तेरे है हम / हम दिल दे चुके सनम !!
एखाद्या लहान मुलाकडे दुर्लक्ष केल्यानंतर ते जसे भोंगाड पसरते ते तसे माझे यादिवसात झाले आहे म्हणजे तुमचे पत्रकार निखिल वागळे यांच्या पॅंटी कडे लक्ष जाते तुम्ही भाऊ तोरसेकरांनी ब्रा घातली कि नाही तिकडे लक्ष देता, त्या राजदीप सरदेसाईच्या नागडेपणा कडे निरखून बघता तुम्हाला वारंवार त्या संजीव खांडेकर यांचा लो कट ब्लाउज बघायला मनापासून आवडते पण मी काय सांगतो काय बोलतो काय लिहितो याकडे तुमचे विशेष लक्ष नसल्याने तुमचे या दिवसातले विशेषतः राज्याच्या राजकारणातले फ्रस्ट्रेशन वाढले आहे तुम्हाला नैराश्य आले आहे तुम्ही त्या देवेंद्र फडणविस यांच्यावर तर एवढे नाराज आहात कि पुढले भाजपामधले उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अशा खलनायकी पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे या दिवसात दात ओठ खात किंवा खाऊ का गिळू पद्धतीने बघता आहात, माझे याआधीचे बोलणे व लिहिणे आणि यानंतरचे बोलणे व लिहिणे जर डोळ्यात तेल घालून आपल्या हृदयात कोरून ठेवले तर नक्की तुम्हाला यापुढे नैराश्य येणार नाही तुम्ही अस्वस्थपणे घरात येरझारा घालणार नाहीत. मी जे तुम्हाला मे महिन्याच्या मध्यात सांगितले होते नेमके तेच घडले आहे, नीलम गोर्हे उद्धव सेनेला टाटा करीत शिंदे सेनेत तेही थेट देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 7 जुलै रोजी प्रवेश करून मोकळ्या झाल्या आहेत याच पद्धतीने जेव्हा आणखी काही महिन्यांनी म्हणजे पुढल्या दोन तीन महिन्यात काँग्रेसचे काही प्रमुख नेते थेट भाजपात प्रवेश करतील त्यावेळी जसे नीलम गोर्हे यांच्या प्रवेशाच्या वेळी वास्तवात अजिबात संबंध नसताना देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्या वेळी याचपद्धतीने भाजपा प्रवेश कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांची तुम्हाला हमखास उपस्थिती पाहायला बघायला मिळेल…
www.vikrantjoshi.com
पक्ष प्रवेश नीलम गोर्हे यांचा तोही शिंदे शिवसेनेत आणि उपस्थिती कोणाची तर देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासारख्या निवडक मोजक्या भाजपा नेत्यांची व मंत्र्यांची म्हणजे हे तर असे झाले कि लग्न गिरीश महाजन यांच्या प्रेयसीचे भलत्याच तरुणाशी आणि वर माला गिरीश महाजन यांच्या हाती, असा हा प्रकार पहिल्यांदा का घडला याचा तुम्ही विचार केलाच नाही. अर्थात दीड दोन महिन्यांपूर्वी मी नीलम गोर्हे यांच्या शिंदे सेना प्रवेशाची बातमी तुम्हा वाचकांना दिली म्हणून निलमताई माझ्या लाडक्या नेत्या माझ्यावर नाराज झाल्याचे मला कळले होते पण उद्या मी नितेश राणे यांचे त्यांच्या प्रेयसीबरोबर जुहू चौपाटीवर हातात हात घालून फिरतानाचे दृश्य बघायचे आणि तुमच्यापासून ते लपवून ठेवायचे कसे हो हे मला शक्य आहे तर या गमतीदार उदाहरणासारखे मला राहवले नाही आणि जेव्हा हे कोणालाही अगदी दूर दूरपर्यंत ठाऊक नव्हते मी सांगून टाकले कि नीलम गोर्हे यांचे शिंदे सेनेत येणे यापुढे रोखणे अशक्य आहे होते. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीचा, तर नव्या घरात पाठवतांना वधूच्या पाठीशी मोठ्या भावाचे ठाम उभे असणे तिला नक्की धीर देत असते पण त्यापलीकडे बापाचा हात तिच्या पाठिवर असणे तिला नव्या घरातला प्रवेश करतांना या हातामुळे तिचे सारे टेन्शन पूर्णतः खल्लास झालेले असते त्यादिवशी उपसभापती नीलम गोर्हे यांच्या पक्षांतरावेळी देवेंद्र फडणवीस वयाने लहान असूनही बापाच्या भूमिकेत होते. आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही सर्वांनी साफ दुर्लक्ष केले, जवळपास एक महिन्यानंतर म्हणजे जाहिरात प्रकरण घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीलम गोर्हे यांच्या पक्ष प्रवेशावेळी त्या स्टेजवर केवळ भांगडा करायचे तेवढे बाकी होते एवढे ते रिलॅक्स होते टेन्शन फ्री होते आणि आधीसारखे फडणविस यांच्याशी आधीसारख्या हसत खेळत गप्पात रंगून गेलेले होते आणि यालाच मित्रांनो देवेंद्र फडणविस म्हणतात, आपल्या या महाराष्ट्राचा एकमेव विश्वासू आणि आश्वसक नेता. पुढे पुढे बघा नेमके काय घडणार आहे ते…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी