांना राजकारणातून सत्तेतून खाली खेचणे फारसे कठीण नाही अशक्य नाही हे या दोघांनी त्या बाळासाहेबांच्या मदतीने राज्याला आणि देशाला दाखवून दिले तेथूनच थेट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील नाव देशभर दुमदुमले आणि जगाला माहित पडले तोपर्यंत बाळासाहेबांची ताकद केवळ ठाणे मुंबईपुरती असा समज विशेषतः शरद पवार आणि काँग्रेसने करवून घेतलेला होता. पवारांशी राज्याच्या राजकारणात अनेकांनी आजतागायत दोन हात केले त्यांना जेरीस आणले त्यात रामराव आदिक सुशीलकुमार शिंदे विशेषतः विलासराव देशमुख हे काँग्रेसचे नेते पण दिल्लीकरांचे लाडके येथे राज्यातले पवारांचे विरोधक म्हणजे राजीव गांधी यांचे केवळ नेतृत्व मानणारे आणि पवारांना अनेक प्रसंगी फाट्यावर मारणारे हे असे पवारांच्याच पक्षातले पण पवारांचे विरोधक पवारांना न घाबरता नाही म्हणायला नक्की फ्रंटवर असायचे त्यांना अगदी उघड दिल्लीत महत्वाची पदे उपभोगणार्या दिवंगत शंकरराव चव्हाण यांची देखील मनापासून साथ असायची त्यातूनच म्हणजे पवारांना अंगावर घेण्याच्या भूमिकेतूनच रामराव आदिक सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख त्याकाळी कायम मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे असायचे पण दरवेळी या तिघांची अवस्था गोटी सोड्यासारखी व्हायची म्हणजे आवाज मोठा पण गॅस निघून गेल्यानंतर सारे काही शांत शांत त्यातून रामराव आदिक वर गेले पण मुख्यमंत्री झाले नाहीत आणि शिंदे देशमुख मात्र नशीबवान ठरले म्हणजे उशिरा का होईना त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दिवस गेले. पवारांचे विरोधक आणि त्यावर गौप्य्स्फोट हा विषय येथेच संपत नाही, पुढल्या भागात अधिक खळबळजनक….
अपूर्ण : हेमंत जोशी