पोंक्षेंची पोरगी पायलट झाली, पुढे काय ?
सिद्धी पायलट झाली याचा स्वतः शरद पोंक्षे त्यांचे कुटुंबीय नातलग आणि चाहते यांना अत्यानंद झाला तर त्यांच्या तमाम मूर्ख विरोधकांसाठी हा टीकेचा विषय ठरला,नालायकांनी शरद पोंक्षे सिद्धी आणि त्यांच्या कुटुंबियांना अलिकडल्या काही दिवसात सळो कि पळो करून सोडले त्यांना ट्रोल केले बदनाम केले त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांना बदनाम करण्याचा या हलकटांनी मोठा प्रयत्न केला. अर्थात सिद्धी पायलट झाली याचा नक्कीच मला मोठा आनंद झाला पण वाटली ती सिद्धी आणि पोंक्षे कुटुंबीयांची काळजी कारण सिद्धी हि काही प्रमोद महाजन यांच्या कुटुंबातली सदस्य नाही कि ती पायलट झाल्या झाल्या तिला जेट सारख्या एखाद्या मोठ्या विमान कंपनीत लगेच रुजू करून घेतल्या जाईल. माझा अनुभव माझी माहिती माझा अभ्यास असा कि पायलट होणे फारसे कठीण नाही किंबहुना सिद्धी हिने कठीण परिस्थिती वर मात करीत ट्रेनिंग पूर्ण केले ती पायलट झाली त्यावर करावे तेवढे कौतूक नक्कीच कमी. पण जगभरातून दर महिन्याला सिद्धी पद्धतीचे कितीतरी पायलट तयार होत असतात त्यात तीव्र स्पर्धा आहे, मात्र विमानांची संख्या मूठभर आणि तयार होणारे पायलट्स हातभर बहुसंख्य त्यामुळे प्रत्येकालाच नोकरी मिळते असे अजिबात नाही ते तसे नक्की शक्य नाही त्यामुळे सिद्धीची खरी चिंता काळजी यासाठीच वाटते कि एकदाची ती पायलट झाली खरी पण तिच्यासमोर जर नोकरीचे ताट मांडून ठेवलेले नसेल तर तिला आणि पोंक्षे कुटुंबाला आणखी पुन्हा मोठ्या काळजीला सामोरे जावे लागणार आहे. बारोलिया आडनावाचे माझे एक मित्र आहेत त्यांचा भाचा पायलट झाल्यानंतर तो तब्बल चार वर्षे बेकार होता, शेवटी कंटाळून तो जपानला निघून गेला आणि नातेवाईकाच्या हॉटेलात वेटर म्हणून काम करायला लागला. बेंगलोर मध्ये राहणारा माझा मित्र त्याच्या देखील मुलास पायलट म्हणून नोकरी न मिळाल्याने शेवटी त्या मुलाने गावी जाऊन शेती करणे पसंत केले आणि पुढे वयाच्या पस्तिशीला त्याचे लग्न मोठ्या मुश्किलीने झाले, असे शेकडो उदाहरणे जागोजाग आहेत. पायलट म्हणून महागडे ट्रेनिंग हौशेने जिद्दीने आवडीने पूर्ण केल्यानंतर नोकरी न मिळाल्याने देशात परदेशात माझ्या असे कितीतरी ओळखीचे कि त्यांनी पुढे पायलट होण्याचा नाद सोडला आणि वेगळा मार्ग पत्करला. पायलट म्हणून नोकरी न मिळाल्याने स्वतःला आणि कुटुंबाला येणारे नैराश्य आणि वाट्याला येणारी बदनामी देव करो पण पोंक्षे कुटुंबाच्या वाट्याला येता कामा नये. अर्थात जगभरात ज्यांच्या विमान कंपनीत ओळखी आहेत त्यांनी शरद पोंक्षे या स्वाभिमानी देशभक्ताला सहकार्य करून सिद्धीस नोकरी मिळवून देऊन आम्हास उपकृत करावे…
www.vikrantjoshi.com
परिस्थिती कठीण असेल किंवा नसेल मुले आणि पालक असेल त्या परिस्थितीवर मात करीत शिक्षण पूर्ण करतात पण पालकांच्या आणि मुला मुलींच्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण काळ कोणता तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय यात स्थिर होईपर्यंतचा काळ पालक आणि मुलांच्या आयुष्यातला सर्वाधिक खडतर कठीण स्ट्रेसफुल बिकट असतो असे माझे स्पष्ट मत आहे किंवा तो माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मला माझे करिअर निवडतांना आणि घडविताना किंवा