खडसे जिंकले आणि खडसेंनी जिंकले
हे एकनाथ खडसे मला जे अगदी अलीकडे सभागृहात पाहायला बघायला ऐकायला मिळाले त्याआधी कधीही हे खडसे माझ्या किंवा एकाच्याही नजरेला पडू नयेत हे स्वतः एकनाथ खडसे यांचेच दुर्दैव !! समाजवादी पक्षाचे वादग्रस्त आमदार अबू आझमी यांनी विधान भवन परिसरामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताविषयी बोलतांना वादग्रस्त विधान केले आहे ज्यातून पुन्हा एकवार राष्ट्रातल्या राज्यातल्या मुसलमानांचे हिडीस रूप नेमके उजेडात आलेले आहे. आझमी म्हणाले, मी वंदे मातरम गीताचा आदर करतो पण मी आम्ही ते म्हणू शकत नाही. माझा धर्म त्याला परवानगी देत नाही, एवढे वादग्रस्त जाहीर विधान तेही थेट सभागृहात करून आझमी मोकळे झाले. सभागृहात ज्यावेळी वंदे मातरम होते त्यावेळी उभा राहून मी त्याविषयी आदर व्यक्त करतो पण मी ते म्हणू शकत नाही याचे कारण माझा धर्म सांगतो कि, अल्लाह ज्याने आकाश तयार केले ज्याने सूर्य चंद्र माणसे तयार केली, आम्ही अल्लाह शिवाय इतर कोणासमोर डोके टेकवू शकत नाही. हे माझ्या धर्मात सांगितले आहे. मी काही कोणाचाही अपमान करीत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे…
www.vikrantjoshi.com
वाचक मित्रांनो, अबू आझमी यांच्या या सभागृहातील जाहीर नकारावर म्हणजे वंदे मातरम न म्हणण्यावर एकनाथ खडसे यांनी दिलेले उत्तर, सभागृह तर चकित झाले पण मी किंवा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस अवाक झालो कारण जे खडसे आम्हाला अगदी सुरुवाती पासून अपेक्षित होते नेमके तेच बदललेले एकनाथ खडसे सभागृहात त्यांच्या त्या आक्रमक नेमक्या उत्तरातून आणि अबू आझमी यांना फैलावर घेतांना आम्ही बघितले साऱ्यांना ते मनापासून आवडले, हिंदीतून बोलणारे खडसे मनापासून भावले…
स्वातंत्र्याच्या आधी जी स्वातंत्र्याची लढाई सुरु झाली ती वंदे मातरम या गीतानेच सुरु झाली, तेव्हा इतर कोणतेही असे राष्ट्रीय गीत नव्हते अगदी जन गण मन देखील नव्हते खडसे म्हणाले. आझादीची जंग वंदे मातरम याच गीताने सुरु झाली आणि आई तुला सलाम म्हणताना त्यात मजहब किंवा तुमच्या धर्माचा प्रश्न येतो कुठे ? या मातीत तुम्हाला राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावेच लागेल. वंदे मातरम म्हणायला हरकत ती कसली, ज्या मातीचे तुम्ही सारे घेता त्या मातेला वंदे मातरम म्हणायला तुमची हरकत ती कसली, तुम्हाला या देशात राहायचे असेल तर तुम्हाला वंदे मातरम म्हणावेच लागेल, शरद पवार या मुस्लिम प्रेमी नेत्याच्या राष्ट्रवादी पक्षाचा हा आमदार एकनाथ खडसे हे असे जेव्हा आक्रमक होऊन बेफाम तुफान बोलत सुटला तेव्हा अबू आझमी यांच्या पायाखालची वाळू तर सरकलीच पण तिकडे शरद पवारांचे काय झाले असेल ती कल्पना केलेली बरी. जेव्हा एखादा महत्वाचा नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असतांना त्यांना थेट फाट्यावर मारून अबू आझमी याची वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावरून जाहीर आई बहीण घेतो नेमके आक्रमक आणि आवश्यक उत्तर देऊन अबू आझमी सहित उभ्या राज्यातल्या मुसलमानांची केवळ काही वाक्यात बोलती बंद करतो, बदललेले हे एकनाथ खडसे मिस्टर फडणवीस मिस्टर महाजन तुम्हाला आणखी वेगळे काय हवेत ? आता त्यांना अजित पवारांकडे पाठवायचे कि पुन्हा त्यांना एकवार भाजपामध्ये पूर्वीचे स्थान द्यायचे ठरवून बोलून निर्णय घेऊन मोकळे व्हा. एखादा नेता आयुष्यात अनेक चुका करतो अनेकदा चुकतो पण जेव्हा राष्ट्र प्रेमाचा मुद्दा ऐरणीवर येतो तेव्हा त्याच्यातली राष्ट्रभक्ती कशी उफाळून वर येते ते खडसे यांनी सिद्ध केले, काहीही म्हणा पण एकनाथ खडसे यानिमीत्ते तेही शरद पवार यांना आणि त्यांच्या वागणुकीला कसे कंटाळले, आम्ही जे ऐकत होतो तेच
नेमके खरे ठरले…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी