महाराष्ट्राचे मंत्री हि घ्या नेमकी माहिती
काही विद्यार्थी दहावीला मेरिट येतात आणि बारावीला फेल होतात काही मुली लग्नाच्या आधी रामरक्षा म्हणतात आणि लग्नानंतर चक्क नियमित पब डिस्कोला जातात मीडियातले बहुतांश आधी नोकरीसाठी वणवण भटकतात आणि नोकरी मिळाली कि स्वतःला आमदार समजून दलाल्या करीत फिरतात तसे बहुतेक आमदार नामदार होण्यास धडपडतात विनवण्या करतात पण एकदा का मंत्री झाले कि खात सुटतात वाट्टेल ते धंदे करतात अगदीच मोजके आमदार कि जे मंत्री राज्यमंत्री झाल्यानंतर देखील जमिनीवर पाय ठेवून असतात आणि मोजके मिळवून नाव कमावून निवृत्ती पत्करतात दिवंगत गणपतराव देशमुख किंवा बाळासाहेब चौधरी पद्धतीचे. सध्याच्या महायुती मंत्रिमंडळात तीन म्होरके मोठे आणि महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उरलेल्या दोघांनी जर यापुढे फडणवीसांचे ऐकले त्यांचे अनुकरण केले तर फडणवीस नक्की दिल्लीला निघून जातील पण त्यांच्या पाठी या राज्याचे महाराष्ट्राचे दीर्घकाळ नेतृत्व केवळ हे दोघेच करतील मात्र काही दुर्गुणांवर नियंत्रण ठेवणे दोघांनाही अत्यंत आवश्य आहे आणि नेमके जवळ कोणाला बाळगायचे ठेवायचे हे एकनाथ शिंदे यांनी नक्की ध्यानात घेणे खूप खुप गरजेचे आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झाले कि धाकटीला जसे रान मोकळे होते ते तसे या दिवसात आमदार रोहित पवारांचे झाले आहे म्हणजे तिकडे अजित पवार बाहेर पडले आणि इकडे रोहित पवार एकदम सुटले, जोशात उत्साहात प्रसिद्धीच्या झोतात आले म्हणजे एवढे दिवस संधीचा मोका शोधण्या जे रोहित पवार दबा धरून बसलेले होते एखाद्या तरबेज शिकार्यासारखे योग्य नेमक्या झाडाआड लपून बसलेले होते किंवा निष्णात कोळ्यासारखे पाण्यात जाळे पसरवून बसलेले होते त्या रोहित पवार यांचे नेमके काम फत्ते झाले जेव्हा त्यांच्या रस्त्यातला कायम आडवा येणारा दगड आपोआप गडगडत बाजूला झाला जणू अजित पवार यांनी रोहित यांना आपणहून मार्ग मोकळा करून दिला. प्रेयसीचा नवरा सहा महिन्यांसाठी परदेशात निघून जावा त्यानंतर तिच्या प्रियकरालाच शेजाऱ्यांनी असली नवरा समजावे तसे रोहित यांचे या दिवसात आता झालेले आहे, सुप्रिया बाजूला पडल्या शांत केल्या गेल्या तिकडे भावखाऊ अजित पवार काकांना सोडून दुसरीकडे निघून गेले आणि नेमक्या संधीचे मग रोहित पवार यांनी सोने केले, म्हणजे शरद पवार यांच्यानंतर या दिवसात मानाचे सन्मानाचे स्थान नक्की रोहित पवारांना बऱ्यापैकी प्राप्त झालेले आहे. भाषेवर प्रभुत्व, राजकारणातला नेमका बेरकी स्वभाव, कमी बोलणे पण मोजके पुटपुटणे मधूनच हसणे मधूनच रागावणे मित्र कार्यकार्ते जोडण्याचाव्यासंग हाती पैसा जोडीला पवारांचे नाव आणि घराणे उच्चशिक्षित नेत्याला शोभेल असे समोरच्याला न कळणारे व्यक्तिमत्व, यापुढे रोहित पवार यांना मोठे राजकीय उज्वल भवितव्य आहे अर्थात हे मी तुम्हाला याठिकाणी फार पूर्वी सांगून ठेवले आहे लिहूनही ठेवलेले आहे. आता आणखी एक नेहमीसारखा गौप्य स्फोट, पवारांच्या घराण्यात नव्याने आणखी एक नवा नेता मैदानात नजीकच्या काळात उतरणार आहे आणि त्याचे नाव आहे जय अजित पवार, जो पार्थ पवारांचा धाकला भाऊ आहे आणि एवढे दिवस दुबईला अधिक मुंबईत कमी असायचा पण आता बाप लोकांनी ठरविले आहे कि जय मुंबईत अधिक आणि दुबईत कमी असेल शिवाय मुंबई बारामती मध्ये राहून सक्रिय राजकारणात व्यस्त होईल कदाचित पार्थ आधी त्यालाच अजितदादा पवार खात्रीने राजकारणात वेगाने खूप पुढे आणतील. अजितदादा यांचा आणखी एक वारसदार आता युवा नेता म्हणून पुढे आणल्या जाईल…
क्रमश : हेमंत जोशी