पोटच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायात केलेली धडपड आणि त्यादरम्यान येत असलेले टेन्शन वाटणारी काळजी येणाऱ्या अडचणी होणारी चिडचिड त्यातून आम्ही गेलो असल्याने प्रत्येक भारतियांच्या घरात यापेक्षा वेगळे असे अजिबात घडत नाही असे माझे ठाम मत आहे म्हणजे व्यवसाय नोकरी प्रोफेशन इत्यादी कुठल्याही क्षेत्रात करिअर घडविताना जो ताण तणाव गरिबांना माध्यम वर्गीयांना श्रीमंतांना येतो तो थेट शरद पवार किंवा मुकेश अंबानी सारख्या पालकांना देखील जर त्यांच्या मुलांना बौद्धिक किंवा शारीरिक मर्यादा असतील किंवा नसतील तरीही येतो यात एकाचेही दुमत असण्याचे कारण नसावे. माझे एक परिचित चंद्रशेखर साने म्हणाले कि त्यांच्या ओळखीत एका तरुणीने धडपड कष्ट धावपळ करीत परफेक्ट पायलट होण्याचे शिक्षण घेतले पण काही केल्या जेव्हा तिला नोकरी मिळेना, शेवटी ती एअर होस्टेस झाली आणि नोकरी करायला लागली अर्थात पायलट होऊनही नोकरी न मिळाल्याने येणारे नैराश्य आणि पुढे नाईलाजास्तव निवडलेले वेगळे क्षेत्र या आपत्तीतून कितींना तरी तोंड द्यावे लागते, विविध क्षेत्रात देखील हे असे घडते जे त्यातल्या प्रत्येक कुटुंब सदस्यांना मोठ्या यातना देणारे ठरते…
माझे एक सलोखा असलेले ओळखीचे आवडीचे दाम्पत्य त्यांचा हुशार धडपड्या देखणा तरुण मुलगा त्याने देखील पायलट होण्याचे ठरविल्यानंतर जे या देशातल्या अनेक बहुतेक कुटुंब सदस्यांचे होते म्हणजे केवळ एक ग्लॅमर म्हणून पायलट होण्या जे आधी धडपडतात आणि नंतर वेळ पैसा खर्च झाल्यानंतर वेगळा मार्ग त्यांना पत्करावा लागतो तेच या कुटुंबाचे झाले म्हणजे हक्काचे स्वतःचे शहरातले घर विकून या ओळखीच्या दाम्पत्याने मुलास पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठविले जिद्दी मुलाने प्रशिक्षण पूर्ण केले पण पुढे तेच कि खूप धडपड प्रयत्न करून ओळखी काढून देखील या तरुणास अनेक वर्षे पायलट म्हणून नोकरी मिळाली नाही अखेर कंटाळून त्याने वेगळा मार्ग पत्करला आता तो पुण्यात नोकरी करतोय विशेष म्हणजे तो तरुण एवढा स्मार्ट कि चक्क एका प्रथितयश अभिनेत्रीने त्याच्याशी लग्न केलेले आहे, पण पायलट म्हणून करिअर घडत नाही हे जेव्हा त्या तरुणाच्या आणि पालकांच्या लक्षात आले आणि त्यानंतर काही काळ त्या तरुणास आलेले नैराश्य, केवळ हिम्मत नशीब आणि परमेश्वराची साथ ते त्यातून बाहेर पडले, अर्थात हि अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील. आता अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे माझा याआधीचा लेख वाचल्यानंतर आपणहून द ग्रेट शरदजी पोंक्षे यांनी मला केलेला पाठवलेला मेसेज सदैव स्मरणात राहणारा. पोंक्षे लिहितात, व्वा डोळ्यात पाणी आले सर. पण सिद्धी अजून पुढचे ट्रेनिंग घ्यायला परत अमेरिकेत जाणार आहे. ट्रेनर म्हणून नोकरी करून पुढे शिकणार व मग वर्षाने भारतात येऊन नोकरी शोधणार. त्यामुळे नोकरी मिळणे सोपे जाईल कारण ती स्पेशलायझेशन करून येईल. तुम्ही मांडलेल्या सर्व बाबींचा विचार आम्ही केलाय पण तुमची कळकळ पोहोचली. धन्यवाद !! प्रखर हिंदुत्ववादी प्रभावी अभिनेते तुम्हा आम्हा सर्वांना हवेहवेसे वाटणारे शरद पोंक्षे आणि त्यांच्या कुटुंबियांना पुढल्या वाटचालीस शुभेच्छा आणि पाठिंबा देखील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी