पत्रकार अनिल थापाडे थत्ते
आजही तब्बल 43 वर्षानंतर न चुकता मी जे करतो माझ्या पत्रकार मुलास विक्रांत यास जे सांगतो तेच नेमके सत्य आहे कि घरात बसून पत्रकारिता करता येत नसते करता येत नाही. आजही अनेक नामवंत धाडसी गाजलेले नावाजलेले पत्रकार निवृत्त झाल्यानंतर घरात बसून लिहितात किंवा व्हिडीओ बनवतात पण त्यात त्यांची पूर्वीची माहिती नसल्याने जिवंतपणा नसल्याने निवृत्तीनंतरचे पत्रकार फारसे वाचल्या जात नाहीत, येथे मी त्यांची नावे घेत नाही पण महाराष्ट्रात असे अनेक आहेत. जशी घरात बसून सीमेवरची लढाई लढता येत नाही किंवा फोटोकडे बघून रोमान्स करीत बायकोला दिवस जात नाहीत किंवा ओठांचा चंबू करून भर चौकात बसले तरी कोणीही येऊन तुमची पप्पी घेणार नाही तसे आम्हा पत्रकार मंडळींचे, तेथे देखील 12-12 तास बाहेर राबून व्यस्त राहून आधी माहिती जमा करावी लागते तर कोणत्याही मीडियाचे पत्रकाराचे नाव होते त्याच्यातली जागृत पत्रकारिता तेव्हा प्रतिबिंबित होते अपवाद फक्त आणि फक्त भाऊ तोरसेकर यांचा, जागेवर बसून किंवा दिल्लीतल्या घरात देखील बसून भाऊ आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या भरवशावर सतत विविध वाहिन्या आणि वृत्तपत्रे दररोज नजरेखाली घालून त्याभरवंशावर राज्यात राष्ट्रात जगभरात नाव कमावणारे एकमेव, त्यापध्दतीची जागेवर बसून आणि लिहून किंवा बोलून इतर एकही मीडिया पर्सन यशस्वी ठरणार नाही ठरू शकत नाही आणि अनिल थत्ते तर दूरदूरपर्यंत नाही…
www.vikrantjoshi.com
मी लिखाण आणि बोलण्यासाठी सतत माहिती घेतो दररोज आम्ही न चुकता घराबाहे पडतो आणि मिशन म्हणून बाप बेटे पत्रकारिता करतो धंदा म्हणून अजिबात अजिबात नाही अन्यथा आम्हाला दररोज किमान एक कोटी रुपये अगदी सहज मिळविता आले असते पण पत्रकारितेच्या मागे जर पैसे मिळविणे वेश्येसारखे धंदेवाईक होणे अशी ज्यांची पत्रकारिता असते त्यांच्याकडे इतर मान्यवरांचा बघण्याचा दृष्टिकोन बार बालेकडे बघण्यासारखा असतो हि वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. म्हणून मी केवळ ताजे अपडेट घेण्यासाठी दिवसभरात एकदा बातम्या बघतो, इतरांच्या लिखाणाचा बोलण्याचा माझ्यावर प्रभाव पडू नये किंवा मी एखाद्याची नक्कल करतो असे घडता कामा नये म्हणून राजकीय पत्रकारितेतील इतरांचे लिखाण आणि बोलणे नजरे खालून क्वचित खचित घालतो. पत्रकार अनिल थत्ते यांनी 19 किंवा 20 जुलै रोजी तयार केलेला किरीट सोमय्या संबंधी तयार केलेला एक व्हिडीओ मला माझया एका जवळच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने पाठवला कारण व्हिडीओ बघून तो काहीसा प्रभावित झाला असावा त्याने पाठविला म्हणून मी तो मुद्दाम बघितला आणि माझया ते लक्षात आले कि अनिल थत्ते यांनी अजिबात थापा मारणे बंद केलेले नाही, नेमके कारण हेच कि घरात बसून किंवा प्रत्यक्ष रणांगणावर न जाता लढाई लढता येत नाही आणि जिंकता तर अजिबात येत नाही. एखाद्या नेत्याला फोन करायचा, इकडले तिकडले अंदाज बांधून बोलायचे त्यातून घरबसल्या धंद्याचे गणित जमवायचे अशी पत्रकारिता होत नसते मग अनिल थत्ते पद्धतीने थापा मारत मिळेल ते मिळवू त्यापद्धतीने कमाई करीत जगायचे असते…
अनिल थत्ते त्या व्हिडीओ मध्ये म्हणतात कि लैंगिक विकृतीच्या बाबतीत किरीट सोमय्या नंतर आणखी एक भाजपचा नेता रडारवर आहे, हे असे बोलले कि जे त्यातले आहेत ते उगाच घाबरतात आणि धंदेवाईक पत्रकार अशांचा आर्थिक गैरफायदा घेऊन मोकळे होतात, यापद्धतीची पत्रकारिता आता जुनी झाली, अनिलजी आऊट डेटेड झाली, काहीतरी नवीन शोधून काढायला हवे. अत्यंत महत्वाचे म्हणजे या अशा नेत्याचे नाव सपुरावा थत्ते यांनी माझ्या किंवा इतर कुठल्याही मित्राच्या कानात जरी सांगितले तरी मी अनिल थत्ते यांना एक लाख रुपये पैज हरलो म्हणून देऊन मोकळा होईल, उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीची तुमची घरबसल्या कमाई करून देणारी पत्रकारिता आता इतिहासजमा झालेली आहे. तुम्ही त्यात वेगळे काहीच सांगितले नाही हे मी त्याआधीच दोन दिवस सांगून लिहून मोकळा झालो होतो. दोन महिने आधीपासून किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ मीडियाकडे फिरत होता, तुम्ही त्यात म्हणाला आहात, पुन्हा तेच कि जर दोन महिने आधी हा व्हिडीओ फिरत असेल किंवा तयार झालेला असेल तरीही मी पुन्हा एक लाख रुपयांची पैज लावून येथे मोकळा होतो, किती ह्या भयंकर मोठमोठाल्या थापा मारणे उगाच शब्दांवर जोर देऊन. किरीट सोमय्या यांनी 33 बायकांवर लैंगिक अत्याचार केले तुमचे सांगणे, तुम्ही त्यातल्या फक्त तीन बायकांची नावे एखाद्याच्या तेही कानात सांगा, मी आणखी एक लाख रुपये तुम्हाला देईन. ज्या स्त्रियांवर किरीट सोमय्या यांनी लैंगिक अत्याचार केले त्या साऱ्याच्या सार्या स्त्रिया हनी ट्रॅप एक्स्पर्ट आहेत, हेही सिद्ध करा, फसविलेल्या गेलेल्या मजबूर गरजू महत्वाकांक्षी स्त्रियांना हि अशी वेश्यांची उपमा देणे तुम्हाला अजिबात शोभणारे नाही, अशोभनीय आहे. मिस्टर संजय राऊत, अर्थात एकेकाळी बलात्कार कसा करावा असा करावा हे पुस्तक लिहून त्यावर आपल्या पत्नीचे उत्तान फोटो टाकणाऱ्या अनिल थत्ते यांनी इतरांच्या लैंगिक विकृतीचे वर्णन करून संताप व्यक्त करणे म्हणजे एका वेश्येने दुसर्या वेश्येला मुद्दाम डिवचण्यासारखे चिडविण्यासारखे आहे. शेवटी, आणखी एक महत्वाचा मुद्दा अस कि या व्हिडीओ तयार करण्यामागे काही उद्योगपती असल्याचे तुम्ही सांगितले आहे मोठी थाप मारली आहे, पुन्हा तेच एखाद्या आपल्या कॉमन मित्राच्या कानात तुम्ही त्यातले एक एखादे जरी नाव पुराव्यांसहित सांगितले तरी पुन्हा मी तुम्हाला एक लाख रुपये देईन, पैज हरेल. आणखी किती दिवस सतत यापद्धतीच्या थापा मारायच्या, निवृत्ती घेऊन मोकळे व्हा उगाच सामान्य माणसांची दिशाभूल अजिबात करू नका. किरीट यांच्या लैंगिक विकृती उजेडात यायलाच हव्यात पण सारे काही पुरावे मांडून, हवेत बाण मारून युद्ध जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे सोडून द्या…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी