जपावेत उत्तम संस्कार, मिस्टर विजय वडेट्टीवार
मी जे आधी लिहून ठेवतो बोलून मोकळा होतो तेच राज्याच्या राजकारणात घडते हे नक्की. पुन्हा तेच कि जे सांगितले नेमके तेच घडले, विजय वडेट्टीवार सभागृहातले विरोधी पक्ष नेते म्हणून निवडल्या गेले, छान झाले म्हणजे आजपर्यंत विदर्भ अगदीच दुर्लक्षित होता आता अलीकडे त्यात बदल झाला विदर्भातल्या नेत्यांची व्हॅल्यू साऱ्यांना कळली म्हणून आता आमच्याकडे संधी चालून यायला लागल्या पण या वर्हाडी नेत्यांनी देखील यापुढे संधीचे सोने करायला हवे स्वतःचा बावनकुळे गडकरी फडणवीस त्यांना स्वतःमध्ये घडवता यायला हवा पण असे आजही उत्तम संस्कारांनी घडलेल्या वेढलेल्या विदर्भातले बहुतांश नेते मात्र नालायक निघाले बहुतेक अनिल देशमुख पद्धतीने केवळ आपले कुटुंब श्रीमंत करण्यात धन्यता मानून वेगळे झाले त्याला अपवाद विजय वडेट्टीवार देखील नाही म्हणजे शिवानी सारख्या उत्तम नेतृत्व गुण असलेल्या तीन तीन पोरींना जन्माला घालून देखील हेच जुनाट विचारांचे विजय वडेट्टीवार पुत्र प्राप्तीसाठी एवढे आसुसले होते कि शेवटी त्यांनी एकास दत्तक घेऊन वंश पुढे नेण्याचा अडाणी प्रयत्न केला शेवटी त्यात त्यांना यश आले. आता खूप कमावून झाले स्वतःसाठी विजयबाबू, अमरत्व मिळवायचे असेल तर पैसे मिळवा पण गरिबांवर खर्च करा अन्यथा तुमच्या काळ्या पैशांची नोंद केव्हाच आवश्यक त्या ठिकाणी झालेली आहे हे मला अगदी पुराव्यांसहित माहित आहे. पैसे हवे तेवढेच खाणे किंवा मिळविणे हा जो वर्हाडी उत्तम संस्कार आपल्याकडे जपल्या गेला आहे तेच ध्येय पुढे न्या उगाच नितीन राऊत पद्धतीची खाव खाव करून पुढल्या पिढ्या दोन पिढ्यात वडेट्टीवार घराण्याचे वाटोळे करवून घेऊ नका, आपल्या दोघांचा मित्र बाळू धानोरकर जसा वर काहीच घेऊन गेला नाही तेच उद्या तुमचे माझे होणार आहे पेक्षा समाजसेवा करून मोठे व्हा मोकळे व्हा….
www.vikrantjoshi.com
वाचक मित्रहो, अनेक नेत्यांना सत्तेत अधिकारात असणाऱ्या बड्या प्रभावी अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी माझया मार्फत ओळखी करवून घ्यायच्या असतात, सुरुवातीला मी ते काम केले देखील पण माझया ते लक्षात आले कि कोणालाही राष्ट्रसेवा किंवा समाज सेवेसाठी या अशा ओळखी करवून घ्यायच्या नसतात तर ओळखी करवून घेण्यामागे केवल दलाली करून बक्कळ पैसे मिळविणे हा एकमेव या सर्वांचा उद्देश असतो आणि येथेच महाराष्ट्र देखील मार खातो मागे जातो मूठभर मंडळी तेवढ्या श्रीमंत होतात पण ज्यादिवशी खूप काही समाजासाठी आणि थोडेसे आपल्यासाठी असे वागण्याचे सत्तेतले सारे ठरवतील आपली हि अशी गलिच्छ मानसिकता घडेल त्यानंतर नक्की राज्य घडेल राष्ट्रांत प्रथम असेल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी