आम्ही बि घडलो तुम्ही बी घडाना
याठिकाणी केवळ महाराष्ट्राचा विचार करता तुमच्या असे लक्षात येईल कि भाजपा आणि काँग्रेस वगळता इतर कुठल्याही पक्षाची नेमकी ध्येयधोरणे किंवा आचार विचार संहिता अजिबात ठरलेली नाही अर्थात ज्या राष्ट्रीय सेवादलाच्या किंवा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एकेकाळी संघ भाजपा पद्धतीने काँग्रेस घडत होती तो त्यांचा विचार मागे पडला हा भाग वेगळा पण तीच परिस्थिती भाजपामध्ये देखील निर्माण होण्याची भीती आता त्यांना स्वतःलाच वाटू लागलेली आहे हे कदाचित तुम्हाला माहित नसेल पण जेथे संघ विचारांना थारा नाही तेथे भाजपा देखील स्वतःची काँग्रेस करवून घेतो आहे किंबहुना सत्तेच्या नादात सत्तेच्या हव्यासापोटी संघातून जन्माला आलेला भाजपा काहीसा भरकटतो आहे याची त्यांना स्वतःलाच या दिवसात मोठी काळजी लागलेली आहे. अलीकडे एका हार्डकोअर भाजपा नेत्याने संघ स्वयंसेवकाने भाजप मंत्र्याने त्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांना जाहीर थेट असे सांगितले कि जे तुम्ही मुख्यमंत्री असतांना स्वतः एकटे पुढे जात असतांना इतरांना मात्र संपविण्याचे जे तंत्र विकसित केले ते निदान यापुढे थांबवा म्हणजे तुम्ही पुढे जा अगदी पंतप्रधान व्हा पण आमच्या पायात पाय अडकवून आम्हाला भुईसपाट करू नका अर्थात देवेंद्र यांना हे सुरुवातीला का करावे लागले त्याची उत्तरे माझ्याकडे नक्की आहेत पण ज्या मंत्र्याने हा सवाल केला तो स्वतः कुठे उभा आहे, स्त्रियांची ऐयाशी आणि सत्तेतून मिळविल्या जाणार्या श्रीमंतीच्या उंबरठ्यावर म्हणजे या नेत्याच्या या मंत्र्याच्या बंगल्यावर आणि फार्म हाऊसवर अलीकडे जेव्हा माझा एक अगदी जवळचा मित्र नेता मुक्काम करून परतल्यानंतर म्हणाला कि अविनाश भोसले यांचे ऐश्वर्य देखील त्यासमोर फिके पडेल. अर्थात या राज्यातल्या या पद्धतीच्या नेत्यांची मंत्र्यांची अधिकाऱ्यांची अगदी इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे असते पण मला किरीट सोमय्या व्हायचे नसल्याने म्हणजे श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचे नसल्याने मी केवळ या मंडळींना सावध करण्याची भूमिका घेतो उगाच तुटून पडत नाही लालसेतून डोकेदुखी विनाकारण वाढवून घेत नाही…
www.vikrantjoshi.com
मला वाटते देवेंद्र फडणवीस पद्धतीचे असे नेते या राज्यात अगदीच अभावाने आढळतील कि ज्यांच्याकडे सत्ता आणि मार्ग उपलब्ध असून देखील त्यांना स्वतःसाठी काहीही कमावून ठेवायचे नाही किंवा फडणवीस हे शरद पवार नाहीत कि ज्यांना सुप्रिया पद्धतीने आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी मोठे घबाड मिळवून साठवून ठेवायचे आहे, त्यामुळे इतर संघ भाजपा नेत्यांची अवस्था त्या काँग्रेस सारखी होता कामा नये एवढेच मनातून वाटते अन्यथा आज जे एकेकाळच्या बलाढ्य काँग्रेसचे झाले तीच दुरावस्था नक्कीच भाजपा नेत्यांची देखील होण्यास फारसा वेळ लागणार नाही. फडणवीस या राज्यातले कदाचित एकमेव प्रभावी नेते असावेत जे सत्तेत असून देखील त्यांचा ना कुठला साखर कारखाना आहे ना शैक्षणिक संस्था किंवा इतर उत्पन्न देणारी व्यायवसायिक साधने म्हणजे जे नितीन गडकरी यांच्यासहित अगदी भाजपा मधल्या राज्यातल्या इतर कोणत्याही नेत्याला व्यक्तिगत मोहावर नियंत्रण ठेवता आलेले नाही, देवेंद्र फडणवीस एकमेव ज्यांनी खर्या अर्थाने संघ स्वयंसेवक म्हणून विचार जपून राजकारण केले, आचरणात आणल्या जावो किंवा नाही तो भाग वेगळा पण भाजपा आणि काँग्रेस पद्धतीने जर दीर्घकाळ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांची अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी लोकांमध्ये रुजवून दीर्घकाळ टिकवायची असेल तर एकनाथजी आणि अजितदादा दोघांना देखील त्यांच्या पक्षाची नेमकी वैचारिक संहिता तयार करून पक्ष टिकविण्यासाठी वाढविण्यासाठी जपण्यासाठी उत्तम कार्यकर्त्यांची वेगळी फौज तयार करून पक्ष उभारणी करावी लागेल. पृथ्वीराज चव्हाण अनंत गाडगीळ पद्धतीचे कार्यकर्ते नेते कसे उभे राहतील त्यावर या दोघांनी विचार करून पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा ज्या वेगाने ते आणि त्यांची पार्टी पुढे आली त्याच्या दुप्पट वेगाने ते खाली घेऊन नेस्तनाबूत होतील यात तिळमात्र शंका वाटत नाही. नेमक्या कोणत्या ध्येय धोरणांवर आपले कार्यकर्ते पुढे न्यायचे आहेत हे त्यांनी आत्ता ठरविणे आत्यंतिक गरजेचे आहे. संघ आणि भाजपा परिवाराला एक नम्र सूचना कि ज्यांचा आजवर रा. स्व. संघांशी त्यांच्या आचार विचारांशी दूर दूर पर्यंत संबंध आलेला नाही पण ज्यांनी अलीकडे भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे त्या साऱ्यांना विविध ठिकाणी शिबिरे भरवून त्यांना नेमका संघ भाजपा व त्यांच्या ब्रॅंचेस आणि कार्ये नेमकी समजावून सांगितल्या गेली पाहिजेत अन्यथा ते आधी ज्या बिघडलेल्या पक्षात कार्यरत होते त्या गटारगंगेत तुम्हाला देखील बुडवून बिघडवून नक्की मोकळे होतील..
तूर्त एवढेच : हेमंत जोशी