महाराष्ट्राचे मंत्री टॉप कोणते फ्लॉप कोणते
आपला स्वभाव आपली वृत्ती त्यातून उध्वस्त होणारे कुटुंब आणि लयाला जाणारी संतती याचे भान बहुतेक पालकांना विशेषतः बापाच्या भूमिकेतल्या पुरुषांना जसे अजिबात कळत नाही तसे बहुतेक भारतीयांना कॉफी, परफ्यूम्स आणि चॉकलेट्स मधले देखील फारसे कळत नसल्याने ते कायम या तिन्ही प्रकारात स्वतःची मोठी सतत फसवणूक करवून घेतात म्हणजे अमुक एखादे परफ्युम त्याच्या सुगंधावर भारतीयांची कायम खरेदी जशी अवलंबून असते तेच त्यांचे कार्स खरेदी करतांना देखील, अर्धवट माहिती आणि प्रचंड हौस, कार्स विकणारे बहुतेक भारतीयांना कायम उल्लू बनवून मोकळे होतात. इन्कलाब या सिनेमात हिरो अमिताभ एकाचवेळी महत्वाच्या अनेक नेत्यांना मंत्र्यांना ठार मारून मोकळा होतो तो तसा राग जोपर्यंत राज्यातल्या तमाम भ्रष्ट लालची देशद्रोही मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत मतदारांना नागरिकांना येत नाही आणि ते हाती काठी घेऊन जोपर्यंत तमाम नालायक मंडळींच्या मागे लागणार नाहीत तोपर्यंत हे लोण असेच पसरत जाईल वाढत राहील. मंत्री मंडळ बदल आणि विस्तार नक्की होईल, कोणत्याही कुठल्याही क्षणी होईल विशेषतः एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडे जी महत्वाची खाती आहेत त्यासाठी अतिशय जबाबदार मेहनती लोकाभिमुख राज्यमंत्र्यांनी निवड होणे आवश्यक आहेत म्हणून ते नक्की घडून येईल. जसे लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय ऊर्जा खाते पण हे खाते फडणवीसांकडे असल्याने त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणसाला पोहोचणे तसे कठीण होऊन बसते आणि लोकांची कुचंबणा होते थोडक्यात विस्तार आणि बदल
महायुती सरकारची आजची गरज आहे आणि तसे बदल लवकरच पाहायला मिळतील….
www.vikrantjoshi.com
एकनाथ शिंदे गटाचे अनेक मंत्री महायुती मंत्री मंडळात आहेत पण संजय राठोड गुलाबराव पाटील संदीपान भुमरे तानाजी सावंत अब्दुल सत्तार आधीच विविध व्यवहारात एवढे बदनाम झाले आहेत कि यांच्याऐवजी काहींना नव्याने संधी द्यावी का या विचारात स्वतः शिंदे आणि फडणवीस आहेत अशी माझी माहिती आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेणे शक्य नसेल तर त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या पोहोचण्यासाठी एकनाथ यांच्या अतिशय जवळचे जे मंत्री आहेत मग ते उदय सामंत असतील किंवा दादा भुसे किंवा शंभूराजे देसाई किंवा दीपक केसरकर असतील यापैकी एखाद्याचा सहारा या दिवसात अगदी सर्हास अनेक नेते कार्यकर्ते घेतांना दिसतात अर्थात जो मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ असण्याचा फायदा, गैरफायदा नव्हे, घेईल त्याचे राजकीय भवितव्य नक्की नजीकच्या भविष्यात उज्वल ठरेल यात कोणतीही शंका नाही. जसे काही मंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी जवळचे तेच फडणवीसांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गिरीश महाजन फडणवीसांना एवढे जवळचे आहेत कि जर महाजन स्त्री असते तर फडणवीस यांचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून ते नक्की बदनाम झाले असते म्हणजे जेथे कमी तेथे महाजनांची हमी असे फडणवीस आणि महाजन परस्पर नाते असले तरी यावेळी इतरही भाजपाचे मंत्री सतत कायम फडणवीसांच्या सभोवताली असतात आणि त्यांनी टाकलेली जबाबदारी जीवाचे रान करून पार पाडतात हे नक्की आहे किंबहुना रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील इत्यादी साऱ्याच मंडळींनी ते तसे सिद्ध केलेले आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्यात आणि काही मंत्र्यांमध्ये त्यावेळी जसा दुरावा निर्माण झालेला होता ज्यामुळे विनाकारण दादागिरी करणाऱ्या मंत्र्यांना जशी मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती ती तशी त्यावेळची शंकेची भीतीची दडपणाची परस्थिती आज अजिबात नाही, फडणवीस निश्चिन्त आणि खुश आहेत. आपण ज्या आर्थिक गैरव्यवहारातून मोठे बदनाम झालो ती चूक जवळपास साऱ्याच मंत्र्यांनी करण्याचे टाळावे पुन्हा तेच ते सुरु ठेवल्यास त्या साऱ्यांची अवस्था ठेचा खाणाऱ्यासारखी होईल म्हणजे खातांना चविष्ट पण नंतर परिणाम मोठे वाईट होतील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